व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आपला विमान-प्रवास सुखाचा होवो!

आपला विमान-प्रवास सुखाचा होवो!

आपला विमान-प्रवास सुखाचा होवो!

युएसए टुडेच्या एका वृत्तानुसार, “आठवड्यातून एकदा तरी प्रवाशांनी भरलेल्या विमानाला खाली करावे लागते.” बहुतेक वेळा, गंभीर असे काहीच कारण नसते. काही वेळा तर काहीच झालेले नसते. तरीही, खालील सूचना पाळल्यास प्रवाशांमध्ये जास्त गोंधळ होणार नाही:

उचित पेहराव. आरामदायी आणि सुटसुटीत कपडे घाला. अंग भरून घातलेले कपडे चांगले असतील. स्लॅक्स (पँट) आणि लांब बाह्‍यांचे टॉप्स सर्वात उत्तम. खासकरून सूती, लोकरीचे कपडे किंवा डेनिम आणि लेदरचे (चमड्याचे) नैसर्गिक सुताचे कपडे घाला. रेयॉन, पॉलियस्टर आणि नायलॉन (विशेषतः होजियरी) अशा कृत्रिम सुताचे कपडे टाळावेत कारण ते उष्णतेने वितळू शकतात. त्यामुळे शरीराला गंभीर दुखापत होऊ शकते.

मनाची तयारी करा. तातडीच्या वेळी तुम्ही काय कराल याचा आधीच विचार करा. तुमच्या जागेवर बसल्यावर तातडीच्या वेळी बाहेर पडण्यासाठी तुमच्या मागे तसेच पुढे असलेले सगळ्यात जवळचे दरवाजे कोठे आहेत हे पाहून घ्या. विमान उडण्याआधी, फ्लाईट अटेन्डंट ज्या सुरक्षा सूचना देतात त्या लक्षपूर्वक ऐका. तातडीची वेळ आलीच तर कोणत्या सूचना पाळाव्यात याबद्दलची तपशीलवार माहिती असलेले कार्ड वाचून घ्या.

घाबरून जाऊ नका. तातडीची वेळ आलीच तर गोंधळून जाऊ नका, शांत राहा आणि दिल्या जाणाऱ्‍या सूचना पाळा. अशा वेळी तर सर्वात जवळचा दरवाजा गाठण्याचा प्रयत्न करा; आपले सामानसुमान घेण्याच्या भानगडीत पडू नका.

विमानातून बाहेर पडताना सावधान असा. सर्वात आधी उंच टाचेचे बूट असल्यास ते काढा. हाताची घडी घालून छातीपुढे हात धरा. पायांमध्ये अंतर ठेवू नका. उडी मारून घसरणावरून जा; खाली बसून मग घसरायचा प्रयत्न करू नका. जमिनीवर पोहंचल्यावर, विमानापासून दूर पळा आणि तातडीच्या वाहनांकडे लक्ष असू द्या.

पण, या सर्व सूचना पाळल्याने खरोखर फरक पडू शकतो का? हो, निश्‍चितच! फेडरल एव्हीएशन ॲडमिनिस्ट्रेशनचे बातमीपत्र इंटरकॉम म्हणते की, “विमानाचे सगळेच अपघात घातक नसतात. तरीही, व्यापारी विमानांच्या साध्यासुध्या अपघातांमध्येच सुमारे ५० टक्के मृत्यू होतात.”