व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

परिस्थिती कधी सुधारेल का?

परिस्थिती कधी सुधारेल का?

परिस्थिती कधी सुधारेल का?

जागतिक आरोग्य संघटना व इतर हितचिंतक गट रोगप्रसारावर पाळत ठेवून त्यांवर नियंत्रण करण्याकरता कार्यक्रम राबवत आहेत. कीटकांद्वारे पसरणाऱ्‍या रोगांच्या वाढत्या समस्येला लढा देण्याकरता बऱ्‍याच संस्था माहितीचा प्रसार तसेच नवीन औषधे व नवीन नियंत्रण पद्धतींसंबंधी संशोधन कार्य यांस प्रोत्साहन देत आहेत. व्यक्‍तिगतरित्या व सामाजिक स्वरूपातही लोक रोगांविषयी माहिती घेऊन स्वतःचे संरक्षण करण्याकरता बरेच काही करू शकतात. तरीपण व्यक्‍तिगत पातळीवर रोगांपासून संरक्षण करणे आणि जागतिक स्तरावर नियंत्रण करणे यात बराच फरक आहे.

बऱ्‍याच तज्ज्ञांचे मत आहे की रोगांच्या नियंत्रणात जागतिक सहकार्य व आपसातील भरवसा अत्यंत महत्त्वाचा आहे. पुलिट्‌झर पारितोषिक विजेती बातमीदार लॉरी गॅरेट हिने येऊ घातलेला नवीन प्लेग—संतुलन हरवलेल्या जगात नव्याने उद्‌भवणारे रोग (इंग्रजी) या आपल्या पुस्तकात असे म्हटले की, “झपाट्याने होत चाललेल्या जागतिकीकरणाच्या दृष्टीने, जगातल्या कोणत्याही भागातल्या लोकांनी आपला शेजारचा परिसर, आपला प्रांत, देश किंवा भूगोलार्ध इतकीच आपली वैयक्‍तिक परिस्थितीकी आहे असे न समजता त्यापलीकडे पाहण्यास शिकायला हवे. रोगजंतू किंवा रोगवाहक मानवनिर्मित सरहद्दींना जुमानत नाहीत.” एका देशात एखाद्या रोगाने थैमान घातले की आसपासच्या देशांतच नव्हे तर सबंध जगात भीती पसरते.

काही सरकारे व लोक कोणत्याही प्रकारच्या परदेशी हस्तक्षेपाकडे—रोग नियंत्रण मोहिमांकडेही शंकेखोर दृष्टीने पाहतात. शिवाय, राजकीय दूरदृष्टीचा अभाव व व्यापारिक स्वार्थ यांमुळे एकसंध आंतरराष्ट्रीय प्रयत्नांत बाधा येते. मनुष्य विरुद्ध रोग या लढाईत, रोगजंतूंचाच शेवटी विजय होईल का? लेखक युजीन लिन्डन, ज्यांचे मत आहे की असेच घडेल, ते म्हणतात: “आता फार उशीर झाला आहे.”

आशा बाळगण्याचे कारण

वैज्ञानिक व तांत्रिक प्रगती झपाट्याने वाढत चाललेल्या रोगांच्या तुलनेत फार कमी पडली आहे. आणि अर्थातच, कीटकांमुळे होणारे रोग मानवी आरोग्याला संभवणाऱ्‍या अनेक धोक्यांपैकी केवळ एक आहे. असे असूनही आशा बाळगण्याचे कारण आहे. सजीव सृष्टीतील विविध घटकांचा आपसांतील गुंतागुंतीचा संबंध शास्त्रज्ञांना अलीकडेच समजू लागला आहे, पण पृथ्वी स्वतःला झालेले नुकसान स्वतः भरून काढण्यास सक्षम आहे हे त्यांना ठाऊक आहे. आपल्या या ग्रहाच्या रचनेतच अशा काही प्रक्रिया आहेत ज्या नैसर्गिक यंत्रणेतील हरवलेले संतुलन पुनःस्थापित करू शकतात. उदाहरणार्थ, वृक्षतोड केल्यानंतरही जंगले पुन्हा वर येतात तसेच जंतू, कीटक व प्राण्यांतील संबंध देखील कालांतराने स्थिरावतात.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, निसर्गातील क्लिष्ट रचना एका निर्माणकर्त्या देवाच्या अस्तित्वाकडे संकेत करते ज्याने सुरवातीला पृथ्वीवरील सर्व यंत्रणा स्थापित केल्या होत्या. बरेच शास्त्रज्ञ स्वतः कबूल करतात की पृथ्वीच्या निर्मितीकरता नक्कीच एक श्रेष्ठ बुद्धीमत्ता कारणीभूत ठरली असावी. होय, गांभिर्याने विचार करणारे देवाचे अस्तित्व यशस्वीरित्या नाकारू शकत नाहीत. बायबल, निर्माणकर्ता यहोवा देव याचे वर्णन एक सर्वशक्‍तिमान व प्रेमळ देवाच्या रूपात करते. आपण आनंदी असावे असे त्याला मनःपूर्वक वाटते.

याशिवाय, बायबल खुलासा करते की पहिल्या मानवाच्या जाणूनबुजून केलेल्या पापामुळे मनुष्यजातीला अपरिपूर्णता, रोगराई व मृत्यूचा वारसा मिळाला आहे. याचा अर्थ सर्वकाळ असे दुःख सहन करण्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही का? नाही, असा त्याचा अर्थ होत नाही! देवाचा उद्देश या पृथ्वीचे एका सुंदर बगिच्यात रूपांतर करण्याचा आहे, जेथे मानव इतर मोठ्या व लहान प्राण्यांसोबत आनंदाने वास करतील. बायबल अशा एका जगाविषयी भाकीत करते जेथे कोणताही प्राणी मग तो मोठा पशू असो किंवा बारीक कीटक असो, मनुष्याला कोणतेही नुकसान करणार नाहीत.—यशया ११:६-९.

अर्थात, सामाजिकरित्या व वातावरणाच्या दृष्टीने अशी परिपूर्ण परिस्थिती टिकवून ठेवण्याकरता मानवाला आपली भूमिका निभवावी लागेल. देवाने मनुष्याला पृथ्वीचे “राखण करण्यास” आज्ञा दिली होती. (उत्पत्ति २:१५) भविष्यातील नव्या पृथ्वीत मनुष्य हे कार्य अगदी परिपूर्णरितीने पार पाडेल कारण तो खुद्द निर्माणकर्त्याने दिलेल्या मार्गदर्शनाचे पालन करेल. म्हणूनच आपण त्या दिवसाची वाट पाहू शकतो, जेव्हा “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.”—यशया ३३:२४. (g०३ ५/२२)