व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

मतप्रसार मी नुकताच जुलै ते सप्टेंबर २००० अंक वाचून काढला. “ऐकलेल्या प्रत्येक गोष्टीवर विश्‍वास ठेवावा का?” ही लेखमालिका प्रसिद्ध केल्याबद्दल आभारी आहे. आमच्या भागात अलीकडे रोमनीज (जिप्सी) लोकांना विनोदाचा विषय बनवण्याचे फॅड सुरू झाले आहे. त्यांना चोरी करण्याची सवय असते असा समज असल्यामुळे यावरून त्यांच्याबद्दल बरेच विनोद केले जातात. पण तुमचे लेख वाचल्यानंतर मला जाणीव झाली की अशाप्रकारचे विनोद करणे योग्य नाही आणि मी त्यांत सामील व्हायचे नाही असे ठरवले आहे.

के. एम., चेक गणतंत्र

(g०१ ३/८)

फॉरेनला जावं का? “तरुण लोक विचारतात . . . मी फॉरेनला जावं का?” (जुलै ते सप्टेंबर २०००) या लेखाबद्दल धन्यवाद. मी ही मालिका नेहमी वाचतो, पण कधीकधी मला वाटायचे की तुम्ही तरुणांना असलेल्या धोक्यांविषयी थोडी अतिशयोक्‍ती करता. मागच्या वर्षी मी आंतरविद्यापीठ सांस्कृतिक कार्यक्रमाच्या निमित्ताने परदेशी गेलो होतो. हा कार्यक्रम एक आगळावेगळा अनुभव जरूर होता, पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून मात्र तो श्रेयस्कर नव्हता.

एम. पी., इटली

हा लेख तसेच “तरुण लोक विचारतात . . . परदेशी गेल्यावर यशस्वी होण्यासाठी काय करावे?” (जुलै २२, २०००, इंग्रजी) हा लेख माझ्याकरता “यथाकाळी” मिळालेले आध्यात्मिक अन्‍न ठरले. (मत्तय २४:४५) परकी भाषा शिकण्याकरता मी एक वर्ष दुसऱ्‍या देशात जाऊन राहण्याचे आधीच ठरवले होते. त्यामुळे तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल व व्यावहारिक सूचनांबद्दल मी मनापासून आभारी आहे.

आय. झेड., स्वित्झर्लंड

(g०१ ३/८)

हसा “हसा—नि ठणठणीत राहा!” हा अत्यंत उपयुक्‍त लेख प्रसिद्ध केल्याबद्दल आभारी आहे. (जुलै ते सप्टेंबर २०००) त्यात दिलेल्या माहितीशी मी पूर्णपणे सहमत आहे. सर्ववेळी सकारात्मक विचार केल्यामुळे माझ्या चेहऱ्‍यावर नेहमी स्वाभाविक हास्य उमटेल याची मला या लेखातून तुम्ही आठवण करून दिली. खरंच, हसमुख राहिल्यामुळे इतरांशी मैत्री करणे सोपे जाते. शिवाय तणावपूर्ण भावना देखील दूर होतात.

पी. सी. चीन

(g०१ ३/८)

नेकटाय “नेकटाय—पूर्वीचे आणि आताचे” या लेखात अतिशय रोचक माहिती प्रसिद्ध केल्याबद्दल मी प्रशंसा व्यक्‍त करू इच्छिते. (जुलै ते सप्टेंबर २०००) मला तीन मुले आहेत. त्यांना यहोवावर प्रेम करायला शिकवण्याचा मी प्रयत्न करत आहे. माझा थोरला मुलगा १३ वर्षांचा आहे आणि ईश्‍वरशासित सेवा प्रशालेत भाग नेमले जातात तेव्हा त्याला टाय लावावा लागतो, पण त्याला आणि मलाही टायची गाठ बांधता येत नव्हती. माझे पती सत्यात नाही आणि त्यांनीही आयुष्यात कधी टाय लावलेला नाही. इतक्या सोप्या पद्धतीने टायची गाठ बांधायला शिकवण्याबद्दल आभारी आहे.

एम. बी., संयुक्‍त संस्थाने

मी अकरा वर्षांचा आहे. तुम्हाला आश्‍यर्च वाटेल पण तुमच्या लेखातील चित्रांवरूनच मी पहिल्यांदा टाय बांधायला शिकलो. आता माझ्याजवळ असलेले सगळे टाय मला वापरता येतील!

ए. पी., इटली

(g०१ २/२२)

ॲनाकोंडा आमच्या भागात सहसा ॲनाकोंडा आढळतात. लोक या सर्पांबद्दल निरनिराळ्या गोष्टी सांगतात, पण त्यांच्यावर विश्‍वास ठेवावा की नाही हे ठरवायला कधीकधी कठीण जाते. “ॲनाकोंडा—अलीकडेच उजेडात आलेली खास माहिती” (जून ८, २०००) हा लेख वाचल्यावर मला मिथ्यकथा आणि वस्तूस्थिती यांतला फरक कळला आणि सृष्टीतील या अद्‌भुत प्राण्यांविषयीच्या माझ्या सर्व शंका देखील दूर झाल्या.

जे. एस. पी., ब्राझील

(g०१ २/८)