उत्क्रांतीचा सिद्धान्त बुद्धीला पटणारा आहे का?
उत्क्रांतीचा सिद्धान्त बुद्धीला पटणारा आहे का?
उत्क्रांतीचा सिद्धान्त एक वस्तुस्थिती आहे, असे या सिद्धान्ताचे समर्थक मानतात. पण त्यांचा दावा कितपत तर्कसंगत आहे? याकरता पुढील गोष्टींचा विचार करा.
कोळी किटकाने तयार केलेला रेशमी धागा सर्वात मजबूत असतो असे मानले जाते. न्यू सायन्टिस्ट मासिकानुसार “प्रत्येक धाग्याला त्याच्या लांबीपेक्षा ४० टक्के लांबवता येते, हा धागा लवचीक असल्यामुळे तो सहजासहजी तुटत नाही; पोलादापेक्षा शंभर पटीने जास्त दाब तो सहन करू शकतो.” हा विलक्षण रेशमी धागा कसा काय तयार होतो? कोळ्याच्या उदरातील ग्रंथींच्या स्रावामुळे उत्पन्न होणाऱ्या गिळगिळीत पदार्थांपासून तनित्रांच्या (रेशमाचे धागे तयार करण्याकरता असणारी इंद्रिये) साहाय्याने कोळी रेशमी धागा तयार करतात, असे एन्सायक्लोपिडिआ ब्रिटॅनिका म्हणतो.
न्यू सायन्टिस्ट शेवटी म्हणते: “सर्वात कौशल्यपूर्ण रसायन शास्त्रज्ञापेक्षा उत्तम तंत्र कोळ्याने आपणहून विकसित केले आहे.” पण, प्रश्न असा येतो, की मनुष्याला अद्याप उमगले नाही असे गुंतागुंतीचे तंत्र एक लहानसा कोळी किटक आपणहून विकसित करू शकतो ही गोष्ट बुद्धीला पटणारी आहे का?
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील कायदा विषयाचे प्राध्यापक फिलिप ई. जॉनसन द वॉल स्ट्रीट जर्नल मधील आपल्या एका लेखात म्हणतात, की उत्क्रांतीचा कोणताही पुरावा अद्याप मिळालेला नाही. पण, उत्क्रांतीच्या सिद्धान्ताचे समर्थक मात्र हा सिद्धान्त न मानणाऱ्यांची थट्टा करतात. लेखात पुढे असे म्हटले होते, की “उत्क्रांतीचा सिद्धान्त शाबीत करण्यासाठी पुरावा मिळत नसला तरी याचे समर्थक हार मानत नाहीत.”
उत्क्रांतीवादावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांची तर्काला धरून नसलेली किंवा बिनबुडाची विचारशैली शाबीत करण्याकरता आणखी एक उदाहरण आहे. ते म्हणजे वनस्पती. मोरॉक्कोमध्ये संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांना, आर्कियोपटेरीसचे १५० जीवाश्म सापडले. लंडनचे द डेली टेलिग्राफ वृत्तपत्र याविषयी म्हणते, की हे जीवाश्म “आतापर्यंत सापडलेल्या सर्वात पहिल्या बीजधारक वनस्पतींच्याच जातीचे आहेत जे आजच्या बहुतेक झाडांचे पूर्वज आहेत.” या वृत्तपत्राचे विज्ञान संपादक म्हणतात, की या वनस्पतीने “पानांचा व फांद्यांचा शोध लावण्यामुळे एक नवीन वनस्पती जग तयार झाले आहे.” “शोध लावणे” म्हणजे “विचार करून काही नवीन आविष्कार करणे.” तर मग, वनस्पतींमध्ये विचार करण्याची व शोध लावण्याची क्षमता आहे, असे मानणे तर्कसंगत आहे का?
सुज्ञ लोकांपैकी एक, शलमोन आपल्याला “तारतम्य” बाळगण्यास अर्थात आपल्या विचारशक्तीचा उपयोग करण्याचा सल्ला देतो. आणि पहिल्यापेक्षा आज या विचारशक्तीचा जास्त उपयोग करण्याची गरज आहे.—नीतिसूत्रे ५:२, मराठी कॉमन लँग्वेज भाषांतर.