व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

निराळाच सम्राट!

निराळाच सम्राट!

निराळाच सम्राट!

पेंग्विन पक्षांच्या जातीमधील सर्वात मोठी जात एंपरर (सम्राट) पेंग्विनची आहे; एंपरर पेंग्विन एक मीटरहून जास्त उंच आणि जवळजवळ ४० किलो वजनाचे असतात. आन्टार्टिकाचा असह्‍य, काळोखी हिवाळा चुकवण्यासाठी इतर पेंग्विन उत्तरेला जाऊ लागतात तेव्हा एंपरर पेंग्विन दक्षिणेला आन्टार्टिकाकडे जातात! का बरे? पिलांना जन्म देण्यासाठी!

मादी एंपरर अंडे घालते तेव्हा नर पटकन ते अंडे आपल्या पायांवर उचलून घेतो. आणि मग, त्याच्या ओटीपोटावर असलेल्या त्वचेच्या घडीखाली ते ठेवतो. मग मादी पेंग्विन स्वतःसाठी अन्‍न शोधायला समुद्राकडे निघून जाते. पुढील ६५ दिवसांपर्यंत, कडाक्याच्या थंडीत नर पेंग्विन अंडे उबवित उभा असतो. या दरम्यान आपल्या शरीरात साठवून ठेवलेल्या चरबीच्या आधारे तो जिवंत राहतो. या मौसमात बर्फाची भयंकर वादळे होत असतात; त्यांचा वेग ताशी २०० किलोमीटर इतका असू शकतो. अशा वादळांमध्ये आपल्या शरीराची उष्णता कायम ठेवण्यासाठी हे पक्षी मोठे घोळके करून एकत्र उभे राहतात. त्यातला प्रत्येक पक्षी आळीपाळीने घोळक्याच्या बाहेरच्या बाजूला वादळी वाऱ्‍याकडे पाठ करून उभा राहतो.

मादी पेंग्विनची परतण्याची वेळ होते त्याच वेळी अंड्यातून पिल्लू बाहेर पडते. पण, एकसारख्या दिसणाऱ्‍या हजारो पक्ष्यांच्या घोळक्यामध्ये मादी आपल्या साथीदाराला कशी शोधणार? गीत गाण्याद्वारे. या पक्ष्यांमध्ये प्रणयराधनेच्या वेळी दोघेजण एकमेकांकरता गीत गातात, जे पुढे ते नेहमी लक्षात ठेवतात. जेव्हा मादी पेंग्विन परतते, तेव्हा नर आणि मादी अगदी तन्मयतेने आपापले गीत गातात. या सगळ्या कलकलाटात मनुष्य एकदम गोंधळून जातील, परंतु एंपरर पेंग्विन मात्र ताबडतोब आपल्या साथीदारांना शोधून काढतात. त्यानंतर, अंड्यातून नुकतेच बाहेर पडलेल्या आपल्या इवल्याशा पिलाला मादीकडे जड अंतःकरणाने सोपवून अगदी कमजोर झालेले हे नर पेंग्विन समुद्रामध्ये अन्‍न शोधायला जातात. त्यासाठी त्यांना सुमारे ७५ किलोमीटर बर्फावरून चालत किंवा पोटावरून घसरत जावे लागते.

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

By courtesy of John R. Peiniger