व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मानवी क्रूरता कधी थांबेल का?

मानवी क्रूरता कधी थांबेल का?

मानवी क्रूरता कधी थांबेल का?

सावध राहा! पत्रिकेचा मार्च ८, २००० (इंग्रजी) हा अंक गुलामगिरीच्या वादग्रस्त विषयावर आधारित होता. जगाच्या काही भागांमध्ये ही समस्या आजही अस्तित्वात आहे. या अंकाची एक प्रत, सामाजिक एकतेच्या इटालियन मंत्री, लिव्हिया टूर्को यांना देण्यात आली. इटलीतल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला लिहिलेल्या पत्रात त्या हे मान्य करतात की:

“आधुनिक प्रकारची गुलामगिरी, आज लाखो लोकांवर होत असलेला अत्याचार आहे. खासकरून स्त्रिया आणि लहान मुलांचा समावेश असलेली ही समस्या एक तातडीचा प्रश्‍न आहे.” त्या शेवटी म्हणतात: “या घृणास्पद वस्तुस्थितीच्या विरुद्ध उठवलेला प्रत्येक आवाज म्हणजे एक अमूल्य मदत आहे. आणि हा आवाज [सावध राहा! पत्रिकेच्या] वाचकांइतक्या जनतेपर्यंत पोहंचतो तेव्हा तर तो अधिकच प्रभावशाली ठरतो.”

सावध राहा! पत्रिकेच्या प्रत्येक अंकाच्या २ कोटींहून अधिक प्रती ८२ भाषांमध्ये वितरित होत असल्यामुळे लाखो वाचकांना आज हयात असलेल्या समस्यांविषयी माहिती दिली जाते. सोबतच त्या समस्यांवर बायबल-आधारित उपाय देखील सांगितले जातात.

तरीही, हा प्रश्‍न येतोच की, देव खरोखर अस्तित्वात आहे तर मग निष्पाप लोकांवर असा अत्याचार व्हायला तो अनुमती का देतो? पुष्कळजण असा विचार करतात की, ‘निर्मितीच्या अद्‌भुत कृत्यांमध्ये ज्याची असीम बुद्धी दिसून येते परंतु ज्याला लोकांबद्दल मुळीच दयामाया वाटत नाही असा निर्माणकर्ता मला कसा काय प्रिय वाटेल?’ या प्रश्‍नांची समाधानकारक उत्तरे, देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकात देण्यात आली आहेत. या ३२ पानी माहितीपत्रकाबद्दल तुम्हाला आणखी माहिती हवी असल्यास, सोबतचे कुपन भरून कृपया खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा या पत्रिकेच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवून द्यावे.

देव खरोखरी आपली काळजी करतो का? या माहितीपत्रकाविषयी मला अधिक माहिती पाठवा

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.