व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

कुंडीतल्या झाडांचे महत्त्व

संशोधकांच्या मते, “शाळांच्या अवतीभोवती कुंड्यांमध्ये झाडे लावली तर हजारो विद्यार्थ्यांना अधिक मार्क मिळतील,” असे लंडनच्या द टाईम्समध्ये वृत्त दिले आहे. रीडिंग विद्यापीठाचे प्राध्यापक डेरक क्लेमेंट्‌स-क्रूम यांना आढळले की, काही वर्ग विद्यार्थ्यांनी खचाखच भरलेले असल्यामुळे व ते हवेशीर नसल्यामुळे तेथील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण अपेक्षित प्रमाणापेक्षा ५०० टक्के अधिक होते; यामुळे मुले लक्ष एकाग्र करू शकत नाहीत व त्यांची प्रगती खुंटते. या परिस्थितीला, बाधक वर्ग लक्षणसमूह (सिक क्लासरूम सिंड्रोम) असे संबोधून ते म्हणतात की, ज्या कामगारांवर व त्यांच्या कामगिरीवर बाधक कार्यालय लक्षणसमूहाचा (सिक बिल्डींग सिंड्रोम) परिणाम होतो त्या कार्यालयांमधील कामगारांच्या संख्येपेक्षा वर्गांमधील मुलांची सरासरी संख्या पाच पटीने अधिक आहे. खोलीतल्या हवेचे प्रमाण वाढवण्यासाठी कोणत्या झाडांचा उपयोग केला जाऊ शकतो? अमेरिकेतील एका अभ्यासात, स्पायडर प्लांट सर्वात प्रभावकारी असल्याचे सुचवण्यात आले आहे. ड्रॅगन ट्रीज, आयव्ही, रबर प्लांट, पीस लिलिज आणि युक्का हे देखील हवेतील प्रदूषके घालवण्यात उत्तम आहेत. घरातील झाडे, कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सीजनमध्ये रूपांतर करून त्याचे प्रमाण कमी करतात. (g०३ ६/०८)

“बोलकी” झाडे

जर्मनीतील बॉन विद्यापीठातील उपयोजित भौतिकशास्त्र संस्थेतील संशोधकांनी लेसरवर चालणारे मायक्रोफोन निर्माण केले आहेत जे झाडांचे बोलणे “ऐकू” शकतात. हे मायक्रोफोन एथिलीन वायुने उत्पन्‍न होणाऱ्‍या ध्वनी लहरी ओळखतात; झाडे तणावाखाली असताना हा वायु उत्पन्‍न होत असतो. बॉन विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. फ्रँक कुएनेमान म्हणतात: “झाड जितक्या अधिक तणावात असेल तितका जोरात संकेत आम्हाला मायक्रोफोनवर मिळत राहतो.” एक सुदृढ काकडीचा वेल तर प्राप्त माहितीनुसार “अक्षरशः ओरडत” होता. “जवळून परीक्षण केल्यावर दिसून आले की त्याला बुरशी लागली होती, परंतु त्याची लक्षणे दिसत नव्हती.” खरे तर, बुरशी आठ ते नऊ दिवसांनंतरच दिसू लागते आणि त्यानंतरच शेतकऱ्‍यांना समस्या कळू लागते. लंडन येथील द टाईम्स म्हणते, “झाडांचे बोलणे ऐकण्याद्वारे कीडीचा व रोगांचा लवकरात लवकर इशारा देणारी व्यवस्था निर्माण करणे शक्य झाले पाहिजे. फळांवर व भाज्यांवर किती तणाव येतो हे जाणल्याने त्यांचा उचित साठा आणि वाहतूक करण्यासही मदत होऊ शकते.” (g०३ ५/०८)

पोपच्या स्मृतीवस्तूंच्या विक्रीत घट

कित्येक वर्षे “[पोलंडमध्ये] धार्मिक वस्तू विकणे हा पैसा मिळवण्याचा पक्का मार्ग होता,” असे न्यूझवीकच्या पोलिश आवृत्तीत म्हटले होते. परंतु अलीकडे, पवित्र मूर्तींच्या विक्रीसंबंधी “चिंताजनक परिस्थिती” निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. २००२ साली पोलंडला पोप भेट देणार असल्याविषयी बरीच प्रसिद्धी होऊनही साखळ्या आणि चित्रांसारख्या पारंपरिक धार्मिक वस्तूंसाठी फार कमी मागणी होती. त्या पत्रिकेत म्हटले होते, की पोपची प्रतिमा असलेले “चीनी मातीचे व धातूचे अर्धपुतळे, चटया, पेंटिंग आणि प्रतिमा असंख्य प्रमाणात बाजारात होत्या” परंतु “ग्राहक निवडक बनले आहेत.” एक वस्तू मात्र अधिक लोकप्रिय झाली आहे. ती आहे एक प्लास्टिक कार्ड, जिच्या एका बाजूला “पवित्र प्रतिमा” आहेत आणि दुसऱ्‍या बाजूला “प्लास्टिकमध्ये वितळलेले सोनेरी मोती” आहेत. हे “रोजरी कार्ड” सध्या “पोपच्या [स्मृतिवस्तूंपैकी] सर्वात नवीन व लोकप्रिय” आहेत असे पोलिश साप्ताहिक प्रॉस्ट म्हणते. (g०३ ५/२२)

गरोदरपणाचा त्रास कमी करणे

ऑस्ट्रेलियाच्या सन-हेरल्ड वृत्तपत्रानुसार, “७० ते ८० टक्के गरोदर स्त्रियांना गरोदरपणामुळे त्रास होतो असा अंदाज केला जातो.” पहिल्यांदाच गरोदर राहिलेल्या या स्त्रियांना सकाळी उठल्यावर मळमळ होते व सहसा उलट्या होतात. गरोदरपणात प्रोजेस्टरोन हार्मोनचे प्रमाण वाढल्याने पोटात अधिक आम्ले उत्पन्‍न होऊ शकतात ज्यामुळे ही परिस्थिती निर्माण होते अशी एक शंका व्यक्‍त केली जाते. शिवाय, “घ्राणेंद्रियशक्‍ती वाढल्याने त्याचप्रमाणे तणाव आणि थकवा यांमुळे गरोदर स्त्रियांना मळमळू शकते.” गरोदरपणाच्या त्रासाला सर्वव्यापक उपाय नाही, तरीपण, त्या वृत्तपत्रात, उष्ण ठिकाणे टाळणे कारण उष्णतेमुळे मळमळू शकते, शिवाय, अधूनमधून झोप घेणे आणि भरपूर झोप घेणे व लिंबू चिरून त्याचा वास घेणे असे काही उपाय सुचवले होते. “बिछान्यातून बाहेर पडण्याआधी प्लेन क्रॅकर्स (एक प्रकारचे सपक बिस्कीट) किंवा दूध अथवा इतर द्रव्य न मिसळलेले सिरीअल खाऊन पाहा. बिछान्यातून उठताना हळू उठा,” असेही त्या वृत्तपत्रात म्हटले आहे. “अधूनमधून प्रथिने असलेले अल्पोपहार घेत जा.” वृत्तपत्रात म्हटले आहे की, “गरोदरपणाच्या त्रासाचा एक फायदा आहे. अलीकडील अभ्यासांमध्ये असे दिसून आले आहे की, गरोदरपणी ज्या मातांना त्रास होतो त्यांचा सहसा गर्भपात होत नाही.” (g०३ ४/२२)

भारतात प्रसार माध्यमांचा प्रसार

भारतात, १९९९ ते २००२ या तीन वर्षांमध्ये वृत्तपत्रे वाचणाऱ्‍यांची संख्या १३.१ कोटीपासून १५.१ कोटी झाली आहे असे राष्ट्रीय वाचन अभ्यास मंडळाने घेतलेल्या एका सर्वेक्षणात निष्पन्‍न झाले. देशातील वृत्तपत्रे, पत्रिका आणि इतर नियतकालिकांच्या वाचकांची एकूण संख्या पाहिली तर ती १८ कोटी इतकी आहे. परंतु, भारताच्या १०० कोटी लोकसंख्येतील ६५ टक्क्यांहून अधिक लोक साक्षर असल्याने वाचकांची संख्या वाढण्यास बरीच मुभा आहे. टीव्ही पाहणाऱ्‍यांची संख्या ३८.३६ कोटी आहे तर रेडिओचे प्रसारण ६८.०६ कोटी श्रोत्यांपर्यंत पोहंचते. १९९९ साली केवळ १४ लाख लोक इंटरनेटचा वापर करत होते, परंतु आता ६० लाखांहून अधिक लोक त्याचा वापर करतात. भारतात टीव्ही असलेल्या सर्व घरांपैकी निम्म्या घरांमध्ये केबल टीव्ही आणि सॅटेलाईट टीव्ही आहे; तीन वर्षांमध्ये ही ३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. (g०३ ५/०८)

रोजरीचे नविनीकरण

“गेल्या ५०० वर्षांपासून श्रद्धाळू रोमन कॅथलिकांनी येशू आणि त्याच्या मातेच्या जीवनातील १५ मुख्य घटनांवर किंवा ‘रहस्यांवर’ मनन करण्यासाठी प्रभूची प्रार्थना आणि हेल मेरी या प्रार्थनांचा जप केला आहे किंवा रोजरी म्हटली आहे,” असे वृत्त न्यूझवीकमध्ये देण्यात आले. “मागच्या [ऑक्टोबरमध्ये] पोप जॉन पॉल दुसरे” यांनी येशूच्या बाप्तिस्म्यापासून शेवटल्या भोजनापर्यंतच्या सेवेवर आधारित “एक चवथी माला रोजरीत सामील” करण्यासाठी प्रेषितीय पत्र जारी केले. त्या पत्रिकेत पुढे म्हटले आहे, “व्हॅटिकनच्या दुसऱ्‍या सभेपासून त्यांच्या ज्या ‘आवडत्या’ प्रार्थनेची लोकप्रियता कमी झाली तिच्याबद्दल आस्था पुन्हा वाढवणे हा पोपचा हेतू आहे. पोपच्या या कार्यामुळे केवळ कॅथलिकांच्या या प्रार्थनेत, रोजरीशी जिचा अधिक संबंध जोडला जातो त्या मरीयेच्या तुलनेत ख्रिस्तावर अधिक भर देण्याचे प्रमुख लक्ष्य आहे.” पोपच्या मते, “ख्रिस्ती धर्मावर पूर्वेकडील धर्मांच्या चिंतनात्मक चालीरीतींचा प्रभाव” होत असतानाच्या या काळात कॅथलिकांमध्ये मनन करण्याच्या सवयीला याने प्रोत्साहन मिळेल अशी आशा केली जाते. (g०३ ६/०८)

विवाह मोडणाऱ्‍या एजेंसी

टोकियोच्या आयएचटी असाही शिंबुन वृत्तपत्रातील एका अहवालात म्हटले आहे की, जपानमध्ये सुखी विवाह नसलेले काही लोक आपला विवाह मोडण्यासाठी काही एजेंसींना पैसे देत आहेत. पतीला आपली पत्नी नको असेल पण त्याच्याजवळ घटस्फोट घेण्यासाठी ठोस आधार नसेल तर तो ‘विवाह-मोडणाऱ्‍या’ एजेंसीला पैसे देतो आणि ती एजेंसी एका देखण्या पुरुषाला पाठवते व या पुरुषाची ग्राहकाच्या पत्नीशी “योगायोगाने” भेट होते आणि त्यांचे प्रेम प्रकरण सुरू होते. काही काळातच, पत्नी घटस्फोट द्यायला तयार होते. आपले काम संपल्यावर भाड्यावर असलेला प्रियकर गायब होतो. पत्नीला जेव्हा आपल्या पतीपासून मुक्‍ती हवी असते तेव्हा ही एजेंसी एखाद्या सुंदर तरुणीला पाठवून पतीला व्यभिचार करायला भाग पाडते. एका २४ वर्षांच्या स्त्रीनुसार, ती ज्या पुरुषांकडे जाते ते “कधीच नाही म्हणत नाहीत. माझ्या मते, मला ८५ ते ९० टक्के [वेळा] यश मिळते.” एका एजेंसीचा अध्यक्ष, ५ पैकी ३ वेळा अपयशी ठरणाऱ्‍या कामगारांना कामावरून काढून टाकतो, असे त्या वृत्तपत्रात म्हटले आहे. तो म्हणाला, “त्यांनी काम केलेच पाहिजे. हा धंदा आहे.” (g०३ ६/२२)

रस्त्यांवरील मुले—का?

ब्राझीलच्या ओ एस्टाडो दे साउंज पाउलु वृत्तपत्राने म्हटले, “घरातील हिंसा या प्रमुख कारणामुळे लहान मुले आणि किशोरवयीन आपली घरे सोडून रस्त्यावर राहू लागतात.” मुले व किशोरवयीनांच्या रिओ द झानेईरू येथील संस्थेत असलेल्या १,००० रस्त्यांवरील मुलांच्या अलीकडील सर्वेक्षणातून असे दिसून आले की, ३९ टक्के मुलांवर अत्याचार करण्यात आला होता किंवा त्यांनी घरामध्ये भांडणे पाहिली होती. “या मुलांना आदर हवा असतो आणि आपल्याला तो रस्त्यावर मिळेल असा त्यांचा गैरसमज असतो,” असे समाजशास्त्रज्ञ लनी श्‍मिट्‌श म्हणतात. या अभ्यासातून असे दिसून आले की, ३४ टक्के मुले रस्त्यावर येऊन छोटी-मोठी कामे करू लागली होती किंवा भीक मागू लागली होती, त्यांच्यातील १० टक्के मुले अंमली पदार्थांच्या सेवनामुळे आणि १४ टक्के मुले केवळ त्यांना हवे होते म्हणून ही कामे करत होती. संशोधकांच्या मते, हे शेवटले कारण सहसा घरामधील लैंगिक अत्याचारासारख्या इतर कारणांना झाकून टाकते. सुमारे ७१ टक्के मुले रस्त्यांवरील इतरांसोबत राहून आपले “एक कुटुंब तयार करतात, ज्यात ते इतर रस्त्यावरील मुलांना आपला भाऊ, काका, मामा, पिता किंवा माता” समजतात, असे श्‍मिट्‌स म्हणतात. (g०३ ६/२२)