व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

जगावरील दृष्टिक्षेप

हत्तीसारखे ढग

एका ढगाचे वजन किती असते? एका क्युम्युलस ढगात सुमारे ५५० टन पाणी मावू शकते असा एबीसी बातमीने अहवाल दिला. “किंवा तुम्हाला जर हे आणखी सोप्या भाषेत हवे असेल तर, . . . हत्तींचा विचार करा,” असे पेगी लमोन या हवामानशास्त्रज्ज्ञ म्हणतात. एका हत्तीचे वजन सुमारे सहा टन आहे असे जर आपण गृहीत धरले तर एका सामान्य क्युम्युलस ढगातील पाण्याचे वजन १०० हत्तींइतके असू शकते. हे सर्व पाणी, खालून येणाऱ्‍या गरम हवेवर तरंगणाऱ्‍या लहान लहान कणांच्या रूपात साठलेले असते. फुलकोबीच्या आकाराच्या या क्युम्युलस ढगाच्या तुलनेत, वादळी ढगात २,००,००० हत्तींच्या वजनाइतके पाणी मावू शकते. एका उष्णकटिबंधीय झंझावती ढगाचे वजन किती असते? लमोन यांनी, एका झंझावती वादळी ढगाच्या एक चौरस मीटरमधील पाण्याच्या वजनाचा अंदाज लावून ती संख्या वादळाच्या एकूण आकारमानाशी गुणिली. निष्कर्ष? चार कोटी हत्तींच्या वजनाइतके वजन. “याचा अर्थ, एका झंझावती ढगातील पाण्याचे वजन, या ग्रहावर असलेल्या सर्व हत्तींच्या वजनाहून अधिक किंवा आतापर्यंत जगलेल्या सर्व हत्तींपेक्षाही अधिक असावे,” असे अहवाल म्हणतो. (g०४ ७/२२)

दात केव्हा घासावेत?

आम्लयुक्‍त पेये किंवा आम्लयुक्‍त अन्‍न प्राशन केल्यावर लगेच दास घासल्याने दातांवरील लुकणाचा नाश होऊ शकतो, असे मेक्सिको सिटीच्या मिलेन्यो नावाच्या बातमीपत्रकात म्हटले होते. गॉटिंगनच्या जर्मन विद्यापीठात केलेल्या एका अभ्यासावर अहवाल देताना, या बातमीपत्रकाने अशी ताकीद दिली, की आम्लयुक्‍त अन्‍नामुळे “दातांवरील लुकण तात्पुरते कमजोर होते.” यास्तव, जेवणानंतर लगेच दात घासणे, हानीकारक ठरू शकते. त्याऐवजी, ‘काही मिनिटे थांबून दातांना पुन्हा आपली शक्‍ती मिळाल्यावर दात घासणे उचित आहे.’ (g०४ ७/२२)

किशोरवयीन जुगारी

मगील विद्यापीठातील, तरुण जुगारींसाठी असलेल्या आंतरराष्ट्रीय केंद्रानुसार, “१२ ते १७ वयोगटातील अर्धे अधिक कॅनडियन तरुण जुगारी, मौजेखातर जुगार खेळतात, १०% ते १५% तरुणांना गंभीर समस्या होण्याचा धोका आहे आणि ४% ते ६% तरुणांना ‘जुगाराचे व्यसनी’ समजले जाते,” असा टोरंटोच्या नॅशनल पोस्ट बातमीपत्रकाने अहवाल दिला. काही मुलांना जुगार खेळण्याचे आकर्षण लहानपणीच लागते जेव्हा कोणी तरी त्यांना बक्षीस म्हणून लॉटरीची तिकिटे देतात किंवा जेव्हा ते कंप्युटरवर जुगार खेळण्यासाठी इंटरनेटचा वापर करतात. यामुळे अधिकाधिक कॅनडियन किशोरवयीन आता, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांचा दुरुपयोग यांसारख्या इतर व्यसनांऐवजी जुगार खेळतात असे संशोधकांचे म्हणणे आहे. वास्तविक पाहता, “१८ ते २४ वयोगटातील तरुण प्रौढांना, सामान्य प्रौढ लोकसंख्येपेक्षा जुगारामुळे समस्या निर्माण होण्याची चार पटीने अधिक शक्यता आहे, असे पोस्टने म्हटले. कॅनडियन उच्च शाळांतील किशोरवयीन जुगारबंदी कार्यक्रमांमुळे या समस्येवर मात करता येईल, अशी शिक्षणतज्ज्ञ मंडळी अपेक्षा करत आहे.” (g०४ ७/८)

कॅथलिक पाळक आणि बायबलचे ज्ञान

“पाळकांना बायबलचे किती ज्ञान आहे?” असा प्रश्‍न खुद्द पाळक असलेल्या आणि ट्यूरिन डायोसिसन ऑफिस फॉर कॅटकिसमचे संचालक असलेल्या आन्ड्रीया फोन्टॅना यांनी विचारला. आवेनीरे या इटालियन कॅथलिक बातमीपत्रकात लिहित असताना फोन्टॅना म्हणाले, की “एका सामान्य मनुष्याने माझ्याजवळ ‘डायोसीसला बायबल अभ्यासाचा कोर्स असतो का,’ असे विचारले” तेव्हा माझ्या मनात हा प्रश्‍न आला. या सामान्य मनुष्याच्या चर्चमध्ये “कधीही पवित्र शास्त्रवचनांचा उल्लेख करण्यात येत नव्हता.” उत्तरात फोन्टॅना यांनी लिहिले: “खरे पाहता, सेमिनेरीचे कोर्सेस केल्यानंतर फार कमी [पाळक] बायबलचा अभ्यास चालू ठेवतात. . . . चर्चला विश्‍वासूपणे जाणाऱ्‍या अनेकांना, बायबल वचनाविषयी फक्‍त रविवारच्या उपदेशातच ऐकायला मिळते आणि त्यातूनच ते काहीतरी शिकू शकतात.” या सामान्य मनुष्याने म्हटले, की तोच “यहोवाच्या साक्षीदारांकडून अधिक शिकून घेत असे.” (g०४ ७/८)

“मृत समुद्र मरत चालला आहे”

“मृत समुद्र मरत चालला आहे; फक्‍त प्रचंड मोठ्या अभियंत्रिकी प्रयत्नानेच तो वाचवता येईल,” असे असोसिएटेड प्रेसमधील बातमीने म्हटले. या समुद्राला मृत समुद्र असे नाव पडले कारण त्यातील मिठाचे प्रमाण अधिक असल्यामुळे या समुद्रात जलचर जिवंत राहू शकत नाहीत. या समुद्राची पातळी पृथ्वीवरील सर्वात कमी पातळी आहे—समुद्रसपाटीपासून ४०० मीटर कमी. हजारो वर्षांपासून [उच्च बाष्पीभवन आणि येणारे पाणी] यांच्यातील संतुलन, मृत समुद्राचा एकमेव पाण्याचा स्रोत असलेल्या यार्देन नदीने टिकवून ठेवले होते,” असे लेखात म्हटले होते. परंतु अलीकडील दशकांत, इस्राएल आणि जॉर्डन हे दोन्ही देश, त्यांना एकमेकांपासून विलग करणाऱ्‍या या अरुंद नदीच्या किनाऱ्‍यावरील लांबसडक शेतीच्या पट्ट्यासाठी याच नदीतून पाणी घेत असल्यामुळे मृत समुद्राचे पाणी भरून निघत नाही.” याबाबतीत काही पावले उचलण्यात आली नाहीत तर, दर वर्षी पाण्याची पातळी जवळजवळ एक मीटरने कमी होत राहील ज्याचा आजूबाजूच्या जमिनीवर आणि वन्यजीवन व वनस्पतींवर विध्वंसक परिणाम होईल, असे एका इस्राएली अभ्यासात दिसून आले. पाच वर्षांपासून पडलेल्या दुष्काळामुळे मृत समुद्राच्या दुरावस्थेत आणखीनच भर पडत आहे. (g०४ ७/८)

तुमचा कटींग बोर्ड स्वच्छ ठेवा!

लाकडी कटींग बोर्ड सुरक्षित आहे की प्लास्टिक कटींग बोर्ड? “जोपर्यंत तुम्ही तो पूर्णपणे स्वच्छ ठेवता तोपर्यंत दोन्ही प्रकारचे बोर्ड सुरक्षित आहेत,” असे युसी बर्कले वेलनेस लेटरने म्हटले. “तुम्ही कच्चे मांस व कोंबडी कापण्यासाठी लाकडी किंवा प्लास्टिकचा कटींग बोर्ड वापरत असाल तर काम झाल्यावर साबणाच्या गरम पाण्याने बोर्ड धुवा.” बोर्डवर खोल चरे पडलेले असतील किंवा त्यावर चर्बी लागलेली असेल तर तो पूर्णपणे स्वच्छ करण्यासाठी जादा काळजी घ्या. “ब्लिचच्या पाण्याने (एक लीटर पाण्यात ५ मिलिलीटर ब्लिच) देखील तुम्ही तुमचा कटिंग बोर्ड निर्जंतुक करू शकता,” असे वेलनेस लेटरने पुढे म्हटले. हात आणि चाकू देखील स्वच्छ धुवून कोरडे केले पाहिजे. (g०४ ७/२२)

जगात झोपडपट्टींचे प्रमाण वाढत चालले आहे

अशाच वेगाने जग पुढे जात राहिले तर “जगातील प्रत्येक तीन लोकांतील एक जण ३० वर्षांत झोपडपट्टीत राहू लागेल,” असे लंडनच्या द गार्डियन या बातमीपत्रकाने एका युएन अहवालाचा उल्लेख करीत म्हटले. दुःखाची गोष्ट म्हणजे, “९४ कोटी लोक—जगाच्या लोकसंख्येतील किमान १/६ लोक—गलिच्छ, अनारोग्यकारक ठिकाणी राहतात जेथे सहसा पाण्याची, शौचालयाची, सार्वजनिक सेवांची सुविधा किंवा कायदेशीर सुरक्षितता नाही.” केनियातील नायरोबीच्या प्रांतातील किबेरात, जवळजवळ ६,००,००० लोक झोपडपट्टीत वास्तव्य करून आहेत. युएन ह्‍युमन सेटलमेंट्‌स प्रोग्रॅम युएन हॅबिटॅटच्या व्यवस्थापक ॲना टिबाययुका म्हणतात: “असमानतेची भावना आणि बेरोजगारी यांमुळे लोक बंडखोर वृत्तीचे होतात. झोपडपट्ट्या म्हणजे सर्व प्रकारच्या वाईट गोष्टींचे माहेरघर, जेथे शांती आणि सुरक्षितता मिळणे कठीण आहे आणि जेथे तरुणांना संरक्षण मिळणे शक्य नाही.” (g०४ ९/८)

म्हातारपणीही शिकता येते?

“[केनियाच्या रिफ्ट वॅली प्रोव्हिन्समधील एका शाळेत] सहा वर्षांच्या मुलांमध्ये एक विद्यार्थी मात्र सर्व मुलांपेक्षा मोठा आहे,” असा नायरोबीच्या डेली नेशन बातमीपत्रकाने अहवाल दिला. हा विद्यार्थी ८४ वर्षांचा वृद्ध आहे. हे गृहस्थ “बायबल वाचण्यास शिकता यावे” म्हणून अलीकडेच पहिल्या वर्गात बसू लागले आहेत. यांची नातवंडे मोठ्या वर्गात आहेत, तरीसुद्धा हे गृहस्थ आपल्या वर्गाला नियमाने जातात. नेशन बातमीपत्रकाला त्यांनी सांगितले: “लोक मला बायबलमधून पुष्कळ गोष्टी सांगतात, त्या खऱ्‍या आहेत की नाही मला माहीत नाही, मला स्वतःला त्या पवित्र पुस्तकातून वाचून त्याचे परीक्षण करायचे आहे.” शाळेचा गणवेश घालून व अभ्यासाचे इतर साहित्य घेऊन ते होता होईल तितके शाळेच्या कडक नियमांचे पालन करायचा प्रयत्न करतात. पण काही गोष्टी त्यांना वेगळ्या पद्धतीने करायला मोकळीक आहे. जसे की, इतर विद्यार्थी व्यायाम करत असतात आणि खेळत असतात तेव्हा यांना “हळूहळू आपले स्नायू ताणण्याची परवानगी” आहे. (g०४ ९/२२)