व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

वाऱ्‍याच्या पंखांवर

वाऱ्‍याच्या पंखांवर

वाऱ्‍याच्या पंखांवर

भारतातील मुंबई येथे, रस्त्यावर चाललेल्या एका गृहस्थाला, आपल्या पायाजवळ, वाऱ्‍याने उडत आलेली एक पत्रिका मिळाली. ही पत्रिका राज्य सुवार्ता क्र. ३६ होती; तिचे शीर्षक होते, “नव्या युगात—तुमचे भविष्य कसे असेल?” पत्रिकेच्या शीर्षकाने या गृहस्थाचे लक्ष आकर्षित केले. त्याने लगेच ती पत्रिका उचलली आणि पूर्ण वाचून काढली. वाचलेल्या गोष्टींमुळे त्याच्यात आवड निर्माण झाली व आणखी माहिती जाणून घेण्यासाठी त्याने एक बायबल आणि इतर प्रकाशने पाठवण्याविषयी विनंती केली.

यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पत्रिकेत विश्‍वास बळकट करणारे विचार आहेत. त्यात स्पष्टपणे सांगितले आहे, की आपल्याला तोंड द्याव्या लागणाऱ्‍या समस्या तसेच आजारपण, द्रारिद्र्‌य, युद्धे यांना कारणीभूत ठरते “मनुष्याची हाव, इतरांवर भरवसा न ठेवण्याची वृत्ती आणि स्वार्थ. विज्ञान किंवा तंत्रज्ञानात कितीही प्रगती झाली किंवा कितीही राजकीय बदल घडून आले तरीसुद्धा मनुष्याचे हे दुर्गुण नाहीसे होणार नाहीत.” नजीकच्या भवितव्यात देव पृथ्वीवरील सर्वप्रकारची दुष्टाई कायमची नाहीशी करील असेही या पत्रिकेत सांगितले आहे.

भवितव्यासाठी असलेल्या बायबलमधील अभिवचनांबद्दल तुम्हाला अधिक जाणून घ्यायला आवडेल का? यहोवाचे साक्षीदार लाखो लोकांच्या घरी जाऊन, देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकासोबत इतर बायबल आधारित प्रकाशनांचा उपयोग करून बायबलबद्दल शिक्षण देतात. या माहितीपत्रकात, देव कोण आहे? पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे? देवाचे राज्य म्हणजे काय? बायबलमुळे तुमचे कौटुंबिक जीवन कसे सुधारू शकते? यांसारख्या प्रश्‍नांची उत्तरे देण्यात आली आहेत.

यहोवाच्या साक्षीदारांनी तुमच्या घरी येऊन तुम्हाला, नजीकच्या भवितव्यात देव काय करणार आहे ते समजावून सांगावे असे तुम्हाला वाटत असेल तर यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याकडे यायला आनंद वाटेल व ते तुम्हाला देवाच्या राज्याबद्दल अधिक माहिती देतील. त्यांना तुमची मदत करता यावी म्हणून कृपया खालील कूपन भरा आणि पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा. (g०३ १/२२)

□ कृपया मला देव आपल्याकडून काय अपेक्षितो? माहितीपत्रकाची अधिक माहिती पाठवा.

□ मोफत गृह बायबल अभ्यासासाठी कृपया माझ्याशी संपर्क साधा.