जगावरील दृष्टिप्क्षेप
जगावरील दृष्टिप्क्षेप
पर्जन्यारण्ये
भारतात, केवळ केरळच्या दक्षिण राज्यातच पर्जन्यारण्ये असल्याचा समज होता. परंतु अलीकडेच, पर्यावरणसंशोधक, सौम्यदीप दत्ता यांनी ईशान्येकडील आसाम आणि अरुणाचल प्रदेशच्या राज्यांना जोडणाऱ्या ५००-चौरस-किलोमीटरच्या पर्जन्यारण्य प्रदेशाचा शोध लावला, असे नवी दिल्लीच्या डाऊन टू अर्थ या पत्रिकेत वृत्त आले होते. या अरण्यात अनेक वन्य प्राण्यांना—जसे की, “३२ जातीचे सस्तन प्राणी आणि २६० जातीचे पक्षी, त्याचप्रमाणे दुर्मिळ जातीचे हत्ती, वाघ आणि क्लाऊडेड लेपर्ड (बिबळ्या), चायनिस पँगोलिन, स्लॉथ अस्वल, सांबर, हुलॉक गिब्बन, कलिज फेझंट, हॉर्नबिल आणि वुड डक” यांना निवारा मिळतो. तरीही, जंगलातील उत्पादनांसाठी आंतरराष्ट्रीय मागणी असल्यामुळे अनेक पर्जन्यारण्ये धोक्यात आहेत असे डाऊन टू अर्थ म्हणते. काही सृष्टिवैज्ञानिकांना अशी भीती वाटते की, प्रमाणापेक्षा जास्त कापणी केल्याने ही उत्पादने नाहीशी झालीत तर पर्जन्यारण्यांचे संरक्षण करता येणार नाही; उलट ती जमीन शेतीसाठी वापरावी लागेल. (g०१ १०/८)
हिवतापाचे औषध आता गुणकारक नाही
‘झांबियात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येणारे क्लोरोक्वीन हे हिवतापावरील औषध सरकारी दवाखान्यांमध्ये रोगाच्या प्रथमोपचारात वापरण्याचे थांबवून’ इतर गुणकारी औषधे वापरली जाणार आहेत, असे वृत्त टाईम्स ऑफ झांबिया यात आले होते. “दरवर्षी झांबियात हिवतापामुळे पाच वर्षांखालील बालकांच्या २५,००० मृत्यूंपैकी १२,००० मृत्यू क्लोरोक्वीनला प्रतिकारकता असल्यामुळे घडत आहेत” असे एका अभ्यासामधून निष्पन्न झाल्यानंतर या औषधांचा वापर थांबवण्यात आला आहे. हा बदल बहुतेक पूर्व आणि दक्षिण आफ्रिकन देशांमध्येही करण्यात आला आहे. “क्लोरोक्वीन गेल्या ३० हून अधिक वर्षांपासून या देशात यशस्वीरित्या वापरण्यात आले असले तरी देशातील पहिल्या क्रमांकाचा घातक रोग असलेल्या हिवतापावर ते गुणकारी राहिलेले नाही,” असे टाईम्स म्हणते. (g०१ १०/२२)
हत्तीसारखी स्मरणशक्ती?
केनियाच्या अँबोसली राष्ट्रीय उद्यानात कार्य करणाऱ्या संशोधकांना हे आढळले आहे की, हत्तींच्या कळपाचे जिवंत राहणे सर्वात म्हाताऱ्या मादीच्या स्मरणशक्तीवर अवलंबून असते. “३५ वर्षे वय असलेल्या मादांपेक्षा . . . ज्येष्ठ हत्तीणी अर्थात कमीत कमी ५५ वर्षे वय असलेल्या मादा, मित्र आणि शत्रू यांच्यातील फरक ओळखण्यात तरबेज असतात,” असे वृत्त सायन्स न्यूज देते. संपर्क साधण्याचा ढोंग करण्याचे आवाज, किंवा लघुकंप्रतेचे गुरगुरणे लक्षात ठेवल्यामुळे ज्येष्ठ हत्तीणी अनोळखी आवाज ओळखतात आणि संरक्षक पावित्र्यात कळपाला एकत्र आणतात. त्या अहवालानुसार, “एक मादी आपल्याच वयाच्या १०० हत्तींना त्यांच्या आवाजावरून ओळखू शकते.” त्यामुळे, बेकायदेशीर शिकार करणारे जेव्हा एखादी म्हातारी हत्तीण मारतात तेव्हा संपूर्ण कळप जणू एक मोठा माहितीसंग्रह गमावतो. (g०१ ११/२२)
नशेत सायकल चालवणे धोकेदायक
दारू पिऊन सायकल चालवणे हे दारू पिऊन कार चालवण्याइतकेच घातक असू शकते, असे न्यू सायंटिस्ट पत्रिका म्हणते. “सायकल चालवण्यासाठी मोटार चालवण्यापेक्षा अधिक मानसिक व शारीरिक ताळमेळीची गरज असल्यामुळे दारूचा अधिक जास्त परिणाम होतो,” असे अमेरिकेतील मॅरीलंड येथील जॉन हॉपकिन्स विद्यापीठाचे ग्वाह्वा ली म्हणाले. ली आणि त्यांच्या साथीदारांनी ४६६ सायकल चालकांचा अभ्यास केला आणि त्यांना आढळले की, चार किंवा पाच ड्रिंक घेतलेल्या सायकल चालकांना जखमी होण्याची किंवा ठार मारले जाण्याची २० पट अधिक शक्यता होती. एक ड्रिंक घेतल्यावरही सायकल चालवणे सहा पटीने अधिक धोकेदायक होते. न्यू सायंटिस्ट म्हणते की, “त्यात, सायकल चालक जितके अधिक पितात तितकीच हेल्मेट घालण्याची शक्यता कमी होते.” (g०१ १०/२२)
केळीच्या झाडापासून कागद
केळीचे उत्पन्न काढल्यावर, त्याचे दांडे सहसा खतासाठी जमिनीवर तसेच राहू दिले जातात. तथापि, नागोया शहर विद्यापीठाच्या प्राध्यापक हिरोशी मोरीशिमा यांनी केळीच्या दांड्यांपासून कागद बनवण्यात यश मिळवले आहे असे जपानच्या असाही शिंबुन बातमीपत्रात वृत्त देण्यात आले. या वनस्पतीचे धागे “लांब आणि मजबूत असून मॅनिला हेंपपासून कागद तयार करण्यासाठी मिळणाऱ्या कच्च्या मालाइतक्याच उत्कृष्ठ प्रतीचे आहेत.” यंत्रांमध्ये तयार केला जाणारा केळीच्या दांड्याचा कागद सर्वसाधारण छपाईच्या कागदाच्या प्रतीचा असून पुनःक्रिया केलेल्या छपाईच्या कागदापेक्षा चांगला सिद्ध झाला आहे. “जगभरात १२३ देशांमध्ये दरवर्षी ५,८०,००,००० टन इतके केळीचे उत्पन्न होत असल्यामुळे हे अत्यंत फायदेकारक समजले जाते,” असे बातमीपत्रात म्हटले आहे. (g०१ १०/२२)
धार्मिक लूटमार
फ्रेंच कॅथलिक बातमीपत्र, ला क्र्वा यात म्हटले आहे की, “नियमांची कडक अंमलबजावणी केल्यावरही धार्मिक वस्तूंची चोरी आणि व्यापार कमी होत नाही.” चोरलेल्या वस्तूंमध्ये, क्रॉस, फर्निचर, चोन्या-चांदीच्या वस्तू, मूर्ती, रंगवलेली चित्रे आणि ऑल्टरसुद्धा आहेत. आंतरराष्ट्रीय संग्रहालय मंडळानुसार, अलीकडील वर्षांमध्ये चेक प्रजासत्ताकमधून ३०,००० ते ४०,००० वस्तू आणि ईटलीतून ८८,००० पेक्षा अधिक वस्तू चोरल्या गेल्या. ८७ कॅथेड्रल असलेला फ्रान्सही चोरट्यांचे मुख्य लक्ष्य आहे. १९०७ ते १९९६ दरम्यानच्या काळात, “ऐतिहासिक” समजल्या जाणाऱ्या सुमारे २,००० वस्तू फ्रान्समधील धार्मिक संस्थांमधून चोरल्या गेल्या आणि त्यातील १० टक्के वस्तूही पुन्हा प्राप्त करण्यात आल्या नाहीत. या लूटमारीवर नियंत्रण करणे कठीण आहे कारण चर्चेसमध्ये सहसा जाणे केव्हाही शक्य असते आणि तेथे पुरेशी सुरक्षा व्यवस्थाही नसते. (g०१ १२/८)
जगामध्ये दूध उत्पादनात अग्रगण्य
द हिंदुस्तान टाईम्सनुसार भारत आता दूध उत्पादनात सर्वात अग्रगण्य स्थानी आहे. या वृत्तानुसार, “[अमेरिकेतील वॉशिंग्टन डी.सी., येथील] पर्यावरणसंबंधी वर्ल्डवॉच संस्थेने भारतातील दूध क्रांतीचे कौतुक केले. १९९४ पासून दूध हे भारताचे मुख्य उत्पादन होते आणि १९९७ साली भारताने जगातील सर्वात अग्रगण्य असलेला दूध उत्पादक म्हणून अमेरिकेला मागे टाकले.” वर्ल्डवॉच संस्थेचे अध्यक्ष, लेस्टर ब्राऊन यांनी असे म्हटल्याचे वृत्त आहे: “उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, हे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांनी खाद्यासाठी धान्य वापरण्याऐवजी उप-पदार्थ आणि पीकांचा अवशेष यांचा उपयोग केला. भारत, मानवांसाठी उपयोगात आणले जाणारे धान्य गुरांना न देता, प्रथिनयुक्त खाद्याची मात्रा वाढवू शकला.” (g०१ १२/२२)
नळाचे पाणी आणि बाटलीबंद पाणी
“बाटलीबंद पाण्याची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, जगभरात याच्या ७०० कंपन्या आहेत,” असे वृत्त द न्यूयॉर्क टाईम्सने दिले. परंतु, “पुष्कळदा महागड्या बाटलीबंद पाण्यात आणि नळाच्या पाण्यात फरक फक्त बाटलीचाच असतो.” वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचरने (डब्ल्यूडब्ल्यूएफ) दाखवल्याप्रमाणे, “अनेक देशांमध्ये बाटलीबंद पाणी नेमक्या किंमतीपेक्षा १,००० पटीने अधिक किंमतीत विकले जात असले तरीही ते नळाच्या पाण्याइतकेच असुरक्षित किंवा आरोग्याकरता हानीकारक असू शकते.” नळाचे पाणी वापरल्याने केवळ पैसे वाचत नाहीत तर पर्यावरण शुद्ध राखायलाही मदत होते कारण दरवर्षी पाण्याच्या बाटल्या तयार करण्यासाठी १५ लाख टन प्लास्टिक उपयोगात आणले जाते आणि “बाटल्यांचे उत्पादन करताना व त्यांची विल्हेवाट लावताना निर्माण होणाऱ्या विषारी रसायनांमुळे वातावरणात बदल घडवण्यास कारणीभूत असलेले वायू निर्माण होऊ शकतात.” डब्ल्यूडब्ल्यूएफ आंतरराष्ट्रीय शुद्ध पाणी कार्यक्रमाचे मुख्य, डॉ. बिकशॅम गुज्जा यांच्या मते, “युरोप आणि अमेरिकेत नळाच्या पाण्याला बाटलीबंद पाण्याच्या उद्योगापेक्षा अधिक नियम लागू केले जातात.” (g०१ १२/८)
अश्लील छायाचित्रांचा व्यवसाय
“अश्लील छायाचित्रांचा व्यवसाय फुटबॉल, बास्केटबॉल आणि बेसबॉलच्या एकत्रित खेळांपेक्षाही मोठा आहे. अमेरिकेत लोक एका वर्षात चित्रपटाच्या तिकीटांवर खर्च करत नाहीत किंवा कलेच्या एकंदर प्रकारांवर खर्च करत नाहीत इतका पैसा अश्लील चित्रांवर खर्च करतात,” असे द न्यूयॉर्क टाईम्स पत्रिका म्हणते. “पोर्न नेटवर्क तसेच केबल आणि सॅटेलाईटवरील जादा पैसा देऊन पाहण्याचे चित्रपट, इंटरनेट वेबसाईट्स, हॉटेलांमध्ये दाखवले जाणारे चित्रपट, फोनवरील सेक्स, कामोत्तेजक साधने आणि . . . मासिके यांचा समावेश केल्यास अश्लील छायाचित्रांच्या व्यवसायाचे अमेरिकेतील वार्षिक उत्पन्न १०-१४ अब्ज डॉलर इतके असल्याचा अंदाज केला जातो.” त्या लेखात पुढे म्हटले आहे: “१० अब्ज डॉलर उत्पन्न असलेला अश्लील छायाचित्रांचा व्यवसाय, ६० कोटी डॉलर उत्पन्न असलेल्या मुख्य चित्रपट उद्योगाच्या तुलनेत छोटे आकर्षण राहिलेले नाही—तर तोच प्रमुख व्यवसाय बनला आहे.” उदाहरणार्थ, मागच्या वर्षी हॉलीवुडने ४०० नवीन चित्रपट प्रसिद्ध केले तर अश्लील चित्रपट उद्योगाने “प्रौढांकरता” असलेले ११,००० व्हिडिओ काढले. पण, हे व्हिडिओ पाहिल्याचे फार कमी अमेरिकन मान्य करतात. “अश्लील चित्रांच्या व्यवसायाच्या तोडीचा दुसरा व्यवसाय नाही,” असे टाईम्स म्हणते. “अश्लील चित्रांचा हा एकमेव व्यवसाय आहे जो कोणी पाहत नाही आणि तरीही आश्चर्य म्हणजे, तो बंद पडत नाही”! (g०१ १२/८)