व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

विवाह वाचवणे एप्रिल-जून, २००१ सावध राहा! अंकातील “आमचा विवाह आम्ही वाचवू शकू का?” या लेखमालिकेबद्दल मी मनापासून आभार मानू इच्छितो. वर्षभरापूर्वी माझी पत्नी व मी अनेक वैवाहिक समस्यांना तोंड देत होतो. लहानपणी आमच्या दोघांच्या कुटुंबात भांडणतंटे म्हणजे रोजचाच प्रकार होता. त्यामुळे आम्हा दोघांनाही एकमेकांना खोचक बोलण्याची सवय होती आणि यामुळे सहसा आमच्यात कडाक्याची भांडणे व्हायची. पण आता बायबल तत्त्वांचे पालन करू लागल्यामुळे आम्ही खूप आनंदात आहोत.

आर. ओ., अमेरिका (g०१ ८/२२)

मी एका मंडळीत वडील या नात्याने सेवा करतो. आपण प्रेमहीन विवाहात अडकलो आहोत असे वाटू लागलेल्यांना मदत करणे मला सर्वात कठीण आव्हान वाटते. आजपर्यंत संस्थेच्या प्रकाशनांतून या विषयावर भरपूर मार्गदर्शन करण्यात आले होते. पण या अंकाचे मुखपृष्ठ पाहताच मला खातरी पटली की अशा बांधवांना अधिक स्पष्ट रूपात मदत करण्यासाठी हा अंक अगदी उपयुक्‍त ठरेल. यातील लेख माझ्या अपेक्षेप्रमाणेच उत्कृष्ट होते!

एल. आर., अमेरिका (g०१ ८/२२)

माझ्या वैवाहिक जीवनाला काही अर्थच राहिला नव्हता. माझ्या पतीला व मला एकमेकांबद्दल प्रेम नसून केवळ राहायचे म्हणून सोबत राहात आहोत असे वाटू लागले होते. कधीकधी मला घटस्फोट घ्यावा असे वाटायचे. पण “आमचा विवाह आम्ही वाचवू शकू का?” ही लेखमालिका (एप्रिल-जून २००१) आमच्या प्रेमाला जणू संजीवनी ठरली आहे.

ई. आर., स्पेन (g०१ ९/८)

मी एक ख्रिस्ती पत्नी आहे पण मागचे वर्ष माझ्या वैवाहिक जीवनातील सर्वात दुःखदायक होते. मी व माझ्या पतीने एकमेकांना इतके दुखवले होते की आमचा संबंध पुन्हा पूर्वीसारखा होणे अशक्य वाटू लागले. पण मी हे लेख वाचले तेव्हा जणू यहोवा म्हणत होता, ‘इतक्यात हार मानू नका!’ एकेकाळी आम्हाला एकमेकांबद्दल वाटणारे प्रेम पुन्हा जागृत करण्याचा कसोशीने प्रयत्न करण्याची प्रेरणा मला मिळाली. आणि माझे पती देखील प्रतिसाद देऊ लागले आहेत. मी हे लेख पुन्हा पुन्हा वाचेन.

एन. एच. जपान (g०१ ९/८)

अलीकडेच माझा बाप्तिस्मा झाला. माझी पत्नी यहोवाची साक्षीदार नाही व ती मला विरोध करते. तुमच्या लेखांतून माझे वैवाहिक जीवन सफल कसे बनवता येईल हे मला दिसून आले आहे. हे लेख अगदी योग्य वेळी आले आहेत.

डब्ल्यु. एस., ऑस्ट्रेलिया (g०१ ९/८)

माझे वैवाहिक जीवन सुखी आहे. त्यामुळे मी हे लेख इतरांना मदत करण्यास उपयोगी पडतील या विचाराने वाचायला घेतले. पण अगदी पहिल्या ओळींपासून मला माझ्या स्वतःचा वैवाहिक संबंध कशाप्रकारे दृढ करता येईल याविषयी व्यावहारिक मुद्दे शिकायला मिळाले.

एम. डी. इटली (g०१ ९/८)

माझ्या मंडळीतल्या एका ख्रिस्ती बहिणीने मला सांगितले की विश्‍वासात नसलेल्या तिच्या पतीसोबत तिचे भांडण झाले व ते दोघे विभक्‍त झाले. काही दिवसांनी ती म्हणाली की आता परिस्थिती बरीच सुधारली आहे. तिने या लेखातला शब्दन्‌शब्द वाचला आणि तिला तिची समस्या सोडवण्याकरता फार मदत मिळाली. ती म्हणाली की सुसंवाद साधण्याविषयीची माहिती सर्वात उपयुक्‍त होती. तिचे पती व ती आता पुन्हा एकत्र आले आहेत.

एन. एस. कॅनडा (g०१ ९/८)

दुधाचे दात मी दंतवैद्याच्या कार्यालयात काम करते. माझ्या कामाचा एक भाग म्हणजे मातांना त्यांच्या मुलांच्या दातांची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करणे. “कोवळ्या दातांची काळजी” (जानेवारी ८, २००१) हा लेख मला अत्यंत सहायक ठरला कारण यात अम्लनिर्मिती आणि कीड लागण्याच्या धोक्याविषयी बरीच माहिती आहे. माझ्याकडे येणाऱ्‍या सर्व मातांना मी या अंकाची एक प्रत देते आणि यामुळे अतिशय चांगले परिणाम घडून आले आहेत!

टी. सी. एस., ब्राझील (g०१ ७/८)