व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

कोवळ्या दातांची काळजी

कोवळ्या दातांची काळजी

कोवळ्या दातांची काळजी

तुम्हाला दात केव्हापासून येऊ लागले हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही आईच्या उदरात असतानाच! आश्‍चर्य वाटले ना? पण हे खरे आहे. उलट, तुमच्या आईला तुम्ही पोटात आहात हे कळण्याआधीच कदाचित तुमच्या दातांची वाढ सुरू झाली असेल! म्हणूनच, गरोदर मातेला कॅल्शियम, फॉस्फोरस, प्रथिने आणि जीवनसत्त्वांचे योग्य प्रमाणात पोषण मिळणे फार आवश्‍यक असते.

आणि बालक नुकतेच जन्मल्यावर काय? तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, बाटलीची सवय असलेल्या बालकांचे दात लवकर किडतात. त्याची सुरवात समोरच्या वरील दातांनी होते. याचे कारण काय असावे? काही बालकांना बाटलीने दूध, फळांचा रस, साखरेचे पाणी किंवा सोडा पिता पिताच झोपायची सवय असते. हे पदार्थ आंबतात. त्यांच्यामधील कर्बोदके सूक्ष्मजंतुंसाठी पोषक ठरतात. हे सूक्ष्मजंतू बाळांच्या दातांना नुकसान पोहंचवणारी आम्ले तयार करतात. खासकरून ही आम्ले रात्रभर तोंडात राहिली तर नुकसान होण्याची जास्त शक्यता असते. काही मुलांचे दात तर एकदम खराब झालेले असतात. याचा, त्यांच्या कायमच्या दातांच्या विकासावर परिणाम होतो.

आपल्या बालकांच्या कोवळ्या दातांची काळजी घेण्यासाठी पालक काय करू शकतात? स्तनपान हा उपाय सुचवला जातो. कारण एकतर आईचे दूध निर्जंतूक असते आणि दुसरी गोष्ट त्यात भरपूर प्रमाणात प्रतिद्रव्ये असतात. परंतु, काही कारणास्तव बाटलीचा उपयोग केला जात असल्यास तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, बाळ १८ महिन्यांचे झाल्यावर बाटलीने पाजणे बंद करावे. त्यांचे असेही म्हणणे आहे की, केवळ भरवतानाच बाटलीचा उपयोग करावा. बाळाला शांत करण्यासाठी बाटली वापरू नये. शिवाय, झोपताना बाळाच्या तोंडात बाटली दिली जात असल्यास, त्यात फक्‍त साधे पाणी देणेच सर्वात उत्तम असेल. बाळाला भरवल्यावर प्रत्येक वेळी, स्वच्छ, मऊ कापडाने त्याचे दात पुसून घ्यावेत.

लहानपणीच दातांची कीड टाळणे शक्य आहे. दातांची योग्य काळजी—बालकांसाठीही—अत्यावश्‍यक आहे!

(g०० ११/२२)