व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

डेटिंगचे वय नाही? “तरुण लोक विचारतात . . . हे डेटिंगचे वय नाही असे माझे पालक म्हणत असतील तर?” (जानेवारी २२, २००१, इंग्रजी) हा लेख मला मनापासून आवडला. मी १७ वर्षांचा आहे आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहंचलो आहे की, मी लग्नासाठी किंवा कुटुंबाची जबाबदारी उचलण्यासाठी अद्याप तयार नाही. या लेखाने मला हे समजायला मदत केली आहे की, डेटिंग करण्याआधी नीट विचार करावा तसेच एक दिवशी मी डेटिंग करायचे व लग्न करायचे ठरवीन तेव्हा समजबुद्धीने पाऊल उचलावे.

ए.एम.एच., अमेरिका (g०१ १०/८)

फोनवर बोलणाऱ्‍या दोन व्यक्‍तींच्या चित्रातल्या भावना मी समजू शकते कारण मीसुद्धा त्याच दिशेने जात होते. मी अद्याप डेटिंग करायला तयार नसल्यामुळे मला एका व्यक्‍तीबरोबरचे संबंध तोडावे लागले. यासारख्या लेखांमुळे थांबून राहण्याचा माझा निर्धार कायम राखायला मदत मिळते.

एम.आर.के., अमेरिका (g०१ १०/८)

मी १४ वर्षांची आहे. आणि मी लग्नासाठी अजून तरी तयार नसल्यामुळे या वयात डेटिंग करणे किती धोकेदायक आहे हे समजण्यास मला या लेखाने मदत दिली. आता प्रेमात वगैरे पडण्याऐवजी यहोवासोबत नातेसंबंध निर्माण करण्याची गरज आहे हे पाहण्यास मला या लेखाने मदत केली.

ए. पी., कॅनडा (g०१ १०/८)

हा लेख जणू काही माझ्यासाठीच लिहिला होता. मला वाटत होते की, माझे आईवडील फार कडक आहेत आणि माझ्या भावना त्यांना समजत नाहीत. पण आता मला कळाले आहे की, ते माझी मदत करण्याचा आणि मला संरक्षण देण्याचा होता होईल तितका प्रयत्न करत आहेत. “तरुण लोक विचारतात” या सदरातील पुढील लेखांची मी उत्सुकतेने वाट पाहात आहे!

एच. ए., रोमानिया (g०१ १०/८)

लेखाने जीव वाचला आम्हाला लेनी नावाचा एक गृहस्थ भेटला जो म्हणाला की, “डेंग्यू—चावण्यामुळे संभवणारा ताप” (ऑगस्ट ८, १९९८) या लेखामुळे त्याच्या पुतणीचा जीव वाचला. तिला कित्येक दिवसांपासून ताप होता आणि अंगावर पुरळ उठली होती; पण गोवर झाल्याचे समजून तिच्या पालकांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते. लेनीला हा लेख वाचल्याचे आठवले; त्याने पुन्हा तो लेख काढून डेंग्यूच्या लक्षणांविषयी वाचले. मग त्याने आपल्या पुतणीच्या आईवडिलांना तिला दवाखान्यात घेऊन जायला तयार केले. तेथील डॉक्टरांनी खात्रीने सांगितले की तिला डेंग्यू रक्‍तस्रावी ज्वर झाला आहे. आपल्या पुतणीचा जीव वाचवल्यामुळे लेनीने सावध राहा!  मासिकाचे आभार मानले आणि नंतर गृह बायबल अभ्यास करायला तयारी दाखवली.

एच.एम.एल., फिलिपाईन्स (g०१ ११/८)

सूर्य सूर्य, चंद्र आणि सुंदर पृथ्वी दिल्याबद्दल मी यहोवाचे सहसा आभार मानते पण या गोष्टींचा जास्त विचार करत नाही. “आपला अनोखा सूर्य” (इंग्रजी) (मार्च २२, २००१) हा लेख वाचल्यावर देवाने उदारपणे दिलेल्या मोलवान देणग्यांसाठी त्याचे आभार मानायला मला मनापासून प्रार्थना करण्याची प्रेरणा झाली.

बी. पी., अमेरिका (g०१ १२/८)

केस मी हेअरड्रेसर म्हणून काम करते. “तुमच्या केसांचे जवळून परीक्षण” (जुलै-सप्टेंबर २००१) हा लेख वाचल्यावर मला खूप आनंद झाला. माझ्या मालकीणीला मी या मासिकाची एक प्रत दिली. तिलासुद्धा तो लेख खूप आवडला आणि तिने इतर मुलींना तो वाचायला दिला. या लेखातील व्यावहारिक माहितीबद्दल तुमचे धन्यवाद.

डी. एल., रोमानिया (g०१ १२/८)

“ॲलोपिसिया—केस गळण्याची उपायहीन समस्या” (इंग्रजी) (एप्रिल २२, १९९१) या आधीच्या लेखाचा उल्लेख करणारी तळटीप दिल्याबद्दल आभारी आहे. १७ वर्षांपासून मला ही समस्या आहे. स्वरूपाला जास्त महत्त्व देणाऱ्‍या व वेगळे दिसणाऱ्‍या कशाचाही स्वीकार न करणाऱ्‍या आजच्या या जगात मला निदान यहोवा आणि त्याच्या संघटनेचा आधार आहे हे जाणून दिलासा मिळाला.

जी. जी., ईटली (g०१ १२/८)