व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

तरुण लोकांकरता पुस्तक

तरुण लोकांकरता पुस्तक

तरुण लोकांकरता पुस्तक

अर्खांगिल्स्क येथील विद्यापीठातील एका विद्यार्थिनीने रशियातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तराला पत्र लिहिले. तिने म्हटले की, साक्षीदारांनी प्रकाशित केलेली एक पत्रिका तिला रस्त्यावर कोणा एका व्यक्‍तीने दिली. तिने लिहिले: “[त्या पत्रिकेने] मला जीवनाविषयी आणि देवाबद्दलच्या व धर्माबद्दलच्या माझ्या ज्ञानाविषयी मला विचार करण्यास प्रवृत्त केले. आता मला बायबलचा अभ्यास करायचा आहे. ज्याने आपल्यासारख्या अनोळख्यांच्या पापांकरता व तारणाकरता आपला प्राण दिला त्याच्याविषयी मला अधिक जाणून घ्यायचे आहे.”

तिच्या पत्रात पुढे म्हटले होते: “तुम्ही एक महत्त्वाचे कार्य करत आहात, खासकरून मुलांना चांगले आणि वाईट यांच्यात फरक दाखवण्याचे तुमचे काम सर्वात उत्तम आहे. कारण, मुले स्पंजसारखी असतात; आपल्या आजूबाजूच्या सर्व गोष्टी शोषून, स्वतःत बदल करून ती समरस होण्याचा प्रयत्न करत असतात.” या विद्यार्थिनीला एक धाकटा भाऊ आणि एक धाकटी बहीण आहे आणि तिने तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकाची एक प्रत मागवली आहे. ती म्हणते, “या पुस्तकाचा त्यांना शाळेत आणि त्यांच्या दररोजच्या जीवनात लाभ होईल असे मला वाटते.”

तुम्ही देखील या पुस्तकाबद्दल अधिक माहिती प्राप्त करू शकता जे खासकरून तरुणांना आजच्या समस्यांना तोंड देण्याकरता मदत व्हावी म्हणून तयार केले आहे. सोबत असलेले कूपन भरून या पत्रिकेच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पाठवा. (g०३ ९/८)

□ मला तरुणांचे प्रश्‍न—उपयुक्‍त उत्तरे या पुस्तकाविषयी अधिक माहिती हवी आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.