आमच्या वाचकांचे मनोगत
आमच्या वाचकांचे मनोगत
शिक्षक मी गेल्या चार वर्षांपासून प्राथमिक शाळेची शिक्षिका आहे आणि मला “शिक्षक नसते तर?” (एप्रिल-जून, २००२) ही लेखांची श्रृंखला वाचून खूप आनंद वाटला. काळजी करण्याजोगी एक प्रवृत्ती आजकालच्या मुलांमध्ये पाहायला मिळते की त्यांना बरोबर आणि चूक यांतला फरक करता येत नाही. मुलांना आपल्या जबाबदाऱ्यांची जाणीव व्हायच्या आधी त्यांना आपल्या हक्काची जाणीव होते तेव्हा शिक्षकांना त्यांना सांभाळायला कठीण जाते. तरीपण, शिक्षकी पेशा खूप समाधानदायक आहे; खासकरून विद्यार्थी जेव्हा शिकायला उत्सुक असतात आणि प्रगती करतात.
जे. के., अमेरिका (g०२ १०/२२)
या लेखांबद्दल आभारी आहे. या लेखांमुळे मला समजले, की शिक्षकांना आपल्यासाठी किती त्याग करावे लागतात; तितके त्याग आपण नेहमी त्यांच्यासाठी करत नाही.
एस. एम., इटली (g०२ १०/२२)
मी आठ वर्षांची आहे. शिक्षकांविषयीच्या तुमच्या लेखांनी मला हे समजायला मदत केली की शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांवर किती प्रेम करतात. कठीण असते तेव्हा देखील त्यांना मुलांना शिकवायला आवडते. मी माझ्या शिक्षकाला थँक्यू-कार्ड दिलं. माझी चार वर्षांची बहीण आणि मी, यहोवाबद्दल लोकांना कसे शिकवायचे हे शिकत आहोत—हे कठीण असले तरीसुद्धा आम्ही असे करतो कारण आमचे लोकांवर प्रेम आहे.
टी. एम., अमेरिका (g०२ १०/२२)
शिक्षिकेची नोकरी सोडून चार वर्षांनंतर मला एका विद्यार्थीनीने, मी तिला मदत केलेल्या प्रसंगांबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी पत्र लिहिले. तिने स्वतः बनवलेले एक बुकमार्कसुद्धा मला पाठवले. तिचे पत्र वाचून मला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा!
ए. आर., स्लोव्हेनिया (g०२ १०/२२)
मी हे मासिक आमच्या मुलांच्या शाळेतील मुख्याध्यापकांना आणि दोन शिक्षिकांना दिले. दोन दिवसांनंतर या मासिकाबद्दल त्यांचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी पुन्हा शाळेत गेले. तर, त्यांनी मला, स्पॅनिश आणि इंग्रजी भाषेत आणखी २० मासिके पालकांना देण्याकरता आणायला सांगितली.
एम. एम. अमेरिका (g०२ १०/२२)
गेल्या वर्षी मी प्राथमिक-शाळेचा शिक्षक म्हणून चार महिने काम केले. इतर शिक्षकांनी मला सांगितले, की पालकांनी त्यांना कदर दाखवली नाही म्हणून शिक्षक या नात्याने त्यांना काम करायला कठीण वाटले. हे लेख समर्पित शिक्षकांच्या कामाची खूप कदर बाळगतात हे वाचून मला खूप आनंद वाटला. माझे काम संपल्यानंतर मला माझ्या अनेक विद्यार्थ्यांनी थँक्यू-पत्रं पाठवली. प्रत्येक पत्र मला मोलाचे वाटते!
एस. आय. जपान (g०२ १०/२२)
फुगे “वाऱ्याच्या पंखांवर” या सुंदर लेखाबद्दल तुमचे खूप आभार. (एप्रिल-जून, २००२) फुग्यांतून उड्डाण करण्याची माझी मनापासून इच्छा आहे परंतु माझी ही इच्छा अद्याप पूर्ण झाली नाही. परंतु तुमचा लेख वाचल्यावर माझी ही इच्छा जणू पूर्ण झाली कारण, मला असं वाटलं जणू मीही फुग्यांतून उड्डाण करत आहे! मला टोपली वर उचलल्याचा व हेलकावे खात असल्याचा खरंच “भास” झाला. वरून संपूर्ण जग किती चिमुकले दिसत असेल आणि तरीपण, यहोवा जगाला आणि आपल्याला मोलाचे समजतो.
एस. ए. जर्मनी (g०२ १०/२२)
दोषी भावना “बायबलचा दृष्टिकोन: दोषभावना—नेहमीच हानीकारक असते का?” (एप्रिल-जून, २००२) या लेखाची मला अत्यंत गरज होती. मला दुसऱ्यांकडून पुष्कळ अपेक्षा करायची सवय होती त्यामुळे पूर्ण-वेळेच्या सुवार्तिक कार्यातील माझ्या सोबतीणीशी व्यवहार करताना मला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास कठीण गेले. या लेखात दाखवण्यात आले आहे की इतरांनी नेहमी आपल्या मनाप्रमाणे गोष्टी केल्या नाहीत तर त्यांना दोषीपणाची जाणीव करून देणे हे मुळीच प्रेमळपणाचे लक्षण नाही व त्यातून चांगले असे काहीच साध्य होत नाही. माझ्या दृष्टिकोनात बदल करण्यास मला मदत मिळाल्याबद्दल मी आता आनंदी आहे. कृपया आम्हाला, सर्व गोष्टींकडे यहोवाच्या दृष्टिकोनातून पाहण्यास असेच शिकवत राहा.
के. के. जपान (g०२ १०/२२)