व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जागतिक एकता केवळ स्वप्न नाही

जागतिक एकता केवळ स्वप्न नाही

जागतिक एकता केवळ स्वप्न नाही

भारतातील केरळ राज्यातील एका गृहस्थाने या मासिकाच्या प्रकाशकाला असे लिहिले: “तुमचे सावध राहा! मासिक इतर सर्व मासिकांपेक्षा एकदम वेगळे आहे. मला वाटते की, असा एकही विषय नसेल ज्याविषयी या मासिकात छापून आले नाही. खासकरून निसर्गविषयक लेख वाचायला मला खूप आवडतात.”

या गृहस्थाला सावध राहा! मासिक एका खास कारणासाठी आवडते. तो म्हणतो: “माझ्या मते, वेगवेगळ्या राष्ट्रांच्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण करण्यासाठी सावध राहा! मासिकाचा हात इतर कोणतेही मासिक धरू शकणार नाही. सावध राहा! मासिकाप्रमाणे जागतिक एकतेला इतर कोणत्याही मासिकामध्ये प्रोत्साहन दिले जात नाही. मी वाचत असलेल्या सर्व मासिकांशी तुलना केल्यास सावध राहा! हे एक मौल्यवान मासिक आहे असेच मी म्हणेन.”

या वाचकाने सावध राहा! मासिकाविषयी केलेले निरीक्षण प्रत्येक अंकाच्या पृष्ठ ४ वरील उद्देशानुरूप आहे; तेथे म्हटले आहे: “ते राजकीयदृष्ट्या नेहमी तटस्थ राहते आणि एका जातीला दुसऱ्‍या जातीपेक्षा श्रेष्ठ समजत नाही.” सर्वात महत्त्वाचे म्हणजे, जीवनाच्या महत्त्वपूर्ण प्रश्‍नांची उत्तरे प्राप्त करण्यासाठी निर्माणकर्त्याकडे पाहण्याचे उत्तेजन सावध राहा! देते.

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे ३२-पानी माहितीपत्रक देखील हेच करते. त्यातील १६ अध्यायांपैकी, “देव कोण आहे?,” “पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?,” आणि “देवाचे राज्य म्हणजे काय?” हे अध्याय आहेत. सोबत दिलेले कुपन भरून त्यावरील पत्त्यावर किंवा या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर ते पोस्ट करून तुम्ही या माहितीपत्रकाविषयी अधिक माहिती मिळवू शकता. (g०१ ७/२२)

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाविषयी मला अधिक माहिती पाठवा

□मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.