व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

राजनैतिक वाटाघाटींमुळे जगात शांती येऊ शकेल का?

राजनैतिक वाटाघाटींमुळे जगात शांती येऊ शकेल का?

बायबलचा दृष्टिकोन

राजनैतिक वाटाघाटींमुळे जगात शांती येऊ शकेल का?

युद्धांचा संपूर्णतः अंत व्हावा असे तुम्हाला वाटते का? राजनैतिक वाटाघाटींतून नक्कीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघर्षांवर काहीतरी उपाय शोधता येईल. बऱ्‍याचजणांचे मत आहे, की जगातल्या नेत्यांनी एकमेकांशी सहकार्य केले तर युद्धांचा बिमोड करता येईल. पण राजनैतिक वाटाघाटींतून आजवर काय निष्पन्‍न झाले आहे हे पाहून निराश झालेल्यांमध्ये कदाचित तुम्हीही असाल. कित्येक शतकांपासून राजदूतांनी कितीतरी शांती तहांवर सह्‍या केल्या आहेत, ठराव निश्‍चित केले आहेत, आणि शांती परिषदा आयोजित केल्या आहेत; पण आजपर्यंत कितीशा प्रश्‍नांचे कायमचे समाधान झाले आहे?

राजनैतिक वाटाघाटी आणि शांती या विषयांवर बायबलमध्ये बरेच काही सांगितले आहे. पुढील प्रश्‍नांचे बायबल उत्तर देते: कोणत्या कारणांमुळे आज राजकीय वाटाघाटींतून शांती येऊ शकत नाही? अशा वाटाघाटींत ख्रिस्ती लोकांनी स्वतःला गुंतवावे का? खरी शांती शेवटी कशाप्रकारे येईल?

शांती का येत नाही?

दोन व्यक्‍तींच्या संवादातून शांती स्थापित होणे शक्य आहे हे दाखवणारी अनेक उदाहरणे बायबलमध्ये आहेत. उदाहरणार्थ, अबीगईल हिने दाविदाचे व त्याच्या सैन्याचे मोठ्या वकूबीने मन वळविले व आपल्या घराण्यावर सूड उगवण्यापासून त्यांना परावृत्त केले. (१ शमुवेल २५:१८-३५) येशूने एका राजाचा दृष्टान्त दिला ज्याच्यासमोर, आपले राजदूत पाठवून शांतीकरता बोलाचाली करण्याशिवाय दुसरा सयुक्‍तिक मार्ग नव्हता. (लूक १४:३१, ३२) होय, विशिष्ट प्रकारच्या वाटाघाटींमुळे संघर्ष सोडवता येतात हे बायबल देखील कबूल करते. मग शांतीकरता केल्या जाणाऱ्‍या बोलाचाली सहसा फोल का ठरतात?

बायबलने अगदी अचूकपणे भाकीत केले होते की आपला काळ खडतर असेल. दियाबल सैतानाच्या दुष्ट प्रभावामुळे माणसे “सलोखा करण्यास तयार” नसलेली, त्याऐवजी, “क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्‍वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली,” अशी असतील. (२ तीमथ्य ३:३, ४, NW; प्रकटीकरण १२:१२) शिवाय, येशूने भाकीत केले की सध्याच्या व्यवस्थीकरणाच्या अंतास “लढाया व लढायांची वृत्ते” सर्रास ऐकायला मिळतील. (मार्क १३:७, ८, NW) आज लढायांचे प्रमाण वाढले आहे हे तर उघडच आहे. तेव्हा, शांती स्थापित करण्यासाठी राष्ट्रांचे आपसांतील प्रयत्न सहसा असफल होतात यात नवल करण्यासारखे काही आहे का?

आणखी एक गोष्ट विचारात घ्या: वाटाघाटी करणारे राजदूत संघर्ष टाळण्याचा अटोकाट प्रयत्न करत असले तरीसुद्धा त्या सर्वांचे मुख्य उद्दिष्ट हे आपापल्या देशांचे हित पाहण्याचे आहे. राजनीतीत हे अपरिहार्य आहे. मग ख्रिश्‍चनांनी अशा गोष्टींत स्वतःला गुंतावे का?

ख्रिस्ती व राजनीती

बायबल सल्ला देते: “अधिपतींवर भरवसा ठेवू नका; मनुष्यावर भरवसा ठेवू नका; त्याच्याकडून साहाय्य मिळणे शक्य नाही.” (स्तोत्र १४६:३) यावरून हे सूचित होते, की राजनैतिक अधिकाऱ्‍यांचे इरादे कितीही नेक असले तरीसुद्धा कायमस्वरूपी उपाय करण्याची कुवत किंवा सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही.

पंतय पिलातासमोर चौकशी सुरू असताना येशूने म्हटले: “माझे राज्य ह्‍या जगाचे नाही, माझे राज्य ह्‍या जगाचे असते तर मी यहूद्यांच्या स्वाधीन केला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; परंतु आता माझे राज्य येथले नाही.” (योहान १८:३६) शांतीकरता केल्या जाणाऱ्‍या योजनांवर सहसा राष्ट्रीय द्वेष व राजकीय स्वार्थाचा प्रभाव असतो. त्यामुळे, खरे ख्रिस्ती या जगाच्या संघर्षांत व राजनैतिक वाटाघाटी करण्याच्या त्याच्या प्रयत्नांत सामील होण्याचे टाळतात.

याचा अर्थ, ख्रिश्‍चनांना जागतिक घडामोडींत जराही रस नाही असा आहे का? मानवी दुःखाप्रती ते असंवेदनशील आहेत का? नाही. उलट, बायबल देवाच्या खऱ्‍या उपासकांचे वर्णन, त्यांच्या सभोवताली घडणाऱ्‍या वाईट गोष्टींमुळे “उसासे टाकून विलाप” करणारे असे करते. (यहेज्केल ९:४) पण शांती आणण्याचे देवाने वचन दिलेले असल्यामुळे ते केवळ त्याच्यावर विसंबून राहतात. युद्धांचा बिमोड झाल्यास शांती येईल असे तुम्हाला वाटते का? देवाच्या राज्यात नक्कीच हे घडेल. (स्तोत्र ४६:८, ९) पण त्यासोबतच देवाचे राज्य पृथ्वीवरील सर्व रहिवाशांना पूर्ण सुरक्षितता व सुखशांती मिळवून देईल. (मीखा ४:३, ४; प्रकटीकरण २१:३, ४) ही श्रेष्ठ शांती राजकीय वाटाघाटींच्या माध्यमाने किंवा मानवी “शांतीरक्षक” संघटनांमार्फत कधीही येणार नाही.

बायबलची भविष्यवाणी व इतिहास स्पष्टपणे दाखवतो की शांतीच्या स्थापनेकरता मानवी राजनीतीवर विश्‍वास ठेवल्याने केवळ निराशा पदरी पडेल. जे शांतीकरता येशू ख्रिस्ताची आस धरतात आणि जे देवाच्या राज्याला समर्थन देतात त्यांचे खरी शांती अनुभवण्याचे स्वप्न अवश्‍य पूर्ण होईल. इतकेच नव्हे, तर ते सर्वकाळ ही शांती उपभोगतील!—स्तोत्र ३७:११, २९. (g०४ १/८)

[१३ पानांवरील संक्षिप्त आशय]

जगातील राजनैतिक अधिकाऱ्‍यांचे इरादे नेक असले तरीसुद्धा कायमस्वरूपी उपाय करण्याची कुवत किंवा सामर्थ्य त्यांच्याजवळ नाही

[१२ पानांवरील चित्राचे श्रेय]

खाली: Photo by Stephen Chernin/Getty Images