व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गालिच्यापासून काही धोका आहे का?

गालिच्यापासून काही धोका आहे का?

गालिच्यापासून काही धोका आहे का?

गालिचा लावलेल्या भागात तुम्ही किती वेळ असता? ही एक चिंतेची बाब आहे, खासकरून मुलांसाठी, असे न्यू सायंटिस्ट नावाच्या एका मासिकातील अहवाल म्हणतो.

मासिकात म्हटले होते: “बाहेरच्या वातावरणापेक्षा घरातील वातावरणातच आपला, सर्वात विषारी दूषकांशी १० ते ५० पटीने जास्त संपर्क येतो.” अमेरिकेत पर्यावरण इंजिनियर असलेले जॉन रॉबट्‌र्स यांचा असा दावा आहे, की विशिष्ट घरांत असलेल्या गालिच्यामधील धूळीच्या नमुन्यांत, दूषकांचे धक्कादायक उच्च प्रमाण असते. यांमध्ये, शिसे, कॅडमियम, पारा, कीटकनाशके, कार्सिनोजेनिक पॉलिक्लोरिनेटेड बायफिनोल्स (PCBs) आणि पॉलिसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्स (PAHs) आहेत.

पादत्राणांना व पाळीव प्राण्यांच्या पायांना चिकटून आलेल्या कीटकनाशकांमुळे, गालिच्यामधील धूळीत आधीपासून असलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण ४०० पटीने वाढू शकते. गालिच्यामधील ही दूषके वर्षानुवर्षे तशीच राहतात असे म्हटले जाते. कीटकनाशके व PAHs अर्धबाष्पनशील असल्यामुळे त्यांचे बाष्पीभवन होते, ते उडून जातात आणि पुन्हा गालिच्यावर किंवा इतर कशावरही स्थिरावतात.

लहान मुले घरात सहसा खाली खेळतात आणि तेच हात तोंडात घालतात. त्यामुळे त्यांच्यावर दूषकांचा परिणाम होण्याची जास्त शक्यता असते. परंतु, प्रौढांपेक्षा लहान मुलांमध्ये चयापचयाचे प्रमाण जास्त असल्यामुळे, प्रौढांच्या तुलनेत ते हवेचे जास्त श्‍वसन करतात.

काही संशोधकांना असा संशय आहे, की घरातील गालिचा कदाचित, मुलांमधील दमा, अलर्जी आणि कर्करोगास कारणीभूत असू शकतो. रॉबट्‌र्स यांनी असे निरीक्षण केले, की “संपूर्ण घरभर गालिचा लावलेल्या घराच्या तुलनेत केवळ विशिष्ट भागातच गालिचा लावलेल्या घरात सुमारे एक-दशांश धूळ सापडू शकते.”

रॉबट्‌र्स असे सुचवतात, की गालिच्यापासून होणारा धोका टाळायचा असेल तर जास्त शक्‍तिशाली व्हॅक्यूम क्लिनर वापरण्याची गरज आहे. आठवड्यातून एकदा, मुख्य प्रवेशद्वारापासून १.३ मीटरच्या पट्ट्यावरून २५ वेळा, जेथून सारखी ये-जा होते तो भाग १६ वेळा आणि उरलेला भाग ८ वेळा व्हॅक्यूम क्लिनर फिरवावा; अशाप्रकारे अनेक आठवड्यांपर्यंत साफ करीत राहण्याची गरज आहे.

या सर्वात सोप्या उपायाचा अवलंब केल्यानंतर, दर आठवडी वर सांगितलेल्या वेळांपेक्षा फक्‍त निम्म्या वेळा गालिचा व्हॅक्यूम क्लिनरने साफ केला तर तुम्ही धूळीचे प्रमाण कमी करू शकता. रॉबट्‌र्स असेही सांगतात, की “तुमच्या घराच्या प्रत्येक प्रवेशद्वारापाशी एक चांगल्या प्रतीचे पायपूस ठेवा आणि घरात प्रवेश करताना दोनदा आपले पाय त्यावर घासून पुसा.” (g०२ ४/२२)