व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मध सुमधूर औषध

मध सुमधूर औषध

मध सुमधूर औषध

काही वैद्यकीय संशोधकांना मधाच्या परिणामकारक पूतिनाशक आणि दाह कमी करणाऱ्‍या गुणांविषयी उत्सुकता आहे. कॅनडाच्या द ग्लोब ॲण्ड मेल यात असे वृत्त आले होते: “सर्वात अत्याधुनिक प्रतिजैव औषधे देखील औषधांचा प्रतिकार करणाऱ्‍या जिवाणुंवर निकामी ठरली आहेत; परंतु संसर्गित जखमांच्या बाबतीत मध काही प्रमाणात तरी परिणामकारक ठरते.”

मधामध्ये असे कोणते औषधी गुणधर्म आहेत? फुलांमधून मकरंद गोळा करणाऱ्‍या कामकरी माशीमुळे ते औषधी होते. या माशीच्या थुंकीत ग्लुकोज-ऑक्सीडेज नावाचे एक एंझाईम असते जे मकरंदातील ग्लुकोजचे विघटन करते. त्या वेळी, हायड्रोजन पेरॉक्साईट नावाचा एक उपपदार्थ निर्माण होतो; जखमांना स्वच्छ व निर्जंतुक करण्यासाठी पारंपरिकरित्या याचाच वापर केला जातो. सहसा, हायड्रोजन पेरॉक्साईट जेव्हा जखमेवर लावले जाते तेव्हा त्याचा परिणाम जास्त काळ टिकत नाही; पण मधाच्या बाबतीत तसे नाही. “मध एकदा जखमेवर लावले तर शरीरातील द्रव्य त्यात मिसळतात आणि यामुळे मधातले नैसर्गिक आम्लाचे प्रमाण कमी होते,” असे ग्लोबमधील वृत्त म्हणते. आम्लाचे प्रमाण कमी झाल्यामुळे ते एंझाईम कार्य करू लागते. मधातील शर्करेच्या विघटनाची प्रक्रिया अत्यंत हळू आणि निरंतर असते. या क्रियेमुळे जखमेच्या आजूबाजूच्या निरोगी ऊतीला इजा न पोहंचता, जखमेतील सूक्ष्मजंतू नष्ट करण्यासाठी योग्य प्रमाणात हायड्रोजन पेरॉक्साईड निर्माण होत असते.

ग्लोबनुसार जखम बरी होण्याकरता मधामध्ये अनेक गुण आहेत. “त्वचेला मध लावल्यास त्वचेसाठी संरक्षक असा ओलसरपणा निर्माण होतो आणि खपली एकदम राठ होत नाही. मधामुळे नवीन रक्‍तनलिकांची वाढ आणि निर्मिती व्हायला उत्तेजन मिळते व नवीन त्वचा निर्माण करणाऱ्‍या पेशी कार्याला लागतात.” त्याचप्रमाणे, मधातील प्रतिऑक्सिडीकारकांमध्ये दाहनाशक गुण असल्यामुळे “सूज कमी होते, रक्‍ताभिसरण वाढते आणि जखमेतून ‘पाणी निघत राहत नाही.’”

परंतु, “मध सर्वांकरता नाही,” असे त्या वृत्तात इशारा दिला आहे. असा अंदाज केला जातो की, मधामध्ये जवळजवळ ५ टक्के कुपीजंतू विषबाधा घडवणारे बीजाणू असतात. आरोग्य कॅनडातील (इंग्रजी) कुपीजंतू विषबाधा संदर्भ सेवा तसेच बालरोग संस्था असा सल्ला देतात की, एका वर्षाखालील मुलांना मध देऊ नये कारण “लहान मुलांमध्ये सूक्ष्मजंतूंपासून संरक्षण करणारे जठरांतील सूक्ष्मजीव पुरेशा प्रमाणात अद्याप निर्माण झालेले नसतात.” (g०२ ३/८)