व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्ही टीव्हीचा काळजीपूर्वक वापर करता का?

तुम्ही टीव्हीचा काळजीपूर्वक वापर करता का?

तुम्ही टीव्हीचा काळजीपूर्वक वापर करता का?

मनोरंजनाच्या माध्यमांतून दाखवलेल्या कार्यक्रमांची समीक्षा करणाऱ्‍या अमेरिकेतील एका ग्रुपने नॉट ईन पब्लिक ईंटरेस्ट—लोकल टीव्ही न्यूज ईन अमेरिका, हा रिपोर्ट लिहिला. यात आजच्या सामाजिक जीवनात टीव्हीची कोणती भूमिका आहे याविषयी सांगण्यात आले होते: “टीव्ही करमणूक करतो, आईवडील घरात नसताना लहान मुलांची देखरेख देखील करतो आणि इतकेच नव्हे तर लोकमत परिवर्तन करण्याइतपत त्याच्यात सामर्थ्य आहे. आज टीव्ही घराघरांत आहे; त्याच्या प्रभावाची तुलना सिगारेटच्या विषारी धुराशी करता येईल.” सिगारेटच्या धुरामुळे ज्याप्रमाणे आरोग्यावर हानीकारक परिणाम होऊ शकतो त्याचप्रमाणे तासंतास टीव्ही बघण्यात वेळ घालवल्याने त्याचा आपल्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. खासकरुन मुलांवर.

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या हिंसक दृश्‍यांबद्दल सांगताना या रिपोर्टने असे म्हटले आहे की “हिंसक दृश्‍ये पाहिल्याने मुलांच्या शिकण्याच्या क्षमतेवर, त्यांच्या मनोवृत्तीवर आणि त्यांच्या मनात लोकांसाठी असणाऱ्‍या भावनांवर नकारात्मक परिणाम होतो, हे अभ्यासावरून दिसून आले आहे.” १९९२ मध्ये अमेरिकी वैद्यकीय संघटनेने असे म्हटले की “टीव्हीवरील हिंसा ही तरुणांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे.”

तुम्ही तुमच्या मुलांना टीव्हीमुळे होणाऱ्‍या दुष्परिणामांपासून कसे वाचवू शकता? सदर रिपोर्टमध्ये, अनेक आरोग्य संघटनांनी दिलेल्या सल्ल्यांच्या आधारे काही सूचना दिल्या आहेत. त्यांपैकी काही सूचना खालीलप्रकारे आहेत.

◼ ठराविक वेळच टीव्ही पाहायचा असे ठरवा. मुलांनाही विशिष्ट वेळपर्यंतच टीव्ही पाहू द्या. मुलांसाठी जर वेगळी खोली असेल तर तिथे टीव्ही ठेऊ नका.

◼ टीव्हीजवळ पृथ्वीचा गोल ठेवा म्हणजे कार्यक्रम पाहतेवेळी मुलांना त्यात दाखवली जाणारी ठिकाणे पृथ्वीच्या गोलावर पाहता येतील.

◼ टीव्ही बघताना मुलांना एकटे सोडू नका. तर त्यांच्याबरोबर बसून, टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्‍या गोष्टींपैकी कोणत्या केवळ काल्पनिक आहेत आणि कोणत्या खऱ्‍या आहेत हे त्यांना समजावून सांगा. दहा वर्षां खालील बऱ्‍याच मुलांना काल्पनिक आणि वास्तविक गोष्टींतील फरक कळत नाही असे दिसून आले आहे.

◼ तुमच्या घरात टीव्ही सहज दिसण्यासारख्या जागी आहे का? तर मग तो एखाद्या बंद कपाटात ठेवा, म्हणजेच अशा जागी ठेवा जिथे तुमची नजर त्यावर पटकन पडणार नाही. तसेच, येताजाता सहज सुरू करता येत नसल्यामुळे मुले तासनतास टीव्ही पाहण्यात वेळ घालवणार नाहीत.