व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ऐका आणि शिका

ऐका आणि शिका

ऐका आणि शिका

“आपल्याला मिळालेल्या ज्ञानातील ८५ टक्के ज्ञान आपण ऐकण्याद्वारे आत्मसात केलेले असते,” असे टोरंटो स्टार मधील एका अहवालात म्हटले होते. आपला बहुतेक वेळ ऐकण्यात जात असला तरी, त्यातला “७५ टक्के वेळ, लक्ष विचलित झाल्यामुळे किंवा दुसराच कसलातरी विचार करत बसल्यामुळे किंवा विसरून जाण्याच्या प्रवृत्तीमुळे” वाया जातो. या लक्षवेधक आकडेवारीतून एक गोष्ट मात्र स्पष्ट होते, ती म्हणजे आपण आपली ऐकण्याची क्षमता वाढवली पाहिजे.

“व्यवस्थित न ऐकणे हे समाजाच्या बहुतेक समस्यांचे मूळ कारण आहे,” असे अहवालात म्हटले आहे. आत्महत्या, शाळेतील हिंसा, कुटुंबाची ताटातूट, मादक औषधांचा गैरवापर या सर्व गोष्टींमागेही हेच कारण आहे, असा विश्‍वास वकतृत्त्व शास्त्रज्ञा आणि संभाषण तज्ज्ञा रिबेका शरीफ बाळगतात.

लोकांच्या ऐकण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात, असे निरीक्षण सामाजिक शास्त्रज्ञ करतात. काही लोकांना, बारीकसारीक तपशीलासह रंगवलेल्या इतर लोकांबद्दलच्या गोष्टी ऐकायला आवडतात. काही लोकांना, संबंधित घटनांबद्दल ऐकायला आवडत असल्यामुळे समोरच्या व्यक्‍तीचे पाल्हाळीक बोलणे त्यांना आवडत नाही, त्यांना मुद्द्‌याचे बोलणे ऐकायला आवडते. “त्यामुळे, अशा दोन प्रकारचे लोक एकमेकांबरोबर सुसंवाद साधू शकत नाहीत,” असे स्टार बातमीपत्रात म्हटले होते.

या उचित कारणामुळे येशूने “तुम्ही कसे ऐकता” यावर जोर दिला. (तिरपे वळण आमचे.) (लूक ८:१८) दुसऱ्‍यांचे बोलणे लक्ष देऊन ऐकणे हे उत्तम शिष्टाचाराचे लक्षण आहे. आणि उत्तम संभाषणाकरता हे अनिवार्य आहे. संभाषण सुरू असताना आपण कशाप्रकारे लक्ष देऊन ऐकले पाहिजे याबाबतीत असलेल्या व्यावहारिक सूचनांमध्ये, एखाद्याबरोबर बोलत असताना विकर्षणांकडे दुर्लक्ष करणे, समोरच्या व्यक्‍तीच्या जवळ उभे राहणे, तिच्या डोळ्यांत पाहून व डोके हालवून प्रतिसाद देणे, या सर्व गोष्टींचा समावेश होतो. चांगल्याप्रकारे ऐकल्यानेच आपण बहुतेक गोष्टी शिकत असल्यामुळे, लक्ष देऊन ऐकण्याच्या बाबतीत आपण सर्वांनी सुधारणा केली पाहिजे. (g०२ ४/८)