व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

‘माहिती थोडक्यात परंतु खूप प्रभावशाली’

‘माहिती थोडक्यात परंतु खूप प्रभावशाली’

‘माहिती थोडक्यात परंतु खूप प्रभावशाली’

असे एका स्त्रीने देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाचे वर्णन करताना म्हटले. तिने असे का म्हटले त्याचे कारण ती पुढे सांगते. ती म्हणाली: “या माहितीपत्रकामुळे, ग्लोरिया नावाच्या एका वृद्ध स्त्रीमध्ये बायबल वाचण्याची इच्छा पुन्हा जागृत झाली. तिला शांत बसून मन एकाग्र करता येत नव्हते पण आता ती दोन तास बसून अभ्यास करते. ती अभ्यासाच्या आधी पाठांची तयारी करते आणि दिलेली सर्व शास्त्रवचने पडताळून पाहते.”

देव आपल्याकडून काय अपेक्षितो? हे ३२ पानांचे माहितीपत्रक, याच मासिकाच्या आकाराचे आहे. मानवजातीसाठी देवाचा काय उद्देश आहे आणि त्याची स्वीकृती प्राप्त करण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे या माहितीपत्रकात स्पष्ट सांगितले आहे. त्यातील काही पाठ लक्षवेधक आहेत; जसे की, “देव कोण आहे?,” “येशू ख्रिस्त कोण आहे?,” “पृथ्वीबद्दल देवाचा काय उद्देश आहे?,” “देवाचे राज्य म्हणजे काय?”

तुम्हाला या माहितीपत्रकाबद्दल आणखी माहिती हवी असेल तर कृपया खाली दिलेले कूपन भरा आणि या नियतकालिकाच्या पृष्ठ ५ वरील उचित पत्त्यावर पोष्टाने पाठवा. (g०४ १/८)

□ कसल्याही बाध्यतेविना, मी देव आपल्याकडून काय अपेक्षितो? या माहितीपत्रकाविषयी अधिक माहितीची विनंती करत आहे.

□ कृपया गृह बायबल अभ्यासाकरता माझ्याशी संपर्क साधा.