व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“अचूक आणि व्यावहारिक मार्गदर्शक”

“अचूक आणि व्यावहारिक मार्गदर्शक”

“अचूक आणि व्यावहारिक मार्गदर्शक”

गेल्या वर्षाच्या उन्हाळ्यात, आर्कनसास डेमोक्रॅट गॅझेट नावाच्या एका वृत्तपत्राने वॉच टावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटीने छापलेल्या पुष्कळ पुस्तकांची समीक्षा केली. त्यांपैकी “तरुणांचे प्रश्‍न” या पुस्तकाबद्दल या वृत्तपत्राने म्हटले, की “तरुणांचे प्रश्‍न हे पुस्तक फक्‍त तरुणांकरताच नाही तर सर्व कुटुंबांसाठी आणि सर्व धर्मियांसाठी अचूक आणि व्यावहारिक मार्गदर्शक आहे.”

“या पुस्तकात चांगली वागणूक कशी राखावी याबद्दल माहिती आहे, भावनिक सल्ला आहे. उदाहरण द्यायचे झाल्यास, सर्वच युवकांना स्वातंत्र्य हवे असते याची जाणीव या पुस्तकाच्या लेखकांना आहे म्हणून त्यांनी असा सल्ला दिला:

“‘तुम्हाला स्वातंत्र्य आणि जबाबदारी हवी आहे का? मग तुम्ही जबाबदार आहात ते शाबीत करून दाखवा. तुमचे आईवडील तुम्हाला देत असलेले प्रत्येक काम जबाबदारीनं पार पाडा.’

“असे फार कमी पालक असतील ज्यांना, एखाद्या व्यक्‍तीला तिच्या कर्मांचा हिशेब द्यावा लागेल हा सिद्धांत आणि तरुणांनी स्वतःचा व इतरांचा आदर केला पाहिजे, हा उपदेश ज्या पुस्तकात वारंवार दिला आहे त्या पुस्तकाची कदर वाटत नाही. या पुस्तकातील सल्ला बायबलवर आधारित असला तरी, तो व्यावहारिक ज्ञान व समज यावर जास्तकरून आधारित आहे. . . . या पुस्तकात, स्वाभिमानावरील माहिती अतिशय प्रभावकारी आहे, कारण पुष्कळ तरुणांना स्वाभिमान आणि अभिमान यातला फरक कळत नाही.”

पुस्तकातील काही माहितीचा संदर्भ दिल्यानंतर, त्या वृत्तपत्राने पुढे म्हटले: “या पुस्तकात म्हटले आहे की अहंभाव हा गर्वाचाच एक प्रकार आहे पण ख्रिश्‍चनांनी नम्र असले पाहिजे. पण पॉप संगीताच्या या युगात तरुणांना त्यांच्या मित्रांकडून व इतर सल्लागारांकडून याच्या अगदी उलट सल्ला दिला जातो.”

तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकाविषयी तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, तुमच्या जवळपास राहणारा आमचा एखादा प्रतिनिधी येऊन तुम्हाला याविषयीची जास्त माहिती देऊ शकेल. खालील कूपनवर आपले नाव आणि पत्ता लिहून, या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा.

◻ कृपया तुमच्या प्रतिनिधीला माझ्या घरी पाठवा.

◻ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया मला संपर्क करा.