व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

भूकंप, बायबल भविष्यवाणी आणि तुम्ही

भूकंप, बायबल भविष्यवाणी आणि तुम्ही

भूकंप, बायबल भविष्यवाणी आणि तुम्ही

येशूचा मृत्यू होण्याआधी त्याने अशा काही घटनांविषयी व परिस्थितींविषयी सांगितले ज्या शाबीत करतील की हे जग ‘युगाच्या समाप्तीच्या’ काळात येऊन पोचले आहे. त्याने म्हटले की या काळात मऱ्‍या, अन्‍न टंचाई आणि मोठ्या प्रमाणावरील युद्धे होतील. त्याने “जागोजागी” “मोठेमोठे भूमिकंप” होतील असेही सांगितले. (मत्तय २४:३, ७; लूक २१:१०, ११) येशू आपल्या काळाविषयी बोलत होता का?

बऱ्‍याच जणांना असे वाटत नाही. त्यांचे असे म्हणणे आहे की अलीकडच्या दशकांत भूकंपांची संख्या फारशी वाढलेली नाही. किंबहुना, सं.सं.राष्ट्रीय भूकंप माहिती केंद्राच्या वृत्तानुसार २० व्या शतकात ७.० महत्तेच्या भूकंपांचे प्रमाण “जवळजवळ एकसारखेच” राहिले आहे. *

पण येशूच्या भविष्यवाणीत भूकंपांच्या संख्येत किंवा महत्तेत वाढ होईल अशी अट नाही, याकडे लक्ष द्या. येशूने केवळ इतकेच भाकीत केले की जागोजागी मोठमोठे भूमिकंप होतील. शिवाय त्याने असेही म्हटले की या घटना, “वेदनांचा प्रारंभ होत.” (मत्तय २४:८) आणि या वेदना, भूकंपांच्या संख्येवर किंवा रिश्‍टर मापक्रमानुसार ते किती तीव्र होते यावर नाही तर लोकांवर त्यांचा कितपत परिणाम झाला यावर अवलंबून आहेत.

आपल्या या काळात भूकंप अतिशय क्लेशदायक ठरले आहेत. २० व्या शतकात या आपत्तींमुळे लाखो लोकांचा जीव गेला व कित्येक बेघर झाले आहेत. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मृत्यूमुखी पडणाऱ्‍यांचे हे अफाट प्रमाण सहज टाळता आले असते. बीबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, “विकसनशील देशांत, शहरीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे कमीतकमी वेळात व खर्चात अधिक लोकांना राहण्याची जागा मिळवून देण्याकरता बांधकामविषयक कायदेकानूनांना धाब्यावर बसवले जाते.” अलीकडेच घडलेल्या दोन आपत्तींविषयी विवेचन करताना शहरी दुर्घटना तज्ज्ञ बेन विस्नर यांनी म्हटले: “भूकंपाने या लोकांचा बळी घेतला नाही. या लोकांचा बळी गेला तो मनुष्याच्या चुकीमुळे, बेपर्वाईमुळे, भ्रष्टाचारामुळे आणि स्वार्थामुळे.”

होय, कधीकधी भूकंपातले सर्वात घातक पैलू म्हणजे मानवी स्वार्थ आणि बेपर्वाई हे असतात. आणि अगदी याच गुणांचा बायबलमधील, ‘शेवटल्या काळाविषयीच्या’ दुसऱ्‍या एका भविष्यवाणीत उल्लेख येतो. त्या काळात, बायबल म्हणते की लोक “आत्मकेंद्रित, धनलोभी” आणि “भावनाशून्य” होतील. (२ तीमथ्य ३:१-५, दी ॲम्प्लीफाईड बायबल) या व्यवस्थीकरणाच्या समाप्तीविषयीच्या येशूच्या शब्दांसोबतच ही भविष्यवाणी स्पष्टपणे शाबीत करते की आपण अशा एका काळाच्या उंबरठ्यावर येऊन पोचलो आहोत जेव्हा देव मनुष्यजातीला सर्व दुःखांपासून व क्लेशांपासून मुक्‍त करेल. यात अर्थातच भयकारी भूकंपांचाही समावेश होतो.—स्तोत्र ३७:११.

बायबलमध्ये सांगितलेल्या या आशेविषयी अधिक जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? कृपया तुमच्या क्षेत्रातील यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा पृष्ठ पाच वरील उचित पत्त्यावर लिहून कळवा. (g०२ ३/२२)

[तळटीप]

^ काहींचे असे म्हणणे आहे की भूकंपांच्या संख्येत वाढ झाल्याची वृत्ते केवळ आधुनिक तंत्रज्ञानामुळे आहेत, कारण त्यामुळे अधिक भूगर्भीय हालचालींचे परीक्षण करणे शक्य झाले आहे.