व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवी हक्कांविषयी शिकवणारे साधन

मानवी हक्कांविषयी शिकवणारे साधन

मानवी हक्कांविषयी शिकवणारे साधन

ग्रॅनाडा स्पेन येथे राहणाऱ्‍या रूट हेमेनेथ हीलॉ या १७ वर्षांच्या तरुणीला तिच्या शिक्षिकेने मानवी हक्क या विषयावरील एका निबंध स्पर्धेत भाग घेण्यास सांगितले. कित्येक आठवड्यांनंतर बेल्जियमच्या ब्रस्सल्स येथील युरोपियन परीक्षक मंडळाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला. आणि रूट तसेच इतर काही विद्यार्थ्यांना त्यांच्या देशाचे प्रतिनिधी म्हणून निवडले गेले. नंतर तिने सावध राहा! पत्रिकेच्या प्रकाशकांना हे पत्र पाठवले.

“मानवी हक्क या विषयाबद्दल मला जी अद्ययावत माहिती हवी होती अगदी तीच मला ‘सावध राहा!’ (इंग्रजी), नोव्हेंबर २२, १९९८ च्या अंकातील ‘सगळ्यांनाच मानवी हक्क मिळतील का?’ या लेखात मिळाली. मानवी हक्कांसंदर्भात कसे अत्याचार केले जातात याची उदाहरणेसुद्धा मी ‘सावध राहा!’ मासिकांमधूनच घेतली होती; स्त्रियांचे भविष्य आणि हिटलरच्या शासनात झालेला भयंकर नर-संहार या विषयावरील लेखांतून ती माहिती मी घेतली होती. [मे ८, १९९८ आणि ऑगस्ट ८, १९९८ (इंग्रजी) हे अंक पाहा.] ही सगळी माहिती गोळा करत असताना माझ्या लक्षात आले की, ‘सावध राहा!’ मासिकात दिलेली माहिती इतर कोणत्याही पत्रिकांमध्ये दिलेली नाही. त्यातले फोटोसुद्धा मला फार आवडले; म्हणून माझ्या लेखासाठी मी त्यातलेच काही फोटो निवडले.

“या निबंधासाठी मला बक्षीस मिळाले आणि त्या निमित्ताने मला फिनलंडमध्ये एक आठवडाभर राहायला मिळाले; तेथे देखील मला मानवी हक्कांच्या विषयावर आणखी बोलायला संधी मिळाली. आणि ‘सावध राहा!’ मासिकात यासारख्या महत्त्वाच्या विषयांची हाताळणी केली जाते म्हणून हे अत्यंत माहितीपूर्ण मासिक आहे असेही मी सांगितले.

“तुम्ही आम्हाला अशी माहिती वेळेवर आणि सर्वांच्या आधी देत असल्याबद्दल धन्यवाद. यहोवाचा आशीर्वाद सदोदित तुमच्यावर असो म्हणजे जगातल्या लाखो लोकांना अशा माहितीचा फायदा होत राहील.”

[२३ पानांवरील चित्रे]

रूट आणि तिला मिळालेले प्रमाणपत्र