व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

अन्‍नाच्या शर्यतीत उंदीर आणि मानव

ऑस्ट्रेलियन कॉमनवेल्थ साईंटिफीक ॲण्ड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन (सीएसआयआरओ) नुसार, जगभरात प्रत्येक मानवी बाळाच्या जन्माच्या तुलनेत दहा उंदरांची पिल्लं जन्माला येतात. दररोज सुमारे ३,६०,००० नवीन मानवी बाळांना भरवावे लागते पण त्यासोबतच ३६,००,००० नवीन उंदरांच्या पिल्लांनाही खायला लागते. उदाहरणार्थ, इंडोनेशियाची लोकसंख्या २३ कोटी आहे आणि सुमारे ६० टक्के लोक, दैनंदिन शक्‍तीसाठी भातावर निर्भर आहेत. पण त्याच देशात, दर वर्षी भात उत्पादनांतील १५ टक्के तांदूळ उंदरं फस्त करतात. “याचा अर्थ, दोन कोटींपेक्षा अधिक इंडोनेशियन लोकांना संपूर्ण वर्षासाठी पुरेल इतका तांदूळ ही उंदरंच खातात,” असे सीएसआयआरओ वैज्ञानिक डॉ. ग्रान्ट सिंगलटन यांचे म्हणणे आहे. (g०२ ६/२२)

तेलाची चटक लागलेले हत्ती

भारताच्या ईशान्येकडील दिग्बोई येथील हत्तींना तेलाची चटक लागली आहे. ऑईल इंडिया लिमिटेडचे एक ज्येष्ठ अभियंता, रमण चक्रवर्ती म्हणतात: “हत्ती तेलक्षेत्रात मुक्‍त विहार करतात आणि पुष्कळदा तेलविहिरी व परिष्करण कारखान्याला जोडणाऱ्‍या नळांना बसवलेल्या महत्त्वाच्या झडपा उघडतात. या झडपा उघडल्यावर आणि खासकरून ती झडप, कच्च्या तेलाचे पॅराफिनात रूपांतर होऊ नये म्हणून सोडल्या जाणाऱ्‍या बाष्पाची झडप असेल तर त्यांना ती उघडायला खूपच मजा येते कारण त्यातून येणारा आवाज त्यांना आवडतो असे वाटते.” “तेलाच्या फवाऱ्‍याचा फक्‍त आवाजच नव्हे” तर “या कच्च्या तेलाबरोबर येणारी माती आणि पाणी” यांची देखील त्यांना मौज वाटत असल्यामुळे हे हत्ती या तेलविहिरींकडे आकर्षित होतात, असे द इंडियन एक्सप्रेस बातमीपत्राने अहवाल दिला. “वर येणारे पाणी खारट असते आणि हत्तींना हे खूपच आवडते.” मनोरंजक गोष्ट अशी, की एका हत्तीमुळेच खर तर तेथील तेलाचा अचानक शोध लागला. त्या भागात पहिल्यांदाच रेल्वे रूळ टाकण्याचे काम चालले असताना, हा हत्ती कामाच्या ठिकाणी रूळ ठेवून पुन्हा कॅम्पकडे आला तेव्हा ब्रिटिश अधिकाऱ्‍यांनी त्याच्या पायावर तेलकट पदार्थ चिकटल्याचे पाहिले व त्याच्या पायांच्या ठश्‍यांचा माग काढत काढत ते तेलाच्या झऱ्‍याजवळ पोहंचले. अशारीतीने, १८८९ मध्ये आशियात पहिली तेलविहीर खोदण्यात आली. (g०२ ७/२२)

विवाहाविना अनेक मुले

युरोस्टॅट नावाच्या एका संख्याशास्त्र एजन्सीनुसार सध्या युरोपियन संघराज्यात, ४ बाळांपैकी १ बाळ विवाहेत्तर संबंधांतून जन्माला येते, असा अहवाल वेस्टडोईश ऑल्गेमीन सीटुंग या जर्मन बातमीपत्राने दिला. हा दर १९८० मध्ये १० पैकी १ असा होता. विवाहविना जन्मणाऱ्‍या मुलांचे कमी प्रमाण ग्रीसमध्ये—केवळ ४ टक्के आहे. ग्रीसच्या अगदी उलट स्वीडनमध्ये अर्ध्यापेक्षा अधिक बाळांचा जन्म विवाहाविनाच होतो. आर्यलंडमध्ये सर्वात जास्त बदल दिसून येतो. तेथे, १९८० साली विवाहाविना जन्माला येणाऱ्‍या मुलांची संख्या फक्‍त ५ टक्क्यांपासून २००० सालापर्यंत ३१.८ टक्क्यांपर्यंत पोहंचली आहे. ही लक्षणीय वाढ, “शाबीत करते, की विवाह आणि कुटुंब यांबद्दलची युरोपियन लोकांची मनोवृत्ती बरीच बदलली आहे,” असे या बातमीत म्हटले होते. (g०२ ५/८)

१०० व्या वर्षी आनंदी व सुदृढ

योमिउरी शेम्बुन बातमीपत्रातील एका अहवालानुसार, “१०० पेक्षा अधिक वर्षांच्या ८० टक्के पेक्षा अधिक लोकांना दररोज सुदृढ व चांगले वाटते.” जपानमध्ये शंभरी ओलांडलेल्यांनी, १९८१ मध्ये पहिल्यांदा १,००० संख्या ओलांडली व ही संख्या २००० सालापर्यंत १३,००० इतकी झाली आहे. अलीकडेच, जपान्स फाऊंडेशन ऑफ हेल्थ ॲण्ड स्टॅमिनाने शंभरी ओलांडलेल्या १,९०० पेक्षा अधिक लोकांचा एक सर्व्हे घेतला; शंभरी ओलांडलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या “जीवनाचा उत्कृष्ट दर्जा” यावर करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा सर्व्हे होता. “२५.८ टक्के स्त्रियांच्या तुलनेत ४३.८ टक्के पुरूषांनी म्हटले, की ‘त्यांच्या जीवनाला उद्देश आहे,’” असे बातमीपत्रात म्हटले होते. शंभरी ओलांडलेल्या बहुतेकांनी, जीवनाच्या उद्देशांबरोबर “कुटुंब,” “दीर्घायुष्य,” आणि “चांगले आरोग्य व सुखी जीवन” यांचा उल्लेख केला. त्यामुळे “जीवनात उद्देश असला तर मनुष्य दीर्घायुषी होतो,” असे योमिउरी शेम्बुनने सुचवले. (g०२ ५/८)

देवाच्या नावाखाली चोरी

“मी २० वर्षांपासून रोखे नियंत्रक म्हणून काम करत आहे आणि मी इतर कोणत्याही मार्गापेक्षा देवाच्या नावाने पैसे चोरले जात असल्याचे पाहिले आहे,” असे नॉर्थ अमेरिकन सेक्यूरिटिझ ॲडमिनिस्ट्रेटर्स असोसिएशनच्या अध्यक्षा डेबोराह बोर्टनर यांनी म्हटले. “तुम्ही पैसे गुंतवता तेव्हा, तुमच्या धर्मासाठी किंवा तुमच्या विश्‍वासासाठी पैसे गुंतवण्याची तुम्हाला केवळ कोणीतरी गळ घालत आहे म्हणून तुम्ही बेसावध राहू नये.” ख्रिश्‍चन सेंचुरी नावाच्या मासिकानुसार, “गेल्या तीन वर्षांत २७ राज्यांतील रोखे नियंत्रकांनी, गुंतवणूकदारांचा विश्‍वास संपादण्यासाठी आध्यात्मिक किंवा धार्मिक विश्‍वासांचा उपयोग केल्याबद्दल शेकडो लोकांविरुद्ध आणि कंपन्यांविरुद्ध कार्य केले आहे. . . . एका नाट्यमय प्रकरणात [जे पाच पेक्षा अधिक वर्ष चालले]” एका प्रोटेस्टंट संघटनेने “संपूर्ण राष्ट्रातील १३,००० गुंतवणूकदारांकडून ५९ कोटी डॉलरपेक्षा अधिक रक्कम जमा केली. राज्य नियंत्रकांनी १९९९ मध्ये ही संघटना बंद केली आणि या संघटनेच्या तीन अधिकाऱ्‍यांवर फसवणुकीचे आरोप लावून त्यांना दोषी ठरवण्यात आले.” इतर तीन प्रकरणे, एकूण १.५ अब्ज डॉलर्सच्या नुकसानाची होती,” असा अहवाल ख्रिश्‍चन सेंच्युरीने दिला. (g०२ ५/२२)

चर्चचा व्यापार

घटत जाणारी उपस्थिती आणि कमी होत चाललेले दान यांमुळे संयुक्‍त संस्थानांतील चर्चेस थकलेली बिले भरण्यासाठी व्यापार करू लागली आहेत. “सर्व होतकरू चर्चेसचे हेच भविष्य आहे,” असे इंडियाना, मुन्स्टर येथील फॅमिली ख्रिश्‍चन सेंटरचे ज्येष्ठ पाळक स्टिफन मुन्से यांचे म्हणणे आहे. द वॉल स्ट्रीट जर्नलनुसार चर्चेस आपल्या स्वागतकक्षात कॉफी आणि डोनट्‌स विकण्यापासून चर्चेसच्या टेरेसवर पूर्ण-वेळेचे हॉटेल चालवण्यापर्यंतचे निरनिराळे व्यापार करत आहेत. फ्लोरिडा, जॅक्सनविले येथील एका चर्चने त्याच्या सॅन्चुरीजवळ एक शॉपिंग मॉल काढले आहे. या मॉलमध्ये, एक ट्रॅव्हल एजन्सी, एक ब्युटी पार्लर आणि एक सोल-फूड रेस्टॉरंट आहे. चर्चचे संस्थापक आणि बिशप, वोन मॅक्लॉफलीन म्हणतात: “येशू देत असलेली बक्षीसे आम्ही घ्यावीत आणि त्यावर नफा मिळवावा अशी त्याची इच्छा आहे. ते म्हणतात, की २००० साली चर्चेसच्या व्यापारामुळे १० कोटींपेक्षा अधिक उत्पन्‍न मिळाले. (g०२ ६/२२)

फ्रान्समध्ये बायबल वाचन

ला क्रवॉ नावाच्या एका कॅथलिक बातमीपत्रात छापलेल्या एका सर्वेक्षणानुसार, सर्व्हे घेतलेल्या फ्रेंच लोकांपैकी केवळ ४२ टक्के लोकांकडे बायबल आहे पण त्यापैकी केवल २ टक्के लोक ते दररोज वाचतात असे म्हणतात. बहात्तर टक्के लोकांनी म्हटले, की “ते कधीच बायबल वाचत नाहीत.” सर्वेक्षणातील ५४ टक्के लोकांच्या मते बायबल हे एक “कालबाह्‍य पुस्तक आहे” जे “आजच्या आधुनिक जगाला समर्पक नाही.” अहवालात म्हटले होते, की “फ्रेंच लोक पहिल्यांदा बायबलकडे एका सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहतात;” “यहुदी आणि ख्रिश्‍चन धर्माचा उगम कसा झाला” याचे स्पष्टीकरण मिळावे म्हणून ते त्याचा उपयोग करतात. ला क्रवॉ असेही म्हणते, की “फ्रान्समध्ये दर वर्षी सुमारे २,५०,००० बायबल आणि ३०,००० नवीन करार यांची विक्री होते.” (g०२ ७/८)

माऊंट एव्हरेस्टची साफसफाई

पृथ्वीवरील सर्वात उंच पर्वत (८,८५० मीटर) अर्थात माऊंट एव्हरेस्ट याचे चित्र सहसा सुंदर आणि भव्य दाखवले जाते. पण माऊंट एव्हरेस्ट एक मोठे कचरास्थळ झाले आहे, अशी बातमी डाऊन टू अर्थ या नवी दिल्लीच्या मासिकात आली आहे. अनेक शतकांपासून माऊंट एव्हरेस्टवर चढणाऱ्‍या शेकडो पर्यटकांनी, टनाच्या हिशेबाने कचरा आणि “ऑक्सीजनचे रिकामे सिलेंडर, जुन्या शिड्या किंवा खांब आणि प्लास्टिकच्या छड्या” मागे सोडल्या आहेत. अहवालानुसार, सर्वात गलिच्छ कॅम्प म्हणजे “साऊथ कोल कॅम्प; इथूनच बहुतेक चढणारे आपल्या आरोहणाच्या शेवटल्या टप्प्याची सुरवात करतात.” नेपाळ गिऱ्‍हारोहण संस्थेचे अधिकारी भूमी लाल लामा म्हणाले, की “आम्ही, कचरा गोळा करणाऱ्‍या शेरपांना किलोमागे ६५० रुपये देण्याचा विचार करत आहोत.” अहवाल म्हणतो, की शेरपा लोक सहसा, एव्हरेस्ट चढायला येणाऱ्‍या लोकांसाठी “मार्गदर्शक म्हणून व त्यांचे सामान उचलण्याचे काम” करतात. (g०२ ७/८)

आशियात हवेच्या प्रदूषणाचा धोका

“भारतात, दर वर्षी ४०,००० पेक्षा अधिक लोक हवेच्या प्रदूषणामुळे मृत्यूमूखी पडतात,” असे डाऊन टू अर्थ या परिस्थितीकी विषयाच्या मासिकात म्हटले होते. वर्ल्ड बँक आणि स्टॉकहोम एनव्हायरनमेंट इन्स्टिट्यूटने केलेल्या संशोधनाने दाखवून दिले, की आशियातील हवेच्या प्रदूषणाची पातळी, युरोप आणि अमेरिकेतील एकूण हवेच्या प्रदूषणाच्या पातळीपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे व ती सिओल, बेजिंग, बँकॉक, जकार्ता आणि मनीला येथील हजारोंच्या मृत्यूला कारणीभूत आहे. उदाहरणार्थ, मनीलामध्ये दर वर्षी ४,००० पेक्षा अधिक लोक श्‍वसनाच्या विकारामुळे मरण पावतात तर ९०,००० लोकांना गंभीर ब्राँकायटीस होतो. बेजिंग आणि जकार्तामध्ये तर मृत्यूचे प्रमाण याहून जास्त आहे. “निकृष्ट दर्जाच्या इंधनाचा वापर, उर्जा उत्पन्‍न करण्याची अकार्यक्षम पद्धत, नादुरुस्त वाहने तशीच चालवत राहणे आणि वाहतुकीची गर्दी,” या सर्व गोष्टी या समस्येला कारणीभूत आहेत, असे मासिकात म्हटले आहे. (g०२ ८/२२)