व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

टॉग्वा कवच-फळ मी १९५४ पासून तुमच्या मासिकाचा प्रत्येक अंक वाचत आले आहे. यहोवाने निर्माण केलेल्या गोष्टींचा किती विविध प्रकारे उपयोग होतो यांचे वर्णन करणारे लेख मी वाचते तेव्हा प्रत्येक वेळी मी आश्‍चर्यचकित झाल्याशिवाय राहत नाही. “हत्तींना वरदान ठरलेले टॉग्वा कवच-फळ” हा आणखी एक लेख वाचून मला आश्‍चर्य वाटले. (डिसेंबर ८, १९९९) आपल्या देवाच्या अद्‌भुत ज्ञानाची जास्तीतजास्त कदर करण्यास मदत केल्याबद्दल तुमचे खूप आभार.

डी. एच., अमेरिका

मनमिळाऊपणा “तरुण लोक विचारतात . . . मला मनमिळाऊ होता येईल का?” (डिसेंबर ८, १९९९) या लेखाने माझ्यावर खूपच प्रभाव पाडला. मी १६ वर्षांची आहे. मला इतरांबरोबर खासकरून ख्रिस्ती सभांमधील बंधूभगिनींबरोबर बोलायला खूप कठीण वाटते. माझ्यासारखी समस्या असलेल्या तरुणांचा विचार केल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. या लेखात तुम्ही दिलेला उत्तम सल्ला अनुसरण्याचा मी प्रयत्न करेन.

आय. ए., फ्रान्स

गाणारे पक्षी “मंजूळ द्वंद्वगीत गायक” लेखाबद्दल आभार. (जानेवारी ८, २०००) झाडाच्या फांदीवर बसून कोमल आणि मंजूळ आवाजात गीत गाणाऱ्‍या पक्ष्यांची मी फक्‍त कल्पना केली. आपल्याला आनंद देणाऱ्‍या प्राणी आणि पक्ष्यांना निर्माण केल्याबद्दल मी दररोज यहोवाचे आभार मानते.

वाय. एस., जपान

अंधविश्‍वास मी भाषातज्ज्ञ असल्यामुळे, सावध राहा! मासिकाच्या डिसेंबर ८, १९९९ अंकातील एक चूक मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो. “अंधविश्‍वास—इतके हानीकारक का?” या श्रृंखलेत तुम्ही असे सूचित केले आहे, की गेझुंटहाईट हा जर्मन शब्द, कोणी शिंकल्यावर म्हटला जातो; आणि या शब्दाचा अर्थ “देव तुझं भलं करो,” असा होतो. पण या शब्दाचे इंग्रजी भाषांतर खरे तर “आरोग्य” असे आहे.

के. के., अमेरिका

“गेझुंटहाईट” हे “देव तुझं भलं करो,” या इंग्रजी वाक्यांशाचे अचूक भाषांतर आहे असे आम्हाला म्हणायचे नव्हते. इतरही भाषांतअसेच काहीतरी” म्हटले जाते असा उल्लेख करून या शब्दाबरोबर आणखी दोन परदेशी-भाषेतले वाक्यांश आम्ही दिले होते.—संपादक.

लाजरेपणा “तरुण लोक विचारतात . . . कोणाशी मैत्री करणं मला इतकं कठीण का जातं?” (नोव्हेंबर ८, १९९९) या लेखाबद्दल मी तुमचे खूप आभार मानते. उचित वेळी मिळालेले हे अन्‍न आहे. मी बालपणापासून लाजरी आहे. मी आता १७ वर्षांची आहे. बाहेर किंवा ख्रिस्ती सभांमधील नवीन लोकांना भेटून त्यांच्याशी बोलायला मला खूपच लाज वाटते. यामुळे ख्रिस्ती बंधूभगिनींबरोबर असण्याच्या अनेक संधी मी हातून घालवून दिल्या आहेत. माझ्याप्रमाणेच लाजरा स्वभाव असणारे इतरही लोक आहेत व या स्वभावावर मात करता येऊ शकते हे मला या लेखातून वाचायला मिळाले.

बी. एच., अमेरिका