व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“बायबल वर्ष”

“बायबल वर्ष”

“बायबल वर्ष”

ऑस्ट्रिया, फ्रान्स, जर्मनी आणि स्वीत्झर्लंड येथे २००३ हे वर्ष “बायबल वर्ष” असे घोषित करण्यात आले आहे. फ्राँकफर्टर ऑल्जेमाईन त्सायटुंग या जर्मन दैनिकात म्हटले होते: “याआधी केवळ १९९२ साली हा प्रसंग साजरा करण्यात आला होता; [चर्चेस] या ‘जीवनाच्या पुस्तकाविषयी’ लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा आणि पवित्र शास्त्रवचनांचे सांस्कृतिक महत्त्व पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.”

जून २००२ च्या बिबेलरिपोर्ट नुसार, बायबलचा अनुवाद—निदान त्याच्या काही भागांचा तरी—२,२८७ भाषांमध्ये झाला आहे. अंदाजांनुसार हे देखील दिसून येते की, आतापर्यंत सुमारे पाच अब्ज बायबल वितरित करण्यात आले आहेत. या प्रचंड प्रयत्नांद्वारे स्पष्ट होते की, लोकांना या पुस्तकाविषयी गहिरा आदर आहे.

आज, बहुतेकांना खात्री पटत नसावी की, बायबल व्यावहारिक पुस्तक आहे. उलट, पुष्कळांना वाटते की, बायबलमधील दर्जे जुनाट आहेत आणि त्यांचा वास्तवाशी काही संबंध नाही. परंतु, बायबल वर्षानिमित्त जर्मनीतील चर्चेस दोन गोष्टी साध्य करण्याची आशा करतात—बायबलच्या होता होईल तितके तंतोतंत जीवन जगण्यासाठी लोकांना उत्तेजन देणे आणि चर्चपासून वेगळे झालेल्यांमध्ये बायबलबद्दल उत्साह निर्माण करणे.

बायबल सुरवातीपासून शेवटपर्यंत वाचणे ही काही लहान गोष्ट नाही, पण शास्त्रवचनांतील मुख्य मुद्दे समजून घेण्याचा तो सर्वात प्रभावशाली मार्ग आहे. परंतु, बायबलचा सर्वाधिक फायदा प्राप्त करू इच्छिणाऱ्‍या व्यक्‍तीने २ तीमथ्य ३:१६, १७ मधील विधान लक्षात ठेवावे; तेथे म्हटले आहे: “प्रत्येक परमेश्‍वरप्रेरित शास्त्रलेख सद्‌बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्‍याकरिता उपयोगी आहे. ह्‍यासाठी की, देवाचा भक्‍त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.”

जर्मन कवी योहान वोल्फगँग फोन गटे (१७४९-१८३२) याने पुढीलप्रमाणे म्हटले: “मला खात्री पटली आहे की, बायबल जितके अधिक समजून घ्यावे तितकेच ते रोचक आणि प्रभावशाली बनते.” होय, केवळ देवाच्या वचनात आपल्याला, आपण कोठून आलो आहोत, येथे का आहोत आणि भविष्यात काय घडेल याची स्पष्ट समज दिली आहे!—यशया ४६:९, १०. (g०३ ९/२२)

[३१ पानांवरील चित्राचे श्रेय]

From the book Bildersaal deutscher Geschichte