व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

मधुमेहींना बायबलचे साहाय्य

मधुमेहींना बायबलचे साहाय्य

मधुमेहींना बायबलचे साहाय्य

मधुमेहग्रस्तांच्या आरोग्यासाठी व एकंदर कल्याणासाठी आत्मसंयम व आशावादी दृष्टिकोन असणे अत्यावश्‍यक आहे. पण हे गुण संपादन करण्याकरता त्यांना सातत्याने आधार देणे आवश्‍यक आहे. तेव्हा, ‘एकदा खाल्ल्याने काही होत नाही’ असे म्हणून कुटुंबीयांनी व परिचितांनी मधुमेहींना वर्ज्य असलेले खाद्यपदार्थ खाण्याच्या मोहात पाडू नये. हृदयरोग आणि टाईप २ मधुमेह असलेले हॅरी म्हणतात, “मला माझ्या पत्नीकडून पूर्ण सहकार्य लाभले आहे. मला खाण्याची परवानगी नाही असे खाद्यपदार्थ ती घरात ठेवतच नाही. पण काहीजण समजून घेत नाहीत आणि त्यामुळे कधीकधी आम्हाला किती कठीण जाते याची त्यांना कल्पना नसते.”

मधुमेह असलेल्या व्यक्‍तींच्या निकट सहवासात तुम्ही राहात असल्यास बायबलमध्ये सापडणाऱ्‍या या दोन सुरेख तत्त्वांची नेहमी आठवण असू द्या: “कोणीहि आपलेच हित पाहू नये तर दुसऱ्‍याचे पाहावे,” आणि “प्रीति . . . स्वार्थ पाहत नाही.”—१ करिंथकर १०:२४; १३:४, ५.

आपल्या आरोग्याविषयी जागरूक असलेल्या सर्वांनी खाण्यापिण्याच्या बाबतीत संयम बाळगलाच पाहिजे—मग आपल्याला मधुमेह असो वा नसो. बायबल या बाबतीत साहाय्य देते कारण प्रत्येकाने आत्मसंयम विकसित करणे किती महत्त्वाचे यावर ते भर देते. हा गुण आपल्या जीवनात संपादन करण्याचा तुम्ही निश्‍चय केला आहे का? (गलतीकर ५:२२, २३) ख्रिस्ती प्रेषित पौल याच्या सारख्या बायबलमधील उदाहरणांकडे लक्ष दिल्यानेही बरेच साहाय्य मिळू शकते. एका मधुमेहग्रस्त व्यक्‍तीने असे म्हटले, “[प्रेषित पौलाच्या] तर शरीरात कायमचा एक काटा होता, पण तरीसुद्धा त्याने विश्‍वासूपणे देवाने सोपवलेली सेवा पूर्ण केली. मग मी का नाही करू शकणार!”

होय, जी परिस्थिती आपल्या हाताबाहेर आहे तिचा पौलाने निमूटपणे स्वीकार केला आणि एक मिशनरी या नात्याने तो अतिशय यशस्वी ठरला. (२ करिंथकर १२:७-९) अठरा वर्षांचा डस्टिन जन्मापासून अंधळा आहे आणि १२ वर्षांच्या वयापासून त्याला मधुमेह आहे. तो लिहितो: “या जगात सर्वसुखी असा कोणीच नाही. देवाच्या नव्या जगात मला मधुमेहापासून मुक्‍ती मिळेल त्या दिवसाची मी वाट पाहतो. हे तर काय, तात्पुरते दुखणे आहे. सर्दीपडसे, फ्लू यांपेक्षा जास्त काळ टिकते इतकेच, पण आज न उद्या हेही संपेलच.”

देवाच्या राज्यात पृथ्वीवर परादीस स्थापन होऊन सर्वांना परिपूर्ण आरोग्य लाभेल ही बायबल आधारित आशा मनात बाळगून डस्टिनने वरील विधान केले. (प्रकटीकरण २१:३, ४) देवाचे वचन प्रतिज्ञा देते की देवाच्या शासनाखाली, “मी रोगी आहे असे एकहि रहिवासी म्हणणार नाही.” (यशया ३३:२४; मत्तय ६:९, १०) या बायबल आधारित आशेविषयी अधिक शिकून घेण्यास आपण उत्सुक आहात का? मग कृपया स्थानिक यहोवाच्या साक्षीदारांशी संपर्क साधा किंवा या नियतकालिकाच्या प्रकाशकांना पृष्ठ ५ वरील योग्य पत्त्यावर पत्र पाठवा. (g०३ ५/०८)

[१२ पानांवरील चित्र]

आत्मसंयम व आशावादी दृष्टिकोन महत्त्वाचा आहे