व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

उत्तम आरोग्य “सर्वांकरता उत्तम आरोग्य—शक्य आहे का?” (जुलै-ऑक्टोबर २००१) या लेखमालेतून मला खूप सांत्वन आणि प्रोत्साहन मिळाले. मी एक मनोरुग्ण आहे आणि मी याआधी आत्महत्येचाही विचार केला आहे. दररोज माझ्यासमोर असा प्रश्‍न असतो, ‘माझा हा दिवस कसा जाईल?’ या मासिकाने मला प्रकटीकरण २१:४ येथे ‘डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकण्याच्या’ अभिवचनाची आठवण करून दिली.

सी. टी., जपान (g०२ २/८)

तुमच्या उत्कृष्ट लेखांबद्दल आभारी आहे. मी नॅचरोपॅथीचा एक डॉक्टर आहे आणि आजारपण राहणार नाही त्या दिवसाची वाट पाहत आहे. मग मी आताच्या कामातून सुटका मिळवून मला अत्यंत आवडणारे दुसरे काम म्हणजे शेती करू शकेन!

बी. सी., अमेरिका (g०२ २/८)

पतंग मी १४ वर्षांची आहे, “देखणा पतंग” हा लेख मला खूप आवडला. (जुलै-ऑक्टोबर २००१) पतंग दिसायला चांगले नसतात असे मला नेहमी वाटायचे पण हा लेख वाचल्यावर आता मी त्यांना मारणार नाही!

बी. सी., अमेरिका (g०२ २/८)

हा लेख वाचताना एक पतंग माझ्या पायाजवळ येऊन बसला. इतका देखणा पतंग मी याआधी कधीच पाहिला नव्हता! निसर्गाची खरोखर अद्‌भुत किमया आहे आणि आपण त्याचे निरीक्षण केले तर देवाबद्दल आपले प्रेम अधिकच गहिरे होईल.

जी. पी., इटली (g०२ २/८)

यहोवाने निर्माण केलेल्या पतंगांचे सौंदर्य, त्यांची विविधता याचा मी कधीच विचार केला नाही; सगळेच कीटक घाणेरडे असतात असे मला वाटायचे. हा लेख वाचल्यानंतर माझ्या झाडांना पाणी घालत असताना एक सुंदर पतंग माझ्याजवळ आला. यहोवाच्या या निर्मितीबद्दल व मला निरीक्षण करायला लावणारा तो लेख दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानले.

सी. एस., अमेरिका (g०२ २/८)

द्वेष अलीकडे माझा भाऊ मला भेटायला आला होता. तो जाहीरपणे आपली कडवी मते मांडतो याची मला काहीच कल्पना नव्हती. तो वेगवेगळ्या जातींच्या विरुद्ध अत्यंत कटुतेने बोलत होता. मला त्याला मदत करावेसे वाटत होते पण हा विषय काढायचा कसा तेच मला कळत नव्हते. पण “द्वेषाचे चक्र मोडून काढणे” ही लेखमाला असलेला ऑगस्ट ८, २००१ चा अंक पाहिल्या पाहिल्या माझ्या प्रार्थनेचे उत्तर मिळाल्याचे मला जाणवले.

एल. बी., अमेरिका (g०२ ३/२२)

तुम्ही दिलेली माहिती एखाद्या तर्कशुद्ध रीतीने विचार करणाऱ्‍या व्यक्‍तीला अगदीच न पटणारी होती. तुम्ही म्हणालात: “बायबलही म्हणते, की अपरिपूर्ण मानवांमध्ये जन्मतःच दुर्गुण व दोष असतात. (उत्पत्ति ६:५; अनुवाद ३२:५) अर्थात, ही गोष्ट सर्व मानवांना लागू होते.” पण ही दोन शास्त्रवचने विशिष्ट समयी आणि विशिष्ट ठिकाणी दोन विशिष्ट गटांना उद्देशून म्हटली होती. ती सर्व मानवांना लागू करता येत नाहीत.

डी. सी., चेक प्रजासत्ताक

“सावध राहा!” चे स्पष्टीकरण: हे खरे आहे की, हे शब्द विशेषकरून प्रलयाआधीच्या लोकांना आणि इस्राएल राष्ट्राला लागू होत होते. परंतु, बायबलमध्ये हे वारंवार स्पष्ट करण्यात आले आहे की, “सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत.” (रोमकर ३:२३; ५:१२; ईयोब १४:४; स्तोत्र ५१:५) त्यामुळे, इस्राएली लोकांचा आणि प्रलयाआधीच्या लोकांचा उल्लेख मानवी अपरिपूर्णतेची उदाहरणे म्हणून करण्यात आला आहे. (g०२ ३/२२)

नावाहो सँडी यासी ड्‌झोसी या नावाहो स्त्रीने कथित केलेला “देवाच्या नावाने माझे आयुष्य बदलले!” (ऑक्टोबर-डिसेंबर २००१) हा लेख अत्यंत प्रोत्साहनदायक आणि उत्कृष्ट होता त्याबद्दल तुमचे आभार मानते. तिचा अनुभव वाचून माझे हृदय स्पर्शून गेले आणि माझ्या डोळ्यात पाणी भरले. प्रेम आणि आनंद मिळवण्यासाठी आणि दुःखावर मात करण्यासाठी तिने केलेल्या प्रयत्नांविषयी वाचून मला आशा मिळाली आहे. यहोवा देवाला आपल्या सर्वांबद्दल किती प्रेम आहे याची मला जाणीव झाली!

ए. एस., अमेरिका (g०२ ३/२२)