व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

गरुडाची नजर

गरुडाची नजर

गरुडाची नजर

स्पेनमधील सावध राहा! लेखकाद्वारे

तीक्ष्ण दृष्टी असलेल्या माणसाला गरुडाची नजर आहे (विस्टा ड ॲगीला) असे स्पॅनिश लोकांमध्ये म्हटले जाते. जर्मन लोकांमध्येसुद्धा काहीसे असेच (ॲडलेरऑग) म्हणण्याची पद्धत आहे. गरुडाच्या तीक्ष्ण दृष्टीचा अनेक शतकांपासून म्हणींमध्ये उपयोग केला जातो याला योग्य कारण आहे. जवळजवळ तीन हजारांहून अधिक वर्षांआधी लिहिण्यात आलेल्या ईयोबाच्या पुस्तकात गरुडाविषयी असे म्हटले आहे: ‘त्याच्या नेत्रांस दूरवर दिसते.’—ईयोब ३९:२७, २९.

गरुड खरे तर किती दूरपर्यंत पाहू शकतो? “सुयोग्य स्थितीत एका सोनेरी गरुडाला (ॲक्विला क्रायसॅईट्‌स) २ किलोमीटरपेक्षा अधिक किंवा २ किलोमीटरपेक्षा अधिक दूरवर असलेल्या एखाद्या सशाची थोडीशी हालचाल देखील दिसते,” असे द गिनिज बुक ऑफ ॲनिमल रेकॉड्‌र्स म्हणते. पण गरुडाला याहीपेक्षा अधिक दूरवर पाहता येते असा काहींचा अंदाज आहे.

गरुडाची नजर इतकी तीक्ष्ण कशी आहे? एक कारण म्हणजे, सोनेरी गरुडाला दोन मोठमोठे डोळे असतात जे त्याच्या डोक्याचा बहुतेक भाग व्यापतात. बुक ऑफ ब्रिटिश बड्‌र्स नावाच्या पुस्तकात म्हटले आहे, की सोनेरी गरुडाचे डोळे “फार मोठे असले तरी, त्याला उडताना त्रास होईल इतके ते भारी नाहीत.”

शिवाय, गरुडाच्या डोळ्यात, आपल्यापेक्षा अंदाजे पाचपट अधिक प्रकाशग्राही पेशी असतात; आपल्या डोळ्यांत असलेल्या २,००,००० शंकुंच्या तुलनेत गरुडाच्या डोळ्यात दर चौरस मिलीमीटरमध्ये सुमारे १०,००,००० शंकू असतात. जवळजवळ प्रत्येक ग्राहक एका चेताकोशाला जोडलेला असतो. यामुळे, डोळ्याकडून मेंदूला संदेश पाठवणारी गरुडाची दृक्‌तंत्रिका यात, मानवात आढळणाऱ्‍या तंतूंपेक्षा दुप्पट तंतू असतात. म्हणूनच तर या पक्ष्यांची इतकी तीक्ष्ण रंगदृष्टी आहे! इतर पक्ष्यांप्रमाणे, शिकारी पक्ष्यांच्या डोळ्यांत शक्‍तिशाली भिंग असतात जे, केवळ काही सेंटीमीटर अंतरावर असलेल्या वस्तूंवरील नेम क्षणार्धात बदलून लांब अंतरावर असलेल्या वस्तूंवर केंद्रित करू शकतात. याबाबतीत देखील त्यांचे डोळे आपल्या डोळ्यांपेक्षा कितीतरी पटीने उत्तम आहेत.

गरुडाची दृष्टी स्वच्छ प्रकाशात तीक्ष्ण असते पण रात्री घुबडांची दृष्टी तीक्ष्ण असते. या निशाचर शिकारी पक्ष्यांना, भरपूर प्रकाश-संवेदी शलाका आणि मोठे भिंग पृष्ठ असलेले डोळे असतात. यामुळे ते रात्रीच्या वेळी, आपल्यापेक्षा शंभरपटीने अधिक चांगल्यारीतीने पाहू शकतात. फक्‍त काही क्वचित प्रसंगी जेव्हा अगदी गडद अंधार असतो तेव्हा घुबडांना सावज शोधण्यासाठी आपल्या तीक्ष्ण श्रवणशक्‍तीवर पूर्णपणे अवलंबून राहावे लागते.

या पक्ष्यांना ही क्षमता कोणी दिली? देवाने ईयोबाला विचारले: ‘गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारितो काय?’ या अद्‌भुत सृष्टीचे श्रेय कोणताही मानव स्वतःकडे घेऊ शकत नाही हे उघड आहे. स्वतः ईयोबाने नम्रपणे कबूल केले: “तुला [यहोवा] सर्व काही करिता येते; . . . असे मला कळून आले आहे.” (ईयोब ३९:२७; ४२:१, २) गरुडाची नजर, आपल्या निर्माणकर्त्याच्या बुद्धीचा आणखी एक पुरावा आहे. (g०२ १२/२२)

[२९ पानांवरील चित्र]

सोनेरी गरुड

[२९ पानांवरील चित्र]

हिम घुबड