व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नेकटाय पूर्वीचे आणि आताचे

नेकटाय पूर्वीचे आणि आताचे

नेकटाय पूर्वीचे आणि आताचे

पुरुषांनाही आपल्या गळ्याभोवती काही ना काही घालायची हौस होती आणि आजही आहे. उदाहरणार्थ, सा.यु.पू. १७३७ च्या सुमारास ईजिप्टच्या फारोने योसेफाला सोन्याचा हार दिला होता.—उत्पत्ति ४१:४२.

आज जगाच्या अनेक भागांत पुरुष नेकटाय घालतात. विविध स्रोतांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे १६ व्या शतकाच्या अंताला इंग्लंड आणि फ्रान्समध्ये गळ्याभोवती वस्त्र गुंडाळण्याची प्रथा सुरू झाली होती. पूर्वी पुरुष डब्लेट नावाचे जॅकेट घालायचे. आणि फॅशन म्हणून गळ्याभोवती रफ (पट्टा) बांधायचे. कधीकधी हा पट्टा खूपच जाडजूड असायचा. शुभ्र पांढऱ्‍या कापडाचा बनवलेला हा पट्टा कडक असायचा जेणेकरून तो मानेभोवती चांगला बसत असे.

हळूहळू रफऐवजी लोक फॉलिंग कॉलर वापरू लागले. हा पांढऱ्‍या रंगाचा कॉलर पूर्ण खांदाभर असायचा. या कॉलरला वॅन्डायक असेही नाव होते. प्युरिटन लोक असे कॉलर वापरायचे.

सतराव्या शतकात, नेहमीच्या लांब कोटाच्या आत लोक वेस्टकोट घालू लागले. असे दोन कोट घालणारे लोक, आपल्या गळ्याभोवती क्रॅवॅट किंवा स्कार्फसारखा मोठा रुमाल गुंडाळायचे. हा रुमाल इतका मोठा असायचा की त्याचे एकापेक्षा अधिक पदर असायचे. आणि मग रुमालाचे दोन्ही सैल टोक शर्टाच्या पुढे सोडलेले असायचे. १७ व्या शतकाच्या शेवटी शेवटी हे क्रॅवॅट खूप प्रचलित होते त्यामुळे त्या काळातील चित्रात ते पाहायला मिळतात.

हे क्रॅवॅट मसलीन, लॉन व लेसचे बनवलेले असत. लेसचे क्रॅवॅट महाग असायचे. असे म्हणतात की इंग्लंडचा जेम्स दुसरा याने त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी लेसचा क्रॅवॅट घातला होता. या लेसच्या क्रॅवॅटची ३६ पौंड आणि १० शिलिंग इतकी किंमत होती; अर्थात त्या दिवसांतील ही बरीच मोठी किंमत होती. काही काही लेस क्रॅवॅट खूप मोठे असत. वेस्टमिनस्टर ॲबी येथील चार्ल्स दुसरा याच्या एका पुतळ्यावरून आपल्याला हे पाहायला मिळते. त्याने १५ सेंटीमीटर रुंद आणि ८६ सेंटीमीटर लांबीचा क्रॅवॅट घातला आहे.

क्रॅवॅट्‌सची गाठ वेगवेगळ्या पद्धतींनी बांधली जात असे. काही वेळा, क्रॅवॅट गळ्याभोवती गुंडाळल्यावर त्याच्याभोवती एक रेशमी रिबन बो आकारात बांधली जात असे. ही गाठ हनुवटीच्या अगदी खाली असायची. याला सॉलिटेअर म्हटले जायचे. बो आजच्या बोसारखाच असायचा. असे म्हटले जाते की क्रॅवॅटची गाठ बांधण्याचे शंभर प्रकार होते. बो ब्रमल नावाच्या एका इंग्रज मनुष्याने एक क्रॅवॅट गाठ योग्यप्रकारे बांधण्यात एक संपूर्ण सकाळ घालवली असे म्हटले जाते.

अठराशे साठपर्यंत, लांब टोकाचे क्रॅवॅट, आजच्या नेकटाय सारखेच दिसू लागले. त्याला फोर-इन-हॅण्ड असे नाव पडले. चार घोड्यांची घोडागाडी चालवणारे स्वार अशाप्रकारचे टाय वापरत असल्यामुळे हे नाव पडले. नंतर मग, कॉलर असलेले शर्ट येऊ लागले. नेकटायची गाठ हनुवटीच्या अगदी खाली असायची आणि त्याचे दोन्ही टोकं शर्टावर पुढे असायचे. याच वेळी आधुनिक नेकटाय अवतरला. दुसऱ्‍या प्रकारचा नेकटाय ज्याला बोटाय म्हटले जाते तो १८९० च्या दशकात प्रसिद्धीस आला.

आज, अनेक जण नेकटायला पोशाखाचा महत्त्वपूर्ण हिस्सा समजतात. काही लोक तर, एखादी व्यक्‍ती ज्या प्रकारची टाय लावते त्यावरून तिची ओळख ठरवतात. म्हणूनच, स्वच्छ तसेच पॅन्ट आणि शर्टाच्या रंगसंगतीला मॅच होईल अशी टाय घालणे योग्य ठरेल.

तुमच्या टायची गाठ देखील छानपैकी बांधलेली दिसली पाहिजे. आजकाल फोर-इन-हॅण्ड या प्रकारातली गाठ जास्त चालते. (पृष्ठ १८ वरील चित्र पाहा.) ही गाठ दिसायलाही नीट असते व सर्व प्रसंगी चालणारी आहे. आणखी एक प्रकारची गाठ आहे जी काहीशी मोठी आहे. तिला विन्डसर नॉट म्हणतात. गाठीच्या अगदी खाली सहसा एक खळी पाडली जाते.

काही लोकांना टाय घातल्यावर गळ्याला फास लावल्यासारखे वाटते. गळा आवळल्यासारखा वाटतो. पण काहींच्या नंतर लक्षात आले, की खरे तर टायमध्ये नव्हे तर त्यांच्या शर्टची साईज लहान असल्यामुळे त्यांना असे गुदमरल्यासारखे वाटत होते. तुम्हालाही अशीच समस्या असेल तर तुमच्या शर्टाचा कॉलर आखूड तर नाही ना याची खात्री करा. योग्य मापाच्या कॉलरवर तुम्ही नेकटाय लावल्यास तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही नेकटाय लावला आहे.

पुष्कळ देशांत, व्यापारी जगतात किंवा औपचारिक प्रसंगी नेकटाय लावणे हे सभ्य समजले जाते. म्हणूनच, अनेक ख्रिस्ती बांधव सेवेच्या विविध पैलूंत भाग घेत असताना नेकटाय लावतात. यामुळे पुरुषाचे व्यक्‍तिमत्त्व अगदी उठून दिसते व तो आदरणीयही वाटतो.

[१८ पानांवरील रेखाचित्र]

(पूर्ण फॉर्मेटेड टेक्स्ट पाहायचे असेल तर प्रकाशन पाहा)

फोर-इन-हॅण्ड प्रकारची गाठ कशी बांधायची *

१ गळ्याभोवती टायचा निमुळता टोक उजवीकडे तर रूंद टोक डावीकडे असावे. दोन्ही टोकं गळ्याभोवती समांतर नसावेत तर रुंद टोक अरुंद टोकापेक्षा जास्त असावा.

२ त्यानंतर रुंद टोकाने अरुंद टोकावर दोन पीळ द्या

३ दुसरा पीळ देत असताना डाव्या हाताच्या दोन्ही बोटांनी आधीचा पीळ दाबून धरा.

४ दुसरा पीळ थोडा सैल ठेवून रूंद टोक त्यातून आत टाका व गाठ घट्ट बसण्यासाठी रूंद टोक खाली ओढा.

[तळटीप]

^ शर्ट ॲण्ड टाय या पुस्तकातून

[१९ पानांवरील चित्रे]

सतराव्या शतकापासून आजपर्यंतच्या टायचे प्रकार