व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

मत्स्यापासून चपला

पेरूतील अँडीज पर्वतांमध्ये एक नवा उद्योग सुरू झाला आहे; तेथे ट्राऊट माशाच्या कातडीचे जोडे तयार केले जाऊ लागले आहेत, असे वृत्त एल कमर्सियो या लिमाच्या वृत्तपत्रात आले होते. मत्स्याची अंडी उबवतात किंवा मत्स्यपालन करतात त्या केंद्रामधून आलेली माशाची कातडी स्वच्छ करून नैसर्गिक पदार्थांनी कमावली जाते. त्यानंतर, तिला तेल लावून हळद, कोचिनियल किंवा आचिऑट यांसारख्या नैसर्गिक पदार्थांनी रंग दिला जातो. या प्रक्रियेमुळे कातड्यांवरची आकर्षक चौकोनी नक्षी खराब होत नाही; अशा कातडीपासून “पैशाच्या पर्सेस, वॉलेट, घड्याळाचे पट्टे किंवा सेलफोनसाठी आवरणे” तयार करता येतात. या प्रकल्पाची सुरवात केलेल्या औद्योगिक अभियंत्या बार्बरा लेओन म्हणतात: “सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कातडी कमावण्यासाठी वापरला जाणारा क्रोमियमसारखा कृत्रिम पदार्थ कधीच वापरला जात नाही. यामुळे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही आणि ट्राऊट माशाची कातडी पर्यवरणासाठी सुरक्षित असलेला पदार्थ ठरतो.” (g०२ ३/८)

हास्य—अजूनही सर्वोत्तम औषध

“चार आठवड्यांपर्यंत दररोज औषध म्हणून दिलेल्या गंमतीदार करमणुकीमुळे खिन्‍नतेची लक्षणे नाट्यमयरित्या कमी होतात असे आढळले आहे,” हे वृत्त लंडनच्या दि इंडिपेन्डेंट यात दिले आहे. “काही रुग्णांना उपचार म्हणून दररोज ३० मिनिटे विनोदी कलाकारांच्या कॅसेट ऐकायला दिल्यामुळे ते बरे झाले, तर काहींच्या लक्षणांची तीव्रता निम्म्याने कमी झाल्याचे त्यांना आढळून आले.” अमेरिकेत घेतलेल्या १०० हून अधिक अभ्यासांवरून हे दिसून आले आहे की, विनोद करून हसवणे फायदेकारक ठरू शकते. केवळ खिन्‍न असलेल्यांसाठीच नाही तर अलर्जी, उच्च रक्‍तदाब, दुर्बल प्रतिकारकशक्‍ती तसेच कर्करोग व सांधेदुखी असलेल्यांसाठी देखील हे गुणकारक ठरले आहे. हसणे आरोग्यासाठी चांगले आहे हे खूप आधीपासून मानले जाते पण त्याचा नेमका फायदा कसा होतो याबद्दल अद्याप स्पष्ट माहिती नाही. तथापि, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. एड डंकलब्लाऊ असा इशारा देतात: अपमानकारक आणि उपहासात्मक विनोद टाळा, आणि प्रमाणापेक्षा जास्त विनोदी असू नका. नाहीतर, रुग्णाला असू वाटू शकते की, त्याच्या समस्येला हसण्यावारी घालवले जात आहे. (g०२ ३/८)

धुरामुळे हार्टअटॅकचा धोका वाढतो

“अनेक कॅनडेयिन शहरांना वेढणाऱ्‍या धुराच्या दाट धुक्यामुळे दोन तासांच्या आत हार्टॲटक येऊ शकतो,” असे वृत्त कॅनडाच्या नॅशनल पोस्ट वृत्तपत्राने दिले. धुरामध्ये खासकरून गाड्यांमधून, विद्युतकेंद्रांमधून आणि शेकोटींमधून बारीक, अदृश्‍य दूषके बाहेर पडतात. “असे बारीक कण असलेल्या तीव्र प्रदूषित हवेत राहिल्यानंतर हार्टअटॅक संभावू शकणाऱ्‍या मधुमेही रुग्णांना, हृदयविकार असलेल्या लोकांना किंवा वृद्ध जनांना दोन तासांच्या आत हार्टअटॅकचा धोका ४८ टक्क्यांनी वाढला,” असे ते वृत्तपत्र सांगते. “हा धोका २४ तासांमध्ये ६२% वाढला.” धुराच्या सूचना दिल्या जातात तेव्हा, “अधिककरून घराच्या आतच आणि शक्य असल्यास एअर कंडिशनिंग सुरू करून राहण्याचा प्रयत्न करा,” असे हार्वर्ड विद्यापीठाच्या वैद्यकीय विद्यालयाचे डॉ. मरे मिटलमन सुचवतात. “हे कण इतके लहान असतात की ते घरातील हवेत शिरत नाहीत आणि शिरल्यास एअर कंडिशनिंगमुळे गाळले जातात.” (g०२ ३/८)

विवाहाआधी एकत्र राहणे

कॅनडाचे नॅशनल पोस्ट म्हणते की, “लग्न होण्याआधीच एकत्र राहिलेले पालक वेगळे होण्याची शक्यता दोन पटीने अधिक आहे.” स्टॅटिसटिक्स कॅनडा याद्वारे घेतल्या जाणाऱ्‍या अभ्यासाच्या सहलेखिका हिदर ज्यूबी म्हणाल्या की, मूल होणे हे पालकांचे एकमेकांना दिलेल्या वचनबद्धतेचे सूचक असेल अशी अपेक्षा संशोधक करत होते. “परंतु, [विवाहाविना] एकत्र राहण्यामध्ये ज्या जोडप्यांना हरकत नसते ते वेगळे व्हायलाही पुढेमागे पाहत नसतात.” संशोधकांना हे आढळले की, विवाहाआधी एकत्र न राहिलेल्या १३.६ टक्के पालकांच्या तुलनेत विवाहाआधी एकत्र राहिलेले २५.४ टक्के पालक वेगळे झाले. ज्यूबी म्हणतात, “विवाहाआधी एकत्र राहणाऱ्‍या लोकांची नाती इतकी स्थिर नसतात, कारण [विवाहाविना एकत्र] राहायला तयार होणारे लोक तेच असतात जे कदाचित विवाहाच्या वचनबद्धतेला इतके महत्त्व देत नसतात.” (g०२ ३/८)

जन्मठेप—पोळ्यात

न्यू सायंटिस्ट हे मासिक म्हणते, “आफ्रिकन मधमाश्‍यांनी नको असलेल्या पाहुण्यांशी निपटण्याची एक विचित्र परंतु अत्यंत प्रभावशाली पद्धत निर्माण केली आहे. ते या [पाहुण्यांना] पोळ्यातील तुरुंगामध्ये डांबून ठेवतात. शिक्षा देण्याच्या या पद्धतीमुळे परजीवींवर नियंत्रण केले जाते आणि गरज पडल्यास, पोळ्यातील सर्वांना पळून जायलाही वेळ मिळतो.” “दक्षिण आफ्रिकेतील माश्‍या, त्यांच्यापेक्षा निम्म्या आकाराच्या अथिना टुमिडा नावाच्या कीटकापासून स्वतःचे संरक्षण कसे करतात याचा अभ्यास” संशोधकांनी केला. त्यांपैकीचे एक संशोधक, पीटर नॉयमन, यांनी या कीटकाला “रणगाडा” असे नाव दिले. त्यामुळे, या कीटकांना बंद करून ठेवणे हाच तेवढा पर्याय मधमाशांकडे असतो. नॉयमन म्हणतात, “काही माश्‍या तुरुंग बांधतात तर बाकीच्या [माश्‍या] कीटक पळून जाऊ नयेत म्हणून सतत पाळत ठेवत असतात.” या मधमाश्‍या बांधकामासाठी कच्चा राळ जमा करतात आणि हे बांधकाम पूर्ण करायला त्यांना चार दिवस लागतात. युरोपातील तसेच उत्तर अमेरिकेतील मधमाश्‍यांमध्ये हे वर्तन वैशिष्ट्य दिसून येत नाही. सुमारे पाच वर्षांआधी अमेरिकेत चुकून आणल्या गेलेल्या या कीटकाने पोळ्यावर हल्ला केल्यास ते पोळे “अक्षरशः नष्ट होते.” (g०२ २/२२)

प्रदूषणावर नियंत्रण ठेवणारे प्राणी

प्राणीतज्ज्ञ स्टीव्ह हॉपकिन यांच्या मते, हवा आणि जमिनीतल्या प्रदूषणाचे मापन करण्यासाठी गांडूळ सर्वात उत्तम प्राणी आहेत. विपुलतेत उपलब्ध असलेले व स्वस्त असलेले हे गरीब प्राणी सर्वात अत्याधुनिक कृत्रिम साधनांपेक्षा उत्तम कार्य करतात. कॉमन मसल (कालव) यांचा उपयोग पाण्याचा दर्जा ठरवण्यासाठी केला जातो. मसलमॉनिटर हे बादलीच्या आकाराचे साधन ज्यात आठ जिवंत मसल्स असतात, ऱ्‍हाईन आणि डॅन्यूब नद्यांमधील प्रदूषण मोजण्यासाठी प्रभावशाली ठरले आहे. “एखाद्या दूषकाचे प्रमाण अचानक वाढल्यास हे मसल्स लगेच ओळखतात,” असे या साधनाचे निर्माते कीस क्रेमर म्हणतात. वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक दूषक असल्यास हे मसल्स आपले शिंपले बंद करतात आणि यामुळे मसलमॉनिटरमध्ये धोक्याची सूचना दिसू लागते. या साधनांचा मुख्य फायदा हा आहे की, जिवंत प्राण्यांवरील प्रदूषणाच्या परिणामाचे मापन ती करतात, असे स्पेनच्या एल पाइस यात वृत्त दिले आहे. (g०२ २/२२)

बायबल भाषांतराचा नवा उच्चांक

ब्रिटनच्या बायबल संस्थेच्या अहवालानुसार, “पूर्ण बायबल किंवा त्याचा काही भाग एकूण २,२६१ भाषांमध्ये उपलब्ध असून १२ महिन्यांआधीपासून यात २८ [भाषांची] वाढ झाली आहे. संपूर्ण [बायबल] आता ३८३ भाषांमध्ये, म्हणजेच एका वर्षाआधी होते त्यापेक्षा १३ अधिक भाषांमध्ये उपलब्ध आहे.” इब्री किंवा ग्रीक शास्त्रवचनांचे (जुना आणि नवा करार या नावानेही ओळखले जाणारे) संपूर्ण खंड आता ९८७ भाषांमध्ये उपलब्ध आहेत. (g०२ २/२२)

जाणीवपूर्वक संमतीला पुष्टी

जानेवारी १९९१ मध्ये पहिला नियम काढून दहा वर्षे झाल्यावर इटलीच्या स्वास्थ्य मंत्रालयाने पुन्हा याची आठवण करून दिली आहे की, रुग्णाने जाणीवपूर्वक संमती दिल्याविना त्याला रक्‍त संक्रमण दिले जाऊ शकत नाही. जानेवारी २५, २००१ तारखेचा हा नियम गझेटा उफिश्‍याले डेला रेपुब्लीका इटाल्याना (इटालियन प्रजासत्ताकाचे अधिकृत बातमीपत्र) यात छापून आला होता: “रक्‍ताचे किंवा रक्‍ताच्या घटकांचे संक्रमण आणि/किंवा रक्‍ताचे पदार्थ देणे यात धोका असू शकतो हे माहीत करून दिल्यावर, ग्रहण करणाऱ्‍याने आधीच आपली संमती किंवा नकार लेखी द्यावा.” (g०२ ३/२२)

इंटरनेटवर अंत्यसंस्कार

द जपान टाईम्स यात वृत्त दिल्यानुसार, आता इंटरनेटवर चक्क कबरांना भेट देता येते. मृत व्यक्‍तीला तिचे मित्र किंवा नातेवाईक इंटरनेटवरूनच श्रद्धांजली वाहू शकतात. कम्प्युटरच्या स्क्रीनवर कबरेचे चित्र शिवाय मृत व्यक्‍तीचा फोटो आणि संक्षिप्त माहिती दिसते. शिवाय, भेट देणाऱ्‍यांना काही संदेश देण्यासाठी जागा देखील दिलेली असते. बौद्ध धर्मीयांकरता फळे, फुले, अगरबत्त्या आणि दारू वाहण्यासाठी देखील सोय केली आहे आणि हे सर्व केवळ माऊस क्लिक करून करता येते. तडाशी वॉटानाबे, इंटरनेटवरील स्मारक सेवा संस्थेचे अध्यक्ष म्हणतात, “काहींच्या मते, ज्यांना कबरांना भेटी देता येत नाही जसे की, बाहेरगावी राहणाऱ्‍या लोकांकरता ही उत्तम कल्पना आहे.” (g०२ ३/२२)