व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तिचा विश्‍वास आणखी पक्का झाला

तिचा विश्‍वास आणखी पक्का झाला

तिचा विश्‍वास आणखी पक्का झाला

न्यूयॉर्क राज्यातील एका स्त्रीने विल देअर एव्हर बी अ वर्ल्ड विदाऊट वॉर? या ३२-पानी माहितीपत्रकाविषयी असे लिहिले: “हे [माहितीपत्रक] मला खूप आवडले आणि तुमची मी खूप आभारी आहे म्हणून हे पत्र लिहीत आहे. मी स्वतः यहुदी नाही; माझी आई यहोवाची साक्षीदार होती. पण आजपर्यंत या पुस्तकाइतक्या इतर कोणत्याही पुस्तकाने माझे हृदय स्पर्शून गेले नाही!

“सुरवातीला ते वाचायला मी मागेपुढे पाहत होते कारण ते खास यहुद्यांसाठी लिहिलेले असल्यामुळे मला ते फारसे समजणार नाही असे मला वाटले. पण हा माझा चुकीचा ग्रह होता. त्यातल्या सर्व गोष्टी खूप स्पष्ट आणि तर्कशुद्ध पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या.”

इतिहासात काही लोकांनी खूप अत्याचार सहन केला आहे. गेल्या शतकात, नात्सी शासनकाळातील प्रचंड कत्तलीत यहुद्यांचे असेच हाल झाले. विल देअर एव्हर बी अ वर्ल्ड विदाऊट वॉर? हे वाचण्यास आम्ही तुम्हाला आमंत्रण देतो. त्यामध्ये, “देवाने दुष्टाईला परवानगी का दिली आहे?” “खऱ्‍या देवाला ओळखणे—म्हणजे काय?” आणि “कोण राष्ट्रांना शांतीमय परिस्थितीत नेईल?” या विषयांवर चर्चा केली आहे.

अधिक माहितीसाठी कृपया सोबत दिलेले कुपन भरून त्यावरील पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर ते पोस्ट करा. (g०१ ६/२२)

विल देअर एव्हर बी अ वर्ल्ड विदाऊट वॉर? या माहितीपत्रकाची एक प्रत मला पाठवा.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.