व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“यहोवा माझा सांत्वनदाता”

“यहोवा माझा सांत्वनदाता”

“यहोवा माझा सांत्वनदाता”

स्वीडनचा राजा चार्ल्स नववा याच्या अधिकृत राजसी ब्रीदवाक्याचे हे भाषांतर आहे. लॅटिनमध्ये ते असे आहे: “येहोवा सोलट्युम मेउम.” राजा चार्ल्स, १५६० ते १६९७ च्या कालावधीत, स्वीडनमधील अनेक शासकांच्या पिढ्यांतील एक होता. त्याने नाण्यांवर, पदकांवर किंवा व्यक्‍तिगत ब्रीदवाक्यांतही, इब्री किंवा लॅटिन अक्षरांत देवाच्या नावाला प्राधान्य दिले. इतकेच नव्हे तर त्याने यहोवाचा राजसी धार्मिक संघ देखील स्थापित केला. १६०७ साली, त्याच्या राज्याभिषेकाच्या दिवशी त्याने गळ्यात, यहोवा साखळी नावाचा हार घातला.

हे सम्राट या प्रथा का आचरत होते? विद्वानांचे असे मत आहे, की त्या काळी युरोपमध्ये प्रचलित असलेली कॅल्व्हनिस्ट चळवळ आणि बायबलविषयी आदर यांचा त्यांच्यावर परिणाम झाला होता. सुशिक्षित प्रबोधन सम्राट या नात्याने, त्यांना देवाचे व्यक्‍तिगत नाव यहोवा, याच्या लॅटिन आवृत्तीची ओळख होती, असे पुरावे दाखवतात. काहींना हे देखील माहीत होते, की देवाचे नाव मूळ इब्री बायबलमध्ये हजारो वेळा आलेले आहे.

युरोपच्या विविध भागांत, १६ व्या आणि १७ व्या शतकांदरम्यान, यहोवा हे नाव, नाण्यांवर, पदकांवर, सार्वजनिक इमारतींवर आणि चर्चेसवर आढळायचे, असे लिखित पुरावे देखील आहेत. निर्गम ३:१५ (पं.र.भा.) मधील खुद्द देवाचे हे शब्द, सर्वसामान्यपणे स्वीकारून त्यांचा आदर केला जायचा: “यहोवा, . . . हे सर्वकाळ माझे नाव आहे.” (g०३ ६/२२)

[१३ पानांवरील चित्रे]

यहोवाचा राजसी धार्मिक संघ याची साखळी आणि बिल्ला, १६०६, सोने, काचवण, गारगोटी आणि गारनेटने बनवलेले

राजा एरीक चौदावा १५६०-६८

राजा चार्ल्स नववा १५९९-१६११ (एरीक चौदावाचा भाऊ)

राजा गस्तावुस दुसरा अडॉल्फ १६११-३२ (चार्ल्स नववाचा पुत्र)

क्रिस्टिन राणी १६४४-५४ (गस्तावुस दुसरा अडॉल्फ याची मुलगी)

[चित्राचे श्रेय]

साखळी: Livrustkammaren, Stockholm Sverige; नाणी: Kungl. Myntkabinettet, Sveriges Ekonomiska Museum