व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तुम्हाला माहीत आहे का?

तुम्हाला माहीत आहे का?

तुम्हाला माहीत आहे का?

(या कोड्यातील उत्तरे खाली दिलेल्या बायबल वचनांमध्ये मिळू शकतात आणि सगळी उत्तरे पृष्ठ १६ वर दिली आहेत. अतिरिक्‍त माहितीकरता, यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले “शास्त्रवचनांवरील सूक्ष्मदृष्टी” (इंग्रजी) हे प्रकाशन पाहा.)

१. लोक यहोवाच्या दिवशी सोन्यारुप्यांच्या मूर्ती वटवाघळांपुढे टाकतील असे यशया का म्हणतो? (यशया २:२०)

२. तुम्ही आपल्या शेताच्या कानाकोपऱ्‍यातील पीक कापू नका असे इस्राएली लोकांना का सांगण्यात आले होते? (लेवीय १९:९)

३. एका मनुष्याने त्याच्या दासाचा किंवा दासीचा डोळा फोडला किंवा दात पाडला तर मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्याला काय करावे लागत होते? (निर्गम २१:२६, २७)

४. मनुष्यवध करणारा शरणपूर केव्हा सोडू शकत होता? (गणना ३५:२५)

५. कर्नेल्याने देवाला प्रार्थना करून किती काळ ओसरल्यावर पेत्र त्याला भेटायला आला? (प्रेषितांची कृत्ये १०:३०-३३)

६. “जे फुटी व अडथळे घडवून” आणतात त्यांच्याबाबतीत काय करावे असे पौलाने सांगितले? (रोमकर १६:१७)

७. ईयोबाने आपली सचोटी त्यागून द्यावी म्हणून सैतानाने त्याच्या आरोग्याला कोणता धक्का पोहंचवला? (ईयोब २:७)

८. इस्राएलांनी पहिल्यांदा मान्‍ना खाल्ला आणि शब्बाथाचा नियम पहिल्यांदा लागू करण्यात आला तेव्हा इस्राएली कोठे होते? (निर्गम १६:१)

९. एहूदने मबावाचा राजा एग्लोन याला कशाने ठार केले? (शास्ते ३:१६)

१०. योहानाने ज्यांना संदेश पाठवले होते त्या सात मंडळ्या रोमच्या कोणत्या प्रांतात होत्या? (प्रकटीकरण १:४)

११. येशूचा संबंध सहसा कोणत्या प्राण्याशी जोडला जातो आणि का? (योहान १:२९)

१२. जमिनीच्या विरोधात पृथ्वीवरील जलाशयासाठी कोणता शब्द वापरला जातो? (हबक्कूक २:१४)

१३. नोहाने तारवाला जलरोधक करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला? (उत्पत्ति ६:१४)

१४. ख्रिस्ताला सिंहासनाधिष्ठ केल्यावर स्वर्गात काय घडले? (प्रकटीकरण १२:७)

१५. शेवटल्या वल्हांडण सणाची तयारी करण्यासाठी येशूने कोणत्या दोन शिष्यांना पाठवले? (लूक २२:७-१३)

१६. येशू कोणत्या प्राण्यावर बसून जेरूसलेममध्ये प्रतापाने प्रवेश करील असे भाकीत केले होते? (जखऱ्‍या ९:९)

१७. आळशी लोकांना कोणत्या कीटकाचे अनुकरण करायला उत्तेजन दिले आहे? (नीतिसूत्रे ६:६)

१८. येशूला वाचवण्याकरता पेत्राने आपली तरवार चालवली तेव्हा काय घडले? (योहान १८:१०)

१९. विधीनुसार अशुद्ध होऊ नये म्हणून परुशी कोणता कीटक गाळून काढण्याची काळजी घेत असत? (मत्तय २३:३४)

२०. यहोवापेक्षा आपल्या पुत्रांना अधिक सन्मान कोणी दिला? (१ शमुवेल २:२२, २९) (g०२ ४/८)

कोड्याची उत्तरे पृष्ठ १६

१. कारण अशा मूर्तींसाठी सन्मानाचे व आदराचे नव्हे तर अंधकाराचे आणि अशुद्धतेचे स्थानच योग्य आहे

२. म्हणजे गरीब व उपऱ्‍यांनाही काही वेचायला मिळेल

३. दासाला मुक्‍त करावे लागत असे

४. मुख्ययाजक मरण पावल्यावर

५. चार दिवस

६. त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्यापासून दूर राहावे

७. त्याने ईयोबाला मोठमोठ्या गळवांनी नखशिखांत पीडिले

८. सीन रानात

९. दुधारी तरवारीने

१०. आशिया

११. कोकऱ्‍याशी. कारण येशूने बलिदान दिले

१२. समुद्र

१३. डांबर

१४. युद्ध ज्यामध्ये सैतानाला स्वर्गातून बाहेर घालवण्यात आले

१५. पेत्र आणि योहान

१६. गाढवावर

१७. मुंगीचे

१८. त्याने प्रमुख याजकाचा दास, माल्कस याचा कान कापला

१९. मुरकुट

२०. मुख्य याजक एलीने