व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

प्रसार माध्यमाची भूमिका

प्रसार माध्यमाची भूमिका

प्रसार माध्यमाची भूमिका

व्हाईट हाऊसचे भूतपूर्व प्रेस सेक्रेटरी माईक मॅककरी यांनी सांगितल्याप्रमाणे, “स्क्रिप्स बातमीपत्रांचे संस्थापक एड्‌वर्ड विलिस स्क्रिप्स यांनी एकदा म्हटले की अमेरिकेत प्रसार माध्यमाची भूमिका पिडितांना सांत्वन देण्याची आणि आरामशीर जीवन जगणाऱ्‍यांना पीडित करण्याची आहे.” त्यांनी पुढे म्हटले: “योग्य माहिती दिल्याशिवाय तुम्ही कोणाला सांत्वन देऊ शकत नाही अथवा त्यांना पीडा देऊ शकत नाही.”

“[मॅककरी] यांनी असे निरीक्षण केले की जगात काय घडत आहे हे आपल्याला समजतच नाही कारण आपली [यु.एस.] प्रसार माध्यमे आपल्या भोवतीच्या जगाविषयी काहीच वृत्त प्रसिद्ध करत नाहीत.” दुःखाची गोष्ट म्हणजे, यु.एस. प्रसारमाध्यमांचा असा ग्रह आहे की “अमेरिकन नागरिकांना जगातल्या घटनांविषयी जाणून घेण्याची इच्छाच नाही.”—ग्राफिक आट्‌र्स मंथली.

सावध राहा! नियतकालिकाचे लेखक जगातल्या सर्व भागांत आहेत आणि या नियतकालिकाचा उद्देश आपल्या वाचकांना चालू घडामोडींविषयी तसेच वैज्ञानिक व सामाजिक विषयांवर माहिती देणे हा आहे. ते एका प्रेमळ निर्माणकर्त्यावर आपला विश्‍वास वाढवते. एकूण ८७ भाषांपैकी ६१ भाषांत एकाच वेळी प्रकाशित होणाऱ्‍या या नियतकालिकाच्या दर अंकाचे वितरण २ कोटी १० लाख प्रती आहे. सावध राहा! वाचा आणि सावध राहा. (g०२ ११/०८)

[११ पानांवरील चित्र]

सर्व प्रकारच्या गुलामीचा अंत!

[११ पानांवरील चित्र]

विज्ञान व धर्माची सांगड घालता येईल का?

[११ पानांवरील चित्र]

जुगार—निर्धोक मौज आहे का?

[११ पानांवरील चित्र]

मारहाण सहन करणाऱ्‍या स्त्रियांना मदत

[११ पानांवरील चित्र]

जागतिक शांती केवळ एक स्वप्न आहे का?