आमच्या वाचकांचे मनोगत
आमच्या वाचकांचे मनोगत
जादूटोणा मी १३ वर्षांचा आहे. माझ्या शाळेत एक मुलगी आहे जिचा जादूटोण्यावर विश्वास आहे. एकदा तिने मला त्याबद्दल माझे काय मत आहे असे विचारले. मी तिला सांगितले की मी एक यहोवाचा साक्षीदार आहे आणि माझा असल्या गोष्टींवर विश्वास नाही. तिला फार राग आला आणि तोच तोच प्रश्न ती मला सारखी विचारू लागली. मी यहोवाला प्रार्थना केली आणि मला लागलीच एका लेखाच्या रूपात मदत मिळाली. तो लेख होता: “बायबलचा दृष्टिकोन: जादूटोण्यामागे मूळात कोणाचा हात आहे?” (डिसेंबर ८, १९९९) मी तो लेख तिला दिला आणि त्यानंतर तिने मला कधीच प्रश्न विचारले नाहीत.
के. इ., अमेरिका
विसावे शतक “२० वे शतक उलथापालथीचा काळ” (डिसेंबर ८, १९९९) या लेखमालेबद्दल मी लिहीत आहे. २० व्या शतकाच्या त्रासदायक काळाचे तुम्ही केलेले वर्णन उत्कृष्ट होते. हिंसा मानवजातीला हळूहळू कशी पोखरत आहे हेसुद्धा मला पाहता आले. तुम्ही करत असलेल्या उत्तम कार्याबद्दल तुमचे अभिनंदन.
डब्ल्यू. जी., प्वेर्तो रिको
रक्तहीन औषधोपचार “रक्तहीन औषधोपचार आणि शस्त्रक्रिया—वाढती मागणी” (जानेवारी ८, २०००, इंग्रजी) ही लेखमाला नवनवीन पद्धतींचे संशोधन करून सादर करण्यात आली आहे. मी नर्सिंग करत आहे आणि तेथे माझ्यासोबतच्या एका विद्यार्थिनीला तसेच माझ्या एका शिक्षिकेलाही मी ही पत्रिका दिली. त्यांना यहोवाचे साक्षीदार आवडत नव्हते कारण त्यांच्याबद्दल त्यांना काही गैरसमज होते. पण मी त्यांना हे लेख दिले आणि त्यासोबत यहोवाच्या साक्षीदारांविषयी आणखी माहिती दिली तर त्यांना ते फार आवडले.
आर. पी., स्वीत्झर्लंड
माझ्या दोन मुलांचा १९९८ साली एक मोटार अपघात झाला होता. माझ्या मुलाचा पाय पूर्णपणे चिरडला गेला. त्याला रक्त नको असे तो वारंवार सांगत होता! पण त्या दवाखान्यात रक्तहीन शस्त्रक्रियेची काहीच व्यवस्था नव्हती. मग त्याला दुसऱ्या दवाखान्यात नेले, तर तेथे त्याच्या रक्तातील लाल पेशींचे प्रमाण ३५ वर येईपर्यंत शस्त्रक्रिया करता येणार नाही असे सांगितले. (त्याच्या रक्तातल्या लाल पेशींचे प्रमाण ८.१ वर आले होते.) पण ते मुद्दामहून काहीच औषधोपचार करत नव्हते. जणू काही, ते त्याच्या मरण्याची वाटच पाहत होते. पण मग त्यांनी रक्तहीन औषधोपचार सुरू केला (त्याचा पाय वर उचलणे, इरिथ्रोपोटीन देणे वगैरे) तसे त्याच्या रक्तातील लाल पेशींचे प्रमाण वाढून ३५.८ इतके झाले! शस्त्रक्रिया यशस्वी ठरली खरी, मात्र त्यांनी लवकर औषधोपचार सुरू न केल्यामुळे त्याला भारी नुकसान झाले. प्रत्येक डॉक्टरने, सर्जनने आणि अनेस्थेसियोलॉजिस्टने हे लेख वाचावेत असे मला वाटते.
एल. एल., अमेरिका
पुष्कळसे डॉक्टर यहोवाच्या साक्षीदारांना सहकार्य द्यायला तयार आहेत हे जाणून दिलासा वाटतो. ही पत्रिका मी माझ्या डॉक्टरांना देणार आहे. त्यांना ती निश्चितच आवडेल.
यु. एम., अमेरिका
माझ्यावर शस्त्रक्रिया होणार होती त्याच वेळी हा लेख प्रकाशित झाला. खूप रक्तस्त्राव झाल्यामुळे माझ्या रक्ताचे प्रमाण घटले तेव्हा या पत्रिकेच्या साहाय्याने दवाखान्यातल्या लोकांना आणि माझ्या कुटुंबातल्या सदस्यांनाही मी रक्त का घेणार नाही ते समजावून सांगितले. आणि यहोवामुळेच मी पूर्णपणे बरा झालो.
सी. बी., अमेरिका
तरुणांचे लेख मी १२ वर्षांची आहे. मला तुमच्या पत्रिका वाचायला फार आवडतात. एक कारण म्हणजे पूर्वी माझ्या मैत्रिणींशी माझे नीट जमत नव्हते कारण त्या सगळ्या जणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. पण “तरुण लोक विचारतात . . . ” हे लेख वाचल्यावर माझे आता त्यांच्याशी जमू लागले आहे. तुमच्या मदतदायी पत्रिकांबद्दल तुमचे खूप आभार.
एन. आय., रशिया