व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

नक्कलाकार नामशेष होण्याच्या मार्गावर

नक्कलाकार नामशेष होण्याच्या मार्गावर

नक्कलाकार नामशेष होण्याच्या मार्गावर

ब्रिटनमधील सावध राहा! लेखकाच्या सौजन्याने

पोपट “पृथ्वीवरील सर्वाधिक धोक्यात असलेले पक्षी आहेत,” असे अमेरिकेच्या युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँडचे डॉ. तिमथी राईट यांनी म्हटले. त्यांचे भडक रंग आणि मानवी आवाजाची हुबेहूब नक्कल करण्याची मोहक क्षमता यांनी, त्यांच्या नामशेष होण्याच्या कारणांमध्ये आणखी भर घातली आहे.

मनोरंजक गोष्ट अशी, की सा.यु.पू. पाचव्या शतकातल्या एका ग्रीक डॉक्टरने, एका पोपटाला पाळल्याचा सर्वांत जुना अहवाल लिहून ठेवला. हा पक्षी आपले मूळस्थान भारत इथल्या भाषेतील काही शब्दांसह काही ग्रीक शब्दही बोलत असल्याचे पाहून या डॉक्टरला खूप आश्‍चर्य वाटले होते.

पोपटांना नक्कल करता येत असल्यामुळे आज त्यांची लोकप्रियता वाढली व लोक सर्रासपणे त्यांना पाळतात; पण यामुळे त्यांना पकडण्याचा बेकायदेशीर धंदाही वाढतो. गेल्या २० वर्षांपासूनच्या अभ्यासावरून दिसून येते, की १४ राष्ट्रांतील २१ जातीच्या पोपटांपैकी, बेकायदेशीर शिकार करणाऱ्‍यांनी या पोपटांच्या ३० टक्के घरट्यांचा नाश केला आणि ४ जातीच्या पोपटांच्या ७० टक्के घरट्यांचा नाश केला. पोपटांच्या प्रजोत्पादनाचे प्रमाण मंद असल्यामुळे, म्हणजे फक्‍त वर्षातून एकदाच वीण होत असल्यामुळे शिवाय त्यांच्या स्वाभाविक निवासस्थानाचा नाश होत असल्यामुळे पोपटांची किंमत वाढली आहे—जितका दुर्लभ पोपट तितकी अधिक किंमत.

विशिष्ट जातीच्या पोपटांच्या कमी संख्येवरून आपल्याला त्यांच्या नामशेष होण्याच्या धोक्याचे गांभीर्य कळते. असा अंदाज लावला जातो, की ब्राझीलमध्ये फक्‍त २०० पेक्षा कमी लियर्स मॅकॉ जातीचे पोपट अस्तित्वात आहेत. यांहूनही दयनीय अवस्था प्वेर्त रिकन पोपटांची आहे; जंगलांत या पोपटांची संख्या आता फक्‍त ५० पेक्षा कमी उरली आहे. जंगलात नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत असे समजल्या जाणाऱ्‍या स्पीक्स मॅकॉ जातीच्या पोपटांचे संवर्धन, बंदिवासात ठेवून त्यांचे प्रजनन करणे यावरच जास्त अवलंबून आहे.

ते जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत भडक रंगाचे हे सुरेख पक्षी एका निर्माणकर्त्याची ग्वाही देतील ज्याला त्यांचे रंग व त्यांच्या उल्लेखनीय क्षमता पाहून आनंद वाटतो. मानवी स्वार्थामुळे पोपट नामशेष होतील का? वेळच काय ते सांगेल. पण तोपर्यंत तरी या नक्कलाकारांच्या डोक्यावर नामशेष होण्याची टांगती तलवार लटकत राहील. (g०२ ७/२२)

[३१ पानांवरील चित्रे]

प्वेर्त रिकन पोपट

लियर्स मॅकॉ

स्पीक्स मॅकॉची पिलं

[चित्राचे श्रेय]

प्वेर्त रिकन पोपट: U.S. Geological Survey/Photo by James W. Wiley; लियर्स मॅकॉ: © Kjell B. Sandved/Visuals Unlimited; स्पीक्स मॅकॉ: Progenies of and courtesy of Birds International, Inc.