व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

सुखी कुटुंब—कसे बनवता येईल

सुखी कुटुंब—कसे बनवता येईल

सुखी कुटुंब—कसे बनवता येईल

“मीगेल्या ४० वर्षांपासून टेहळणी बुरूजसावध राहा! मासिकं नियमित वाचत आले आहे,” असं दक्षिण अमेरिकेतील अर्जेन्टिना येथील ग्रासिएला हिने लिहिले. “आज इतक्या वर्षांनंतर मी म्हणू शकते, की या मासिकांनी माझ्या जीवनाला मोलाचा हातभार लावला आहे. मी लहान असताना, मी तरुण असताना, माझं लग्न ठरलं तेव्हा व मग लग्न झाल्यावर, आणि माझ्या सहा मुलांना वाढवताना या मासिकांनी मला खूप मदत केली आहे.

“अजून घरी असलेल्या माझ्या चार मुलांना या मासिकांतून मी बरचं काही शिकवू शकते. या मासिकांनी आम्हा दोघा नवराबायकोला आमच्या मुलांचं संगोपन करण्याकरता पुष्कळ मदत केली आहे. मुलांच्या शिक्षकांबरोबर किंवा डॉक्टरांबरोबर बोलायचं असेल तर मी सावध राहा! मासिकाचा उपयोग करते. मार्च ८, १९९७ च्या सावध राहा! मासिकात एक लेख मालिका आली होती. त्यातील एका लेखाचा विषय होता: “अध्ययन असमर्थतांशी झुंजणाऱ्‍या मुलांना साहाय्य.” आमची एक मुलगी शाळेत इतकी हुशार का नाही हे आम्हाला याच लेखामुळे समजलं.”

वॉच टावर संस्थेची प्रकाशनं, समस्यांचा सामना कसा करता येईल व सुखी कुटुंब कसं बनवता येईल याबाबतीत पुष्कळ मदत देतात. जसे की, कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य नावाच्या १९२ पानी पुस्तकाचा पतींना, पत्नींना, पालकांना, मुलांना, आजीआजोबांना—होय, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला फायदा होऊ शकतो. त्यातील काही माहितीपूर्ण अध्यायांची अशी शीर्षकं आहेत: “तुमच्या मुलाला बालपणापासून शिक्षण द्या,” “तुमच्या किशोरवयीनाला जोमाने वाढण्यास मदत करा,” “तुमच्या कुटुंबाचे विध्वंसक परिणामांपासून संरक्षण करा,” आणि “कुटुंबाचे नुकसान करणाऱ्‍या समस्यांवर तुम्ही मात करू शकता,” वगैरे.

तुम्हाला कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य या १९२ पानी पुस्तकाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर कृपया खालील कूपनवर आपले नाव आणि पत्ता लिहून, खाली दिलेल्या पत्त्यावर अथवा या मासिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा. समस्या कशा सोडवाव्यात यावर या पुस्तकात मार्गदर्शन करण्यात आलं आहे. शिवाय, देवाच्या इच्छेप्रमाणे तुम्ही तुमचं कुटुंब सुखी कसं करू शकता हे देखील या पुस्तकात सांगण्यात आलं आहे.

□ कृपया मला कौटुंबिक सौख्यानंदाचे रहस्य पुस्तकाबद्दल आणखी माहिती पाठवा.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझा संपर्क साधा.

[३२ पानांवरील चित्र]

ग्रासिएला आणि तिचे कुटुंब