व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रेम अंधळे असते!

प्रेम अंधळे असते!

प्रेम अंधळे असते!

स्पेनमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून

कल्पना करा की, तुम्ही आपल्याकरता एका वधूच्या शोधात आहात; पण, तुम्ही आपली वधू निवडू शकाल अशा मुली केवळ अंधारल्यावरच घराबाहेर पडतात; आणि त्यात भर म्हणजे तुम्हाला फक्‍त जवळचेच दिसते, दूरचे दिसत नाही. नेमकी अशीच दयनीय अवस्था आहे बिचाऱ्‍या एम्परर पतंगाच्या नराची. परंतु, या सुरेख कीटकाच्या अंगी असलेल्या काही वैशिष्ट्यांमुळे तो आपली अडचण सहज दूर करू शकतो.

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मात्र हा एका अळीच्या रूपात असतो, आणि खादाडासारखा दिवसभर नुसता खात असतो. मग, पुढचा वसंत येतो तसा हा देखण्या पतंगाच्या रूपात आपल्या कोषातून बाहेर पडतो; अर्थात तेव्हा त्याने आयुष्यभर पुरेल इतकी शिधा आपल्या शरीरात साठवून ठेवलेली असते. याचे आयुष्य तरी कितीसे असते—केवळ दोन महिने.

अन्‍नाची समस्या तर सुटली, आता हा स्वतःसाठी सोबती शोधण्यात जास्त लक्ष घालवू शकतो. वधू शोधण्यासाठी त्याच्याजवळ एक खास साधन असते. ते नसते तर चंद्रप्रकाशात मादी शोधणे म्हणजे गवताच्या ढिगाऱ्‍यातून सुई शोधण्याचाच प्रकार.

त्याच्या बारीकशा डोक्यावर फर्नच्या पानाच्या आकाराचे दोन इवलेसे अवयव असतात; क्वचितच असे एखादे अत्याधुनिक गंध-शोधक असेल ज्याची या बारीक पर्णाकार अवयवाशी तुलना करता येईल. या अवयवाच्या साहाय्याने मादी पतंगाचा फेरोमोन किंवा “गंध” नराला चटकन ओळखता येतो.

सहसा माद्यांची संख्या फार कमी असते. पण तरीही तिच्या उग्र गंधाद्वारे किंवा फेरोमोनद्वारे ती कोठे आहे याचा संकेत दिला जातो. आणि नर पतंगाच्या स्पृशा अर्थात त्याचे “नाक” इतके संवेदनशील असते की जवळजवळ ११ किलोमीटर दूर असलेल्या मादीलाही तो शोधून काढू शकतो. अशाप्रकारे सगळ्या अडथळ्यांवर मात करून शेवटी नर-मादीचे मिलन होते. कीटकांच्या जगात, निदान या पतंगांच्या बाबतीत तरी प्रेम अंधळेच असते, नाही का?

देवाच्या निर्मितीत अशा अनोख्या आणि विलक्षण रचनांची काहीच कमी नाही. स्तोत्रकर्त्याने तर म्हटले: “हे परमेश्‍वरा, तुझी कृत्ये किती विविध आहेत! ती सर्व तू सूज्ञतेने केली.”—स्तोत्र १०४:२४.

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

© A. R. Pittaway