व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

आमच्या वाचकांचे मनोगत

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रिया “मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना साहाय्य” (जानेवारी-मार्च २००२) या मालिकेबद्दल मी कोणत्या शब्दांत आभार व्यक्‍त करू हे मला समजत नाही. मला जी मारहाण होत आहे व माझ्याबरोबर जो व्यवहार केला जात आहे त्याबद्दल तक्रार करायचा मी प्रयत्न केला पण माझी खात्री पटली होती, की ज्या यातना, दुःख आणि घोर निराशा मी कमी करू शकले नाही त्या कोणीही समजू शकत नव्हते. या लेखांनी जणू माझ्याच भावना व्यक्‍त केल्या आहेत.

एन. एल., इटली (g०२ ६/२२)

मी मासिकाचं आवरण काढून पहिलं पान पाहिलं आणि माझ्या डोळ्यांत पाणी दाटून आलं. मी ते मासिक लगेच जसे का तसे पुन्हा घडी घालून ठेवून दिले कारण त्यातली माहिती माझ्या आयुष्यात घडलेल्या घटनेविषयी होती जिचा मला विचार करायचा नव्हता. पुन्हा एकदा ते मासिक उघडण्याचे मला धैर्य व्हावे म्हणून मी प्रार्थना केली. मला देवाने धैर्य दिल्याबद्दल मी त्याचे आभार मानते. या मालिकांनी मला एक गोष्ट समजायला मदत केली; ती म्हणजे, असा त्रास भोगणारी केवळ मीच एकटी नाही. “आपल्या वैवाहिक साथीदाराला मारणे हे देवाच्या नजरेत गंभीर पाप आहे” हे शब्द वाचल्यावर जणू माझ्या जखमेवर कोणीतरी फुंकर घालतंय असा मला भास झाला. जीवनातील अशा वास्तविक गोष्टींविषयी सांत्वनदायक लेखांबद्दल मी आपले खूप आभार मानते.

डी. जी. एम., अमेरिका (g०२ ६/२२)

लेखात वर्णन केलेल्या स्त्रियांसारखाच मलाही अनुभव आला आहे. मद्यपान आणि लहानपणीच्या संस्कारांमुळे माझा पती माझ्याशी असे वागतो असे म्हणून मी स्वतःची समजूत घालत असे. अर्थात या गोष्टी कारणीभूत ठरू शकत असल्या तरी मला एक गोष्ट समजल्यावर सांत्वन मिळाले, की हिंसक वागणुकीबद्दल कोणतीही सबब ग्राह्‍य नाही. मला अगदी मनापासून वाटतं, की माझ्या नवऱ्‍यानं बायबल वाचावं आणि यहोवाचं प्रेम काय आहे ते समजून घ्यावं.

एस. आय., जपान (g०२ ६/२२)

या मालिकांचा माझ्यावर खास प्रभाव पडला कारण मी स्वतः या अनुभवातून जातेय. मला वाटलं, जणू मीच रोक्साना आहे. मारहाण सहन करणाऱ्‍या पत्नीला कसं वाटतं हे जाणणारे इतरही लोक आहेत हे जाणून खूप सांत्वन मिळालं. माझ्या नवऱ्‍याच्या मनोवृत्तीसाठी मी जबाबदार नाही हेही मला या लेखांमधून समजलं. माझा नवरा मला कवडीमोल समजत असला तरी, देवाला माझी किंमत आहे हे मला या लेखांतून समजलं. अशी उपयुक्‍त माहिती छापल्याबद्दल मी आपले आभार मानते. पैशापेक्षा हेच किती उत्तम आहे!

बी. एल. फिलिपाईन्स (g०२ ६/२२)

मी व्यक्‍त न करू शकलेल्या सगळ्या यातना व निराशा तुम्ही शब्दांत मांडू शकलात. या समस्येमुळे होणारे मानसिक व भावनिक दुःख यहोवा समजू शकतो, हे समजण्यास मला या लेखांनी मदत केली. कृपया असे लेख प्रकाशित करत राहा कारण, या समस्येविषयी बोलण्याची आणि इतरांनी समजून घेण्याची गरज आहे. माझ्यासारख्याच अनेकांना या लेखांतून निश्‍चितच सांत्वन मिळाले असेल याची मला खात्री आहे.

के. ई., ऑस्ट्रेलिया (g०२ ६/२२)

माझे वडील तापट स्वभावाचे होते, त्यामुळे मीसुद्धा बहुतेकदा माझ्या नवऱ्‍यावर चिडते. कधीकधी, नव्हे पुष्कळदा मी त्याच्यावर हात देखील उगारते. माझा नवरा तसा माझ्यापेक्षा कणखर आहे त्यामुळे मला वाटायचं, की माझ्या मारण्याने त्याला इतकं काही लागत नसेल. पण लेखात जेव्हा मी—आपल्या वैवाहिक साथीदाराला मारणे हे देवाच्या नजरेत गंभीर पाप आहे—हे वाचलं तेव्हा मला धक्काच बसला. माझा नवरा यहोवाचा एक नम्र सेवक आहे. मला मनापासून त्याची क्षमा मागायची आहे. यहोवानं मला दिलेल्या या ताडनांबद्दल मी त्याचे आभार मानते.

टी. आय., जपान (g०२ ६/२२)

या मासिकामुळे माझ्या डोळ्यांत पाणी आलं. मी माझाच अनुभव वाचतेय असं मला वाटलं. पण अलीकडेच माझा नवरा बायबलबद्दल प्रश्‍न विचारू लागला आहे. तो राज्य सभागृहातील काही सभांना देखील उपस्थित राहिला आहे आणि आता बायबलचा अभ्यास करतोय. पृष्ठ ११ वरील लूर्देजप्रमाणे मलाही “कधीकधी वाटतं, आपण स्वप्न तर पाहात नाही ना!”

ई. आर., अमेरिका (g०२ ६/२२)