व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

द्वेषाची जागतिक साथ

द्वेषाची जागतिक साथ

द्वेषाची जागतिक साथ

द्वेष नावाचा राक्षस मोकाट सुटला आहे. संपूर्ण जगभर त्याने थैमान घातले आहे.

बाल्कन राष्ट्रांतील एक प्रांत, जातीय भेदभावांमुळे अलीकडेच झालेल्या कत्तलीतून सावरत आहे. शतकानुशतकांपासून मनात बाळगलेल्या द्वेषभावनेमुळे कत्तली, बलात्कार, बहिष्कार, घरांची व गावांची जाळपोळ, लूटमार, पीकांचा व गुराढोरांचा नायनाट, उपासमार या गोष्टी घडत आहेत. सुरूंग पेरण्याची समस्या अजूनही आहे.

आग्नेय आशियातील पूर्व तिमोरमध्ये घातपात, मारहाण, अंदाधूंद गोळीबार आणि जबरदस्तीने घरांमधून किंवा गावांमधून घालवून दिले जाण्याच्या भीतीने ७,००,००० लोकांना आपली घरेदारे सोडून पळावे लागले. ही ओसाड ठिकाणे हल्ला करणाऱ्‍या लष्करी गटांनी उद्‌ध्वस्त केली आहेत. त्यांपैकी एकजण रडत रडत म्हणाला: “शिकार केल्या जाणाऱ्‍या प्राण्यासारखी आमची गत झाली आहे.”

मॉस्कोत, अतिरेक्यांनी घडवून आणलेल्या एका भयंकर बॉम्ब स्फोटात एक निवासी इमारत बेचिराख झाली. ९४ निष्पाप लोकांचे देह—ज्यांपैकी काही लहान मुले होती—स्फोटामुळे अस्ताव्यस्त पडली होती. १५० हून अधिक लोक जखमी झाले. अशा भयंकर घटनांमुळे, ‘पुढचा बळी कोण असणार?’ हा प्रश्‍न लोकांना भेडसावत आहे.

कॅलिफोर्नियातील लॉस एंजेलीझ येथे जातीय भेदभाव मानणाऱ्‍या एका इसमाने, अद्याप शालेय वय न झालेल्या लहान यहुदी मुलांच्या एका घोळक्यावर गोळ्या झाडल्या आणि नंतर एका फिलिपिनो पोस्टमनला ठार मारले.

या सर्व कारणांमुळे, द्वेषभावना ही एक जागतिक साथ आहे असे म्हणायला हरकत नाही. जातीय, वांशिक किंवा धार्मिक द्वेषभावनेत अंदाधुंदीची भर पडल्यास काय घडते यासंबंधी आपल्याला जवळजवळ दररोज बातम्या ऐकायला-वाचायला मिळतात. राष्ट्रे, समाज आणि कुटुंबांमध्ये कशी फूट पडते, सरसकट नरसंहार करण्यात राष्ट्रे कशी भाग घेतात, काही लोक दुसऱ्‍यांपेक्षा फक्‍त “वेगळे” असल्यामुळे त्यांना कल्पनेपलीकडील अमानुष वागणूक कशी दिली जाते हे सगळे आपण पाहतो.

द्वेष नावाच्या राक्षसाला गजाआड करायचे असेल तर आधी अशा द्वेषपूर्ण हिंसेचे आपण मूळ समजून घेतले पाहिजे. द्वेषभावना मनुष्यांच्या जनुकांमध्ये आहे का? की द्वेषभावना निर्माण केली जाते? द्वेषाचे चक्र मोडून काढणे शक्य आहे का? (g०१ ८/८)

[३ पानांवरील चित्राचे श्रेय]

Kemal Jufri/Sipa Press