व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भारतातील चिनई जाळे

भारतातील चिनई जाळे

भारतातील चिनई जाळे

भारतातील सावध राहा! बातमीदाराकडून

भारताच्या पश्‍चिमी किनाऱ्‍यावर, भारतीय उपखंडाच्या दक्षिणेकडून १५५ किलोमीटरवर कोची नावाचे (पूर्वीचे कोचीन) शहर आहे. कोचीन हे मुख्यभूमीपासून थोडेसे बाजूला आहे, म्हणजे कोचीन आणि मुख्यभूमी यांमध्ये वाळूचा बांध आहे. कोचीनच्या किनाऱ्‍यांवर चिनी पद्धतीचे मासे पकडण्याचे चिनई जाळे जागोजागी पाहायला मिळतात. चिनी पद्धतीचे जाळे आणि ते देखील भारतात?

सा.यु. आठव्या शतकात या भागात चिनी लोकांची वस्ती होती. आणि असे म्हटले जाते, की कुबलाई खानच्या राजदरबारातील चिनी व्यापाऱ्‍यांनी १४०० च्या आधी या चिनी पद्धतीच्या मासे पकडण्याच्या जाळ्या कोचीनला आणल्या असाव्यात. कोचीनच्या खाडीत मोठ्या प्रमाणावर मासेमारी चालायची आणि आजही चालते. अरबी लोकांनी चिनी लोकांची कोचीनमधून हकालपट्टी करेपर्यंत त्यांचे वास्तव्य येथे होते.

चिनी लोक गेले आणि त्यांच्या पद्धतीच्या जाळ्या देखील काढून टाकण्यात आल्या. पण मग सोळाव्या शतकात अरबी लोकांची जागा पोर्तुगीजांनी घेतली. पोर्तुगीजांनी पुन्हा त्या जाळ्यांचा वापर सुरू केला. आग्नेय चीन येथील मकाओ या बेटावर पोर्तुगीजांची वसाहत होती आणि तेथे या जाळ्यांचा उपयोग केला जात होता. तेथून त्यांनी या जाळ्या कोचीनला पुन्हा आणल्या.

चिनई जाळ्यांचे तंत्र तसे फार जुने आहे. पण त्यांच्या वापरात फारसा बदल झालेला नाही. या चिनई जाळ्यांचा उपयोग करून पुष्कळ कोळी आपला उदरनिर्वाह करतात, शिवाय लोकांनाही खायला मासे मिळतात. खरे तर, फक्‍त एकाच जाळ्यात पकडलेल्या माशांवर अख्ख्या गावाचे पोट भरू शकते. या जाळ्या दिसायलाही सुंदर असतात. सकाळच्या किंवा संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात दिसणाऱ्‍या त्याच्या छायाकृती विशेष आकर्षक असतात.

या जाळ्या कशा वापरल्या जातात?

खाडीच्या किनाऱ्‍यावर या जाळ्यांचा चौकटीसारखा ओटा किंवा फलाट असतो. याच्या मध्यभागी जाडा उभा खांब असतो. या खांबाच्या टोकाला लोखंडी सळईच्या साहाय्याने बसविलेला मोठा आडवा वासा (बांबू) असतो. याला चार बाजूंना चार बांबू असलेले व खाली भले मोठे चौकोनी पण घोळ असलेले जाळे बांधलेले असते. ओक्‍तीच्या आडव्या वाशाच्या दुसऱ्‍या टोकाला दोरी असते व ती वरखाली करून जाळेही त्याचप्रमाणे वरखाली करता येते. जाळे वापरले जात नाही तेव्हा ते पाण्यातून वर काढतात. मासेमारी भल्या पहाटे चार ते पाच तासच केली जाते. सुरवातीला अगदी हळुवारपणे जाळे पाण्यात सोडतात. ५ ते २० मिनिटांनंतर अलगदपणे जाळे वर उचलले जाते. किनाऱ्‍यावर आलेले मासे यात सहजपणे अडकतात. जाळे पाण्यातून वर कधी काढायचे हे अनुभवी कोळी अचूक जाणतो.

जाळ्याचे चारही टोक जसजसे पाण्यातून वर घेतले जातात तसतसे घोळ असलेले हे जाळे एखाद्या पेल्याप्रमाणे दिसू लागते. या पेल्यासारख्या जाळ्यातील माशांना पाहून कोळ्यांना होणाऱ्‍या आनंदाची कल्पना करा! आनंदाच्या भरात ते एकमेकांची पाठ थोपटतात. पकडलेल्या या सर्व माशांचा लिलाव होतो. व्यापारी, गृहिणी आणि कधीकधी पर्यटकही या माशांच्या सौदा करतात.

चिनी, अरबी आणि पोर्तुगीज लोक आले आणि गेले. पण चिनई जाळ्या मात्र कोची खाडीतच राहिल्या. गेल्या ६०० वर्षांपासून आतापर्यंत त्यांचा उपयोग केला जात आहे.

[३१ पानांवरील नकाशा]

कोची

[चित्राचे श्रेय]

Mountain High Maps® Copyright © १९९७ Digital Wisdom, Inc.