व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला चुकवावेसे वाटणार नाही असे!

तुम्हाला चुकवावेसे वाटणार नाही असे!

तुम्हाला चुकवावेसे वाटणार नाही असे!

असे काय? यहोवाच्या साक्षीदारांचे “देवाच्या वचनानुसार आचरण करणारे” प्रांतीय अधिवेशन! या अधिवेशनांची श्रृंखला, अमेरिकेत मे महिन्यापासून सुरू झाली. आणि येणाऱ्‍या महिन्यात जगाच्या विविध शहरांमध्ये होणाऱ्‍या या अधिवेशनांना हजारो लोक उपस्थित राहतील. बहुतेक ठिकाणी, शुक्रवारी सकाळी ९:३० वाजता संगीताने कार्यक्रमाची सुरवात होईल.

कार्यक्रमाच्या सुरवातीला देवाचे वचन काय म्हणते त्याकडे लक्ष देण्याचे उत्तेजन देण्यात येईल. सकाळच्या कार्यक्रमात, “यहोवाच्या चांगुलपणावर खूष व्हा” आणि “अदृश्‍य असलेल्याला पाहून दृढ व्हा” यासारखी भाषणे असतील. “अद्‌भुत गोष्टींचा निर्माणकर्ता—यहोवा याची स्तुती करा” या अधिवेशनाच्या प्रमुख भाषणानंतर सकाळचा कार्यक्रम समाप्त होईल.

दुपारच्या कार्यक्रमाचे पहिले भाषण, “जे उत्तम आहे ते करण्याचे सोडू नका” हे असेल. त्यानंतर, योग्य जोडीदार कसा निवडावा, आपले कुटुंब आध्यात्मिकरीत्या मजबूत कसे करावे, मुलांना यहोवावर प्रेम करायला कसे शिकवावे यांवर तीन भागांची परिचर्चा असेल. आणि मग कार्यक्रमाच्या शेवटी, “यहोवाच्या संघटनेच्या बरोबरीने राहणे,” हे भाषण दिले जाईल. या भाषणादरम्यान, अलीकडील दिवसांमध्ये यहोवाच्या उद्देशांची आपल्याला हळूहळू नवीन समज कशी मिळत गेली त्याची उजळणी केली जाईल.

शनिवार सकाळच्या कार्यक्रमात दुसऱ्‍यांदा तीन भागांची परिचर्चा असेल. या परिचर्चेचा विषय असेल, “देवाच्या वचनाचे सेवक.” या परिचर्चेत आपल्याला आपले शिष्य बनवण्याचे काम कसे करत राहावे याबाबतीत सूचना दिल्या जातील. त्यानंतर मग, “देवाला लाज वाटेल असे कोणतेही कार्य करू नये,” हे भाषण दिले जाईल. मग, बाप्तिस्म्याचे भाषण होईल. पात्र व्यक्‍तींना बाप्तिस्मा घेण्याची संधी मिळेल.

शनिवारी दुपारी, तिसऱ्‍यांदा तीन भागांची परिचर्चा असेल. या परिचर्चेचा विषय असेल, “आध्यात्मिकता विकसित करण्यास झटा.” आपण आपली आध्यात्मिकता कशी विकसित करू शकतो याबाबतीत या परिचर्चेदरम्यान व्यावहारिक सूचना दिल्या जातील. कार्यक्रमाचा शेवट, “देव वचनाच्या उत्तरोत्तर वाढणाऱ्‍या प्रकाशात चालणे,” या उत्तेजनपर भाषणाने होईल. या भाषणात, यशयाच्या २५ आणि २६ अध्यायांवर चर्चा केली जाईल आणि बायबलमधील हे मनोवेधक पुस्तक आपण कशाप्रकारे समजू शकतो याचे वर्णन केले जाईल.

रविवारी सकाळी शेवटची तीन भागांची परिचर्चा असेल. विषय असेल, “देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्‍यांसाठी सफन्याची अर्थपूर्ण भविष्यवाणी.” ही भविष्यवाणी प्राचीन काळांत यहुदा राष्ट्राला कशी लागू झाली व आज ती कशी लागू होते, खासकरून, जगातील धर्मांना कशी लागू होते हे या भाषणादरम्यान चर्चिले जाईल. त्यानंतर मग, तुम्हाला “आपल्या दिवसांकरता इशारेवजा उदाहरणे,” या शीर्षकाचे नाटक पाहायला मिळेल. वचनयुक्‍त देशात जायच्या फक्‍त काही काळाआधी इस्राएली पुरुष अनैतिकतेत कसे गुरफटले यावर हे नाटक आहे. रविवारी दुपारी अधिवेशनाच्या शेवटल्या कार्यक्रमातील जाहीर भाषण हे एक मुख्य आकर्षण असेल. त्याचा विषय असेल, “देवाच्या अद्‌भुत कार्यांकडे लक्ष का द्यावे.”

तिन्ही दिवशी अधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी आतापासूनच योजना करा. तुम्हाला कोणते ठिकाण जवळ पडेल ते पाहायला यहोवाच्या साक्षीदारांच्या स्थानीय राज्य सभागृहाशी संपर्क साधा किंवा या मासिकाच्या प्रकाशकांना लिहा.