व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

अपंग प्रचारक “अ ब्राईट आउटलुक डिस्पाइट इन्फर्मिटीझ” (फेब्रुवारी २२, २०००, इंग्रजी) या लेखातील कॉनस्टान्टिन मॉरोझोव्ह यांचा अनुभव वाचल्यावर मला रडू आवरले नाही. माझे पती नाहीत आणि मला दोन मुले आहेत. त्यामुळे काही वेळा मला इतके कठीण वाटते की, माझ्या समस्या कधीच संपणार नाहीत असे वाटते. पण कॉनस्टान्टिन यांच्या तुलनेत तर माझ्या समस्या काहीच नाहीत!

आय., रशिया

मी पूर्ण वेळेच्या सेवेत आहे. मला एक नेत्रदोष आहे ज्यामुळे मला वाचताना फार त्रास होतो. मी पूर्वी अवांतर वाचन करायचे पण आता करता येत नसल्यामुळे कधी कधी फार वाईट वाटते. पण कॉनस्टान्टिन यांचा विचार केला तर मी तक्रार करू नये असे मला वाटते. कारण त्यांच्यासमोर डोंगरासमान अडचणी आल्या तरीही ते पूर्ण वेळेच्या सेवेत टिकून राहिले. यहोवा खरोखरच किती बळ देतो!

डब्ल्यू. डब्ल्यू., भारत

मी १६ वर्षांची असताना माझे अंग पायापासून खाली लुळे पडले. कॉनस्टान्टिन यांच्याप्रमाणे मलाही दररोज अडचणी येतात. परंतु, या लेखातून दिसून आले की अपंग लोकांनाही समाजात स्थान मिळू शकते आणि देवाच्या उपासनेत सहभाग घेता येऊ शकतो. मला नीट ऐकू येत नाही आणि नीट दिसतही नाही तरीही मी रस्त्यावर स्टूल ठेवते, त्यावर भिंतीला पाठ करून बसते आणि एकटीच प्रचार करते. कॉनस्टान्टिन यांच्या आवेशाबद्दल त्यांचे मी अभिनंदन करते.

डी. एफ., आयव्हरी कोस्ट

(g०० ११/२२)

आधुनिक गुलामगिरी मी १६ वर्षांची मुलगी आहे. तुमचा लेख खूपच हृदयस्पर्शी होता. आधुनिक गुलामगिरीच्या विळख्यात सापडलेल्या काही तरुण मुलींना मी स्वतः ओळखते. त्या दुसऱ्‍यांच्या घरात राहून दिवस न्‌ रात्र कष्ट करायच्या. त्यांना धड शिक्षण मिळत नाही किंवा प्रेमाचे चार बोल देखील ऐकायला मिळत नाहीत. यहोवा लवकरच जाच सहन करत असलेल्या अशा लोकांची सुटका करील हे बायबलमध्ये वाचून मला फार बरे वाटले.

ए. ओ., बर्किना फासो

(g०० ११/२२)

आत्महत्या “आत्महत्येच्या विळख्यात सापडतात कोण?” (मार्च ८, २०००) हा लेख अगदी समयोचित होता. आठ महिन्यांआधी माझ्या आईचा अचानक मृत्यू झाला. ती गेली तेव्हा बाबा तिच्याजवळ नव्हते; त्यामुळे ते स्वतःला दोष देत राहतात. मला आणखी जगायचे नाही असे सारखे म्हणत राहतात. म्हणून हे लेख माझ्या वडिलांसाठी आणि माझ्यासाठी फार फायद्याचे होते.

आर. झेड., जर्मनी

माझ्या आजोबांनी दोन वर्षांआधी आत्महत्या केली. माझी आजी गेल्यामुळे त्यांची मनःस्थिती चांगली नव्हती. त्यांनी आत्महत्या का केली हे समजायला तुमच्या लेखांनी खूप मदत केली आहे.

ए. एम., अमेरिका

जानेवारीत माझ्या ४८ वर्षांच्या भावाने आत्महत्या केली. त्याच्या दफन विधीच्या दुसऱ्‍याच दिवशी माझ्या वडिलांना (जे यहोवाचे साक्षीदार नाहीत) सावध राहा! मासिकाचा हा अंक पत्र पेटीत सापडला. त्यांच्या तोंडून शब्दच फुटेना. त्यांनी तो अंक आम्हाला दाखवला. त्यांना अश्रू आवरता येत नव्हते. सांत्वन देणारी ही लेखमाला पाहून सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणि कृतज्ञतेचे भाव होते.

बी. जे., अमेरिका

आमच्या शाळेमध्ये, गेल्या वर्षात सहा मुलांनी आत्महत्या केली. हे सगळे इतके चिंताजनक होते की आमच्या शाळेमध्ये आत्महत्येबद्दल सतर्क असण्याविषयी घोषित करण्यात आले. आम्ही ही मासिके त्या ठिकाणी दिली जेथे सहसा लोक आमचे ऐकत नाहीत. पण काही वेळा तर असे घडले की आमचे बोलणे संपण्याआधीच लोक आमच्या हातातले मासिक काढून घेत!

सी. सी., अमेरिका

मी किशोरवयीन होतो तेव्हा माझ्या वडिलांचा मृत्यू झाल्यावर मी दोनदा आत्महत्या करायचा प्रयत्न केला. काही लोक तर “आत्महत्या” हा शब्द उच्चारतसुद्धा नाहीत. तुम्ही मात्र हा शब्द सावध राहा! मासिकाच्या मुखपृष्ठावर छापल्याबद्दल तुमचे खूप आभार. त्या लेखांमध्ये उघडपणे चर्चा केली होती आणि इतरांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न केला होता तसेच ते लेख वास्तविक दृष्टिकोनातून लिहिलेले होते असे मला वाटते.

एम. जी., फ्रान्स

(g०० ११/८)

मित्रमैत्रिणींमधील समस्या “तरुण लोक विचारतात . . . माझ्या मैत्रिणीनं माझं मन का दुखावलं?” (मार्च ८, २०००) या लेखाचा मला बराच फायदा झाला. साडेसहा वर्षांपासून माझ्याशी मैत्री असलेल्या मैत्रिणीने माझे मन दुखावले होते. तुमच्या लेखातल्या सल्ल्यानुसार माझ्या मैत्रिणीने आणि मी अगदी शांतपणे यावर चर्चा केली. त्याचा परिणाम असा झाला आहे की, आता आमच्या मैत्रीचे बंधन आणखीन दृढ झाले आहेत.

एम. एल., अमेरिका

(g०० ११/८)