व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

ओठांच्या हालचालींवरून त्यांना बोलणे समजते

ओठांच्या हालचालींवरून त्यांना बोलणे समजते

ओठांच्या हालचालींवरून त्यांना बोलणे समजते

ब्रिटनच्या सावध राहा! लेखकाकडून

दोन संशयित अतिरेक्यांना एका सार्वजनिक बागेत एकमेकांबरोबर बोलत असल्याचे व्हिडिओवर टेप करण्यात आले. ते दोघे काय बोलत आहेत हे कुणालाच ऐकू येत नव्हते—तरीपण पोलिसांनी त्यांना अटक केली आणि त्यानंतर त्यांना अनेक वर्षांसाठी बिनभाड्याच्या घरात अर्थात तुरुंगात पाठवण्यात आले. त्यांचे टेप केलेले बोलणे, ब्रिटनमध्ये तज्ज्ञ साक्षी आणि ब्रिटिश पोलिसांचे सर्वात “ताकदवान गुप्त शस्त्र” म्हणून नावाजलेल्या एका लिपरीडरने (ओठांच्या हालचालींवरून बोलणे समजणारी व्यक्‍ती) ऐकवले.

लिपरीडींगच्या कलेविषयी आणखी माहिती करून घेण्यासाठी मी माईक आणि क्रिस्टीनला भेटायला गेलो. क्रिस्टीनला वयाच्या तिसऱ्‍या वर्षापासून ऐकू येत नाही. नंतर ती कर्णबधिरांसाठी असलेल्या शाळेत जाऊ लागली; तिथे तिला लिपरीडींग शिकवण्यात आले. माईकने क्रिस्टीनबरोबर लग्न केल्यानंतर लिपरीडींग शिकून घेतले.

लिपरीडींग करणे किती कठीण आहे? माईक म्हणतो: “तुम्ही ओठांचा आकार आणि हालचाली, जीभ आणि खालचा जबडा यांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे.” आणि क्रिस्टीन म्हणाली: “तुमच्याशी बोलणाऱ्‍या व्यक्‍तीला तुम्ही न्याहाळून पाहिले पाहिजे आणि जसजसे तुम्हाला ओठांच्या हालचालींवरून समोरच्या व्यक्‍तीचे बोलणे समजू लागते तसतसे तुम्ही मग तिच्या चेहऱ्‍यावरील आणि शरीराच्या हावभावांकडे लक्ष दिले पाहिजे.”

एखादी व्यक्‍ती ओरडून बोलत असते किंवा विनाकारण तोंड वेडेवाकडे करून बोलत असेल तर अशा व्यक्‍तीचे बोलणे समजून घेणे कठीण जाते ही एक गोष्ट मी शिकले आहे. अशाप्रकारचे चुकीचे संकेत गोंधळात टाकणारे आणि अर्थहीन असतात. लिपरीडींगवर प्रभुत्व मिळवल्यावर मग, समोरची व्यक्‍ती कोणत्या भागातून किंवा देशातून येते, हे तिच्या ओठांच्या हालचालीवरूनच सांगता येऊ शकते. अर्थातच, हे इतके सोपे नाही! लिपरीडींग शिकवण्यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या हियरिंग कनसर्न नावाची संस्था अगदी उघडपणे असे म्हणते, की “लिपरीडींगसाठी हवा असतो फक्‍त सराव.”

क्रिस्टीन कबूल करते, की कधीकधी बसमधून किंवा ट्रेनमधून प्रवास करत असताना ती नकळत दुसऱ्‍यांचे संभाषण “ऐकू लागते” आणि जेव्हा तिला याची जाणीव होते तेव्हा तिला ओशाळल्यासारखे होते. अशा वेळी ती लगेच दुसरीकडे चटकन पाहते. पण तिची ही क्षमता कधीकधी संरक्षणही ठरते. क्रिस्टीनने टीव्हीवरील फुटबॉल खेळ पाहायचे सोडून दिले आहे कारण, ती म्हणते, की काही खेळाडू नको त्या गोष्टी बोलताना पाहिल्यावर तिला किळस वाटायची.

ब्रिटिश पोलिसांच्या “गुप्त शस्त्राची” कला सर्वांना कदाचित आत्मसात करता येणार नाही. तरीपण, ठार बहिऱ्‍या असलेल्या व्यक्‍तीला साधी लिपरिडींगची कला उपयोगी पडू शकेल. (g०२ १०/०८)

[३१ पानांवरील चित्र]

क्रिस्टीन

[३१ पानांवरील चित्र]

माईक