व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भाज्या पाहून नाक मुरडू नका!

भाज्या पाहून नाक मुरडू नका!

भाज्या पाहून नाक मुरडू नका!

ब्राझील येथील सावध राहा! लेखकाकडून

“कडू लागतात.” “छी, मला खाववत नाहीत.” “मी पूर्वीपासूनच खात नाही.”

भाज्या पाहून नाक मुरडणारे अशी वेगवेगळी निमित्तं सांगतात. तुमच्याबद्दल कसे? तुम्ही दररोज भाज्या खाता का? काही लोकांना भाज्या आवडतात तर काहींना आवडत नाहीत. असे का, हे जाणून घेण्याकरता सावध राहा! तर्फे काही मुलाखती घेण्यात आल्या.

भाज्या खाणाऱ्‍यांनी सांगितले की भाज्या, डाळी आणि फळं खाणे किती महत्त्वाचे आहे हे त्यांच्या आईवडिलांनी त्यांना शिकवले होते. दुसरीकडे पाहता, भाज्या पाहून नाक मुरडणाऱ्‍यांनी लहानपणापासूनच भाज्या खाण्याची सवय नसल्याचे सांगितले. उलट त्यांना चटपटीत फराळाचे पदार्थ जास्त आवडायचे. पण या लोकांनी देखील कबूल केले की प्रकृतीसाठी भाज्या खाणे अतिशय महत्त्वाचे आहे.

आईवडिलांनो, आपल्या लहान मुलांना भाज्या खाण्याची सवय लावा! हे कसे करता येईल? युनायटेड नेशन्स चिल्ड्रन्स फंड यांनी प्रकाशित केलेल्या जीवनाकरता उपयुक्‍त सत्ये (इंग्रजी) या पुस्तकात असा सल्ला दिला आहे की जवळजवळ सहा महिन्यांच्या मुलांना अंगावरचे किंवा बाटलीतून दूध पाजल्यानंतर दिवसातून निदान एकदा तरी उकडून, सोलून कुस्करलेल्या भाज्या द्याव्यात. लहान मुलांच्या आहारात जितके जास्त प्रकारचे पदार्थ असतील तितके त्यांच्या आरोग्याला हे हितकारक ठरेल. ब्राझीलियन बालरोगतज्ज्ञ डॉ. वेग्नर लापाटे म्हणतात की पहिल्या दोन वर्षांत दूध हा मुलांचा मुख्य आवश्‍यक आहार असला तरीही इतर प्रकारचे अन्‍नपदार्थ दिल्यामुळे “नवनवीन पदार्थ चाखण्याची बाळाला सवय लागते.”

मेडिसिना—मितूस ई वर्दादिस (औषधे—मिथ्य आणि सत्य) या पुस्तकात, कार्ला लेओनल असा सल्ला देतात की लहान बाळांना, वरती सांगितले आहे त्याहीपेक्षा आधी थोड्या प्रमाणात संत्र्याचा रस आणि (केळी, सफरचंद आणि पपई यांसारख्या) फळांचा घट्ट रस, धान्यांपासून तयार केलेले खाद्य पदार्थ आणि भाज्यांचे सूप देण्यास हरकत नाही. अर्थात याविषयी बऱ्‍याच जणांची वेगवेगळी मते असल्यामुळे बालरोग विशेषज्ञांचा सल्ला घेणे चांगले राहील.

(g०१ १/८)