व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“माझा विश्‍वास देवावर असायला हवा”

“माझा विश्‍वास देवावर असायला हवा”

“माझा विश्‍वास देवावर असायला हवा”

एडमॉनटन, आल्बर्टा, कॅनडा इथल्या एका यहोवाच्या साक्षीदारांच्या मंडळीत खालील पत्र सापडले.

“प्रिय संदेशवाहक:

“ज्याने नकळतपणे माझ्या जीवनात एक अदभुत परिणाम घडवून आणला त्या व्यक्‍तीचे आभार मानण्याकरता मी हे पत्र लिहीत आहे.

“काही दिवसांपूर्वी आम्हा पतिपत्नीत अतिशय कडाक्याचे भांडण झाले होते. ‘हे इतक्या टोकाला गेले आहे की आता यावर काहीच उपाय नाही असे मला वाटते’ असे मी बोलते न बोलते तोच दरवाजाची बेल वाजली. पाहते तो दारात एक यहोवाचा साक्षीदार उभा होता आणि आता त्याला टाळणे देखील शक्य नव्हते.

“तो जे काही सांगत होता ते ऐकण्याच्या मनस्थितीत मी नव्हते. फक्‍त “मुले” आणि “परिवार” असे काही शब्द माझ्या लक्षात राहिले. मग त्याने कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य हे पुस्तक मला दाखवले. त्या पुस्तकाचे नाव पाहताच मला रडू कोसळले, मी स्वतःला आवरूच शकले नाही. त्याने माझ्याकडे पाहिले, माझी माफी मागितली आणि ते पुस्तक मला देऊन तो निघून गेला.

“यामुळे कोणता अदभुत परिणाम घडून आला? या छोट्याशा घटनेमुळे, मला या गोष्टीची खात्री पटली की काय करावे नि काय नाही हे मला कळत नाही तेव्हा विनाकारण चिंता करत बसण्याची गरज नाही, कारण तेव्हा देव आपली काळजी घेत असतो. फक्‍त माझा देवावर विश्‍वास असायला हवा. तो त्याच्या संदेशवाहकाला जरूर पाठवतो. मी आपली आभारी आहे.”

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकाचा कुटुंबातील सर्वांना फायदा होऊ शकतो. यातील ज्ञानपर धड्यांपैकी काही असे आहेत: “तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा,” “तुमच्या घरात शांती राखा,” तसेच “कुटुंबाचे नुकसान करणाऱ्‍या समस्यांवर तुम्ही मात करू शकता.”

तुम्हाला या १९२-पानी पुस्तकाविषयी आणखी माहिती हवी असल्यास कृपया पुढील कूपन भरून ते टपालाने आम्हाला पाठवून द्यावे किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वर दिलेल्या योग्य पत्त्यावर पत्र लिहावे. तुमच्या समस्या सोडवण्याकरता आणि जो आनंद उपभोगण्याकरता निर्माणकर्त्याने मुळात कुटुंबाची स्थापना केली होती, तो आनंद लुटण्याकरता या पुस्तकातील सूचना तुम्हाला सहायक ठरतील

कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या पुस्तकासंबंधित अधिक माहिती मला पाठवा.

□ मला मोफत गृह बायबल अभ्यास हवा आहे; तेव्हा पुढील पत्त्यावर माझ्याशी संपर्क साधा.