व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

“गहन अर्थ असलेली”

“गहन अर्थ असलेली”

“गहन अर्थ असलेली”

जर्मनीतल्या कास्सेल येथे भरवण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय कला प्रदर्शनात, हे शब्द, यहोवाच्या साक्षीदारांच्या साहित्यात आढळणाऱ्‍या चित्रांविषयी उद्‌गारण्यात आले. सोळा वर्षांची कॉट्या आपल्या सोबतीच्या विद्यार्थ्यांसोबत या प्रदर्शनात गेली होती तेव्हा धार्मिक कलेच्या काही वस्तूंकडे पाहत असताना काय घडले याविषयी ती म्हणते:

“आमच्या मार्गदर्शकाने विद्यार्थ्यांना विचारले, ‘तुम्ही यहोवाच्या साक्षीदारांची नियतकालिके कधी पाहिली आहेत का?’ सर्वांनी नाही म्हटले तेव्हा तो टेहळणी बुरूज आणि सावध राहा! नियतकालिकांमधल्या चित्रांची फार स्तुती करू लागला. त्याने म्हटले की, ‘त्यातली रंगवलेली चित्रे असाधारण होती, फोटोंची उत्कृष्टपणे निवड केलेली होती आणि ती गहन अर्थ असलेली देखील होती.’

“या उत्तम चित्रांकडे बारकाईने पाहिले तर बरे होईल असे त्याने सांगितले” व पुढे म्हटले की, बायबलमधील घटनांचे आधुनिक शैलीत चित्रण केल्याने आपल्या काळात ती कशी लागू होतात तेसुद्धा पाहायला आपल्याला सोपे जाईल. शिवाय त्याने विद्यार्थ्यांना असे आर्जवले की, त्यांना कोणी ही नियतकालिके दिलीत तर ती स्वीकारावीत आणि केवळ त्यातली चित्रेच पाहू नयेत तर त्यातली ज्ञानवर्धक आणि लक्षवेधक माहिती देखील वाचावी. (g०४ ४/२२)